आजकाल प्रत्येकालाच बाहेर फिरायला जायला आवडते. आणि ते चांगले ही आहे, कारण बाहेरच्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. बरोबर तिथल्या संस्कृतीचे दर्शन ही घडते. तसेच तेथील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळते. ज्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद मिळतो.
मित्रहो आपली ही धरती अनेक प्रकारच्या रहस्यांनी भरलेली आहे. आणि अशा रहस्यांची माहिती तेव्हाच प्राप्त होऊ शकते, जेव्हा तुम्ही धरतीवरच्या अशा ठिकाणांना भेट द्याल. परंतु मित्रहो.. अशी टूर करणे थोडे कठीणच असते. कारण घर सोडून जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा अपुरे ज्ञान आणि सामग्रीमुळे विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागते. आणि त्यात जर एक मुलगी म्हणून कोणी बाहेर एकटी फिरायला जाण्याचा प्लान करत असेल, तर मात्र तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला बाहेर प्रवास करणे कठीण होऊन बसेल.
मित्रहो या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक मुलगी सोलो ट्रॅव्हल करताना, तिला कोणती विशेष काळजी घेणे आवश्यक असते. ज्यामुळे ती सुरक्षित राहू शकेल. या बाबत स्पेशल टिप्स देत आहोत. न विसरता नक्कीच फॉलो करा.
Best Tips For Solo Female Travel in Marathi - सोलो ट्रॅव्हल टिप्स
१. प्रवास करण्यापूर्वी त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय फिरता येईल.
२. जर तुम्ही ट्रेनने किंवा विमानाने प्रवास करत असाल तर, ते तुमच्यासाठी सुरक्षित असेल. कारण तुम्ही स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तर वाटेत गाडी ब्रेक फेल किंवा इंजिन बंद पडण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी तुम्हाला भीती तर वाटेलच, बरोबर गाडी दुरुस्तीसाठी अनेक अडचणी येतील.
३. प्रवास करण्यापूर्वी तुमचे एटीएम, डेबिट कार्ड तपासा, कारण कार्ड ब्लॉक होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुम्हाला वाटेत पैशाची अडचण येऊ शकते.
४. शक्यतो फक्त दिवसा प्रवास करा.
५. हॉटेल बुक करण्यापूर्वी त्या हॉटेलची संपूर्ण माहिती मिळवा. तुम्ही तुमच्या मित्रांकडून किंवा गुगल वरून ही माहिती मिळवू शकता.
६. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर हॉटेलचा दरवाजा नीट काम करत आहे की नाही हे तपासा. तसेच हॉटेलच्या खोलीत छुपा कॅमेरा आहे का, खोलीची खिडकी मजबूत आहे की नाही, हे देखील पहा.
७. प्रवासाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कोणाशीही विनाकारण बोलू नका आणि स्वतःबद्दल मर्यादित माहिती द्या.
८. बाहेर जेवल्यानंतर पैसे काढताना, तुमच्या खिशात किती एटीएम, डेबिट आणि पैसे आहेत हे कोणाला दिसू नये याची काळजी घ्या, कारण चोर, लुटेरे तुमच्या शेजारी उभे असू शकतात आणि ते तुमच्यावर लक्ष ठेवून असतील, याची विशेष काळजी घ्या.
९. खाजगी वाहनाने प्रवास करण्याऐवजी, त्या ठिकाणच्या स्टेट ट्रान्सपोर्टने प्रवास करणे, तुमच्यासाठी सुरक्षित राहील.
१०. तुम्ही बाहेरून एकटे आल्याची माहिती अनोळखी लोकांना देऊ नका.
११. प्रवासादरम्यान साधे कपडे घाला. अधिक आधुनिक कपडे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
१२. प्रवास करताना रात्री उशिरापर्यंत इकडे तिकडे विनाकारण फिरू नका. अशा वेळी तुम्हाला विना आमंत्रित संकटाना सामोरे जाऊ शकते.
१३. तुम्ही जात असलेल्या ठिकाणी किंवा आजूबाजूला तुमचे नातेवाईक किंवा मित्र राहत असतील तर, त्यांचा मोबाईल न. अवश्य घ्या. तसेच सुरक्षिततेसाठी घराचा पत्ताही घेऊ शकता.
१४. प्रवासादरम्यान आवश्यक काही खाद्यपदार्थ, औषधे, प्रथमोपचाराच्या वस्तू सोबत ठेवा, वाईट काळात त्याचा उपयोग होऊ शकतो.
१५. प्रवासात कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ घेऊ नका.
१६. कोणत्याही खाजगी वाहनांकडून लिफ्ट मागू नका. आवश्यक असेल तेव्हा टॅक्सीने प्रवास करा. परंतु टॅक्सीमध्ये बसताना टॅक्सी क्रमांक नोंदवून घ्या आणि तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा.
Read More : फॅमिली पिकनिक टिप्स : Tips For A Successful Outdoor With Family in Marathi
मित्रहो.. प्रवासादरम्यान अशा छोट्या छोट्या गोष्टींची खबरदारी घेतल्यास तुमचा प्रवास शुभ होईल. तसं म्हटलं तर आज जग खूप जवळ आले आहे. सगळ्या गोष्टी सुरक्षतेसाठी उपलब्ध आहेत. तरीही स्पेशली मुलींसाठी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण लोकांच्या नजरा या रंगबदलू असतात. अशा लोकांपासून संरक्षण व्हावे म्हणून आधीच तुम्ही सावध असणे आवश्यक आहे.
मित्रहो.. प्रवासादरम्यान अशा छोट्या छोट्या गोष्टींची खबरदारी घेतल्यास तुमचा प्रवास शुभ होईल. तसं म्हटलं तर आज जग खूप जवळ आले आहे. सगळ्या गोष्टी सुरक्षतेसाठी उपलब्ध आहेत. तरीही स्पेशली मुलींसाठी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण लोकांच्या नजरा या रंगबदलू असतात. अशा लोकांपासून संरक्षण व्हावे म्हणून आधीच तुम्ही सावध असणे आवश्यक आहे.