जॅकलिन फर्नांडिसच्या सिक्रेट फिटनेस टिप्स : ज्या तुम्हाला निरोगी आणि स्मार्ट बनवू शकतात

SD &  Admin
0


जॅकलिन फर्नांडिसच्या सिक्रेट फिटनेस टिप्स, ज्या तुम्हाला निरोगी आणि स्मार्ट बनवू शकतात... होय, नक्कीच, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. खुद्द जॅकलिनने तिच्या चाहत्यांना या सिक्रेट टिप्स सांगितल्या आहेत. या सिक्रेट फिटनेस टिप्स जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत अवलंबल्या, तर तुम्ही नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकाल.

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री आणि श्रीलंकन ​​ब्युटी जॅकलिन फर्नांडिस तिच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये अशा फिटनेस टिप्स फॉलो करते, ज्यामुळे ती नेहमीच निरोगी राहते. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी स्टार नेहमीच तंदुरुस्त आणि सक्रिय असावा लागतो. तुमची फिगर टिकवून ठेवण्यासाठी व्यायामासोबतच तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये अनेक हेल्दी टिप्स फॉलो कराव्या लागतात, जेणेकरुन तुम्ही शरीरासोबत मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता.

या लेखात, आपण जॅकलिन फर्नांडिसच्या सिक्रेट फिटनेस टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत, ती तिच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये फिटनेस टिप्स कशा फॉलो करते.


जॅकलिन फर्नांडिसच्या सिक्रेट फिटनेस टिप्स
Image Credit to Jacqueline Fernandez  

 

मित्रहो इकिगाई नावाचं एक जापनीज पुस्तक आहे, हे पुस्तक जगातल्या फिटनेस संबधी जागरून असणाऱ्या अधिकांश लोकांनी वाचलेलं आहे. खूप छान आणि आरोग्यदायी ज्ञान देणारं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच फिटनेसच वेड लागणार, यात काही शंका नाही. मित्रहो.. एकदा नक्कीच हे पुस्कत वाचा. मी खात्रीने सांगेन, यात काहीतरी तुम्हाला चांगलंच मिळणार.

  

 जॅकलीन फर्नांडिस म्हणते की, ती तिच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करते. त्यानंतर ती कसरत सुरू करते. जॅकलीन वर्कआउटमध्ये योगा, डान्स आणि वेटलिफ्टिंगसारखे व्यायाम करते. वर्कआउट केल्यानंतर ती चहा घेणे टाळते आणि एक कप कॉफी घेण्यास प्राधान्य देते. सकाळी ब्रेकफास्टसाठी ती प्रथिनेंनी भरलेला नाश्ता घेते. त्यासोबतच त्यात आवश्यक कार्बोहायड्रेट्स पदार्थाचाही समावेश करते.


जॅकलिन मुलींना ब्युटी टिप्सही देते. ती सांगते की बर्फाचा तुकडा तुमचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास खूप मदत करतो. तसेच ती चेहऱ्याचा ताजेपणा कायम ठेवण्यासाठी चांगल्या कंपनीचे आईलाइनर आणि ब्लशर वापरावे, असे सांगते.

 

जॅकलिनला तिच्या आयुष्यात खूप ट्रॅव्हल करायला आवडते. कामातून वेळ काढल्यानंतर जॅकलीनला सुट्टीवर जायला आवडते. ती सांगते की, प्रवास आपल्याला काहीतरी नव-नवीन करायला  शिकवतो. मन प्रसन्न करण्यासाठी ट्रॅव्हल करने हा उत्तम पर्याय आहे. ट्रॅव्हलसोबतच जॅकलिनला पुस्तके वाचणे आणि प्राण्यांसोबत वेळ घालवणे खूप आवडते. ती म्हणते की, जर तिने चित्रपटांमध्ये काम केले नसते तर, ती वाइड लाइफ डॉक्युमेंट्री करत असते.

Read More :- Self Care Habits for Women in Marathi : महिलांसाठी स्वत:ची काळजी घेण्याच्या खास सवयी 

जॅकलीन तिच्या चाहत्यांना फिटनेससोबत नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र देते. तुम्ही असे काम निवडा, तेथे  तुम्हाला आनंद मिळेल. कामावरून घरी आल्यावर तुम्ही आनंदी दिसले पाहिजे. हा चेहरा तुमच्यासह तुमच्या कुटुंबाला आनंद देतो.

मित्रहो.. हा फिटनेस मंत्र खूप सोपा आणि कोणत्याही मोबदल्यात मिळतो. गरज असते ती फक्त सतत चांगला विचार करण्याची. आपल्या मनात वाईट गोष्टींना स्थान न देण्याची. मित्रहो.. एकदा नक्कीच हा फिटनेस मंत्र करून  बघा.      

या फिटनेस टिप्स तुम्ही सतत फॉलो कराव्यात असे जॅकलिन म्हणते. कसरत तुम्हाला आयुष्यभर निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करते. म्हणूनच तुमचे ध्येय कधीही चुकवू नका.

महत्वाचं वाचा 

मित्रहो.. ज्या तुम्ही पिक्चरमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री बघता, त्या एवढ्या सुंदर का असतात? असा प्रश्न तुमच्या पुढे नक्कीच आला असणार आहे. आणि असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. कारण प्रत्येकाला सुंदर दिसायचं असते. परंतु मित्रहो सुंदर आणि हेल्दी राहणे काही सोपं नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सकाळी पहाटे उठून व्यायाम करावा लागतो. दररोज योगा, प्राणायाम सारख्या आसणांना आपलंसं करावं लागतं. हेल्दी आहार घ्यावा लागतो. तेलकट आणि अतिगोड पदार्थांना आहारातून फेकावं लागतं. तेव्हा कुठे सुंदरतेची राणी आपल्याला दर्शन देते. आणि हे सर्व या अभिनेत्री करत असतात. म्हणून त्या एवढ्या सुंदर दिसतात.

मित्रहो .. तुमचं काय मत आहे, ते नक्कीच कळवा... विसरू नका...                     


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!