दोन मनांचा संवाद अकस्मित बदलत जातो. तसं दोघं ही एकमेकांपासून दूर जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. कसंतरी दोघंही मनाला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या मनाने दूर जाण्याचेच ठरवलं असते. का कुणास ठाऊक काय झालं असावं. किती तरी वेळा प्रयत्न केला नातं वाचवायचा. परंतु शेवटी अंत करावसा वाटतोय.
मित्रहो तुम्ही समाजात बघितलं असेल, लोकं ही क्षणा क्षणाला बदलत असतात. या बदलण्याबरोबर दोन मन, दोन शरीर बदलत नाहीत तर, त्याचबरोबर संबध आणि भावना ही बदलत जातात. कवयित्रीने अशा प्रकारे वर्णन केले आहे, जस काही तिच्या मनातली ती व्यक्ती मनात दु:ख असूनही चेहऱ्यावर तिच्या नकली आनंदाचा भाव आहे.
Read More : इवलीशी एक मुठ मराठी कविता | Ivalishi Ek Muth Marathi Kavita | स्पृहा जोशी
कविता मस्त आहे. पटकन अर्थ समजतो. कधी कधी काय होतं, कविता आपण वाचतो, थोडा अर्थ ही लागतो, पण त्या चेहऱ्यामागची भावना पटकन लक्षात येत नाही. ही कविता तशी नाही आहे. खूप छान समजदार कविता आहे.
काही हरकत नाही मराठी कविता | कवयित्री स्पृहा जोशी
दोन माणसांमधल्या
माणसं बदलत जातात, तसतशा..
आता तूही पूर्वीसारखा नाहीस
आणि मीही.
असायला हवं, नेहेमी ?
वेगळेपणा करूया ना मान्य,
संपूर्णपणे नव्याने आपण
पडूच शकतो पुन्हा प्रेमात
ही पैज लावायलाही
अजूनही मनाला शोध
घ्यावासा वाटतोय तुझा.
चल, नव्याने ओळख
मी आवडेनही
आता आहे तशी.
तसं तर तसं...
काही हरकत नाही !!
Asayala Hav, Nehami?
Sampurnpane Navyane Apan
Ajunahi Manala Shodh
Kadachit 'Navya' Tula
Poet - Spruha Joshi
या कवितेंचा देखील आस्वाद घ्या
Bhintila Tekun Ubhi Ahe Mi Marathi Kavita By Spruha Joshi
Ek Putala Futala Marathi Kavita by Spruha Joshi
Tya Mantarlelya Raani Marathi Kavita By Spruha Joshi
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The poetry content published in this blog is by poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem