रिच डॅड पुअर डॅड : श्रीमंत आणि गरीब लोकांचे पैसे मिळवण्याचे विचार | श्रीमंत होण्याच्या बेस्ट सवयी

SD &  Admin
0


"न्माला गरीब येणे ही तुमची चुकी नाही. परंतु जन्माला येऊन गरीब होऊन मेलात तर, यात तुमची चुकी आहे"
मित्रहो.. ही एक म्हण नसून माणसाला जीवनात सगळ्यांपासून काहीतरी  वेगळं करण्याची प्रेरणा आहे.

तुम्ही कधीतरी हा विचार नक्कीच केला असेल, तो म्हणजे गरीब लोकं गरीबच का होत जातात ? आणि श्रीमंत लोकं श्रीमंतच का होत जातात? मित्रहो.. याचे काय कारण असावे? मनाला खूप प्रेरणा देणारा प्रश्न आहे. आणि ज्यांना या प्रश्नांचे उत्तर मिळाले आणि त्याने त्या प्रकारे काम करायला सुरवात केली, तर त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

मित्रहो मी काही दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते "रिच डॅड पुअर डॅड ( Rich Dad Poor Dad ). हे पुस्तक  वाचल्यानंतर मी आजपर्यंत साधारण मनुष्य का आहे? याचे कारण मिळाले. त्याचबरोबर मला जीवनात कोणत्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून मी एक यशस्वी मनुष्य आणि श्रीमंत होण्याचे माझे स्वप्न पूर्ण होईल.

मित्रहो श्रीमंत होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? आज जे तुम्ही श्रीमंत व्यक्ती पाहत आहात, जसे रतन टाटा, मुकेश अंबानी, बिल गेट्स, एलन मस्क हे कोणत्या गोष्टीमुळे एवढे गर्भ श्रीमंत आहेत? त्यांच्या सवयी कोणत्या आहेत? ते असं काय करतात त्यामुळे त्यांना नेहमी यश प्राप्त होतं ? या सगळ्यांची उत्तरे, या पुस्तकात तुम्हाला मिळतील.

रिच डॅड पुअर डॅड : श्रीमंत आणि गरीब लोकांचे पैसे मिळवण्याचे विचार

मला वाटतं मित्रहो.. हे पुस्तक प्रत्येक व्यक्तीच्या संग्रहात असायला हवे आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, हे पुस्तक तुम्हाला या जगात स्वतःचं अस्तित्व ठेवण्यास मदत करेल.  बाकी सर्व तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे, की तुम्ही आपल्या कामात लक्ष केंद्रित कसे करत आहात.

मित्रहो जगातील श्रीमंत लोकांच्या सवयी काय आहेत, यावरती एका सर्वे केला गेला, तेव्हा आढळून आले की, ९०% श्रीमंत लोकांच्या सवयी या समान होत्या. यारून समजते की माणसाच्या जीवनात त्यांच्या माईड सेटला किती महत्व आहे.

मित्रहो.. तुम्हाला ही या सवयी जाणून घेतल्या पाहिजेत. मी येथे तुम्हाला सारांश रूपाने या पुस्तकात दिलेल्या त्यांच्या सवयी  सांगत आहे. ज्या तुम्हाला नक्कीच प्रेरित करतील, याची आशा आहे.

श्रीमंत लोकांच्या बेस्ट सवयी : Best Habits of Rich People


शिका आणि ऐका : Learn and listen

गरीब लोकांचा एक मोठा चुकीचा स्वभाव असतो, ते कधी नव-नवीन शिकत नाहीत. सतत नकारात्मक गोष्टींच्या दबावाखाली जगत असतात. या सर्व गोष्टींमुळे ते दुसऱ्यांचे कधी ऐकून घेत नाहीत. आपल्या अधुऱ्या ज्ञानाच्याबळावर लोकांवर जिंकण्याचा आव आणत असतात. या अशा स्वभावामुळे ते नेहमी एकटेच असतात. आणि एकटी माणसे कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत.

या उलट श्रीमंत लोकं सतत नव-नवीन शिकत असतात. काहीतरी करण्यापूर्वी एक्स्पर्ट लोकांचे विचार ऐकतात. मगच ते स्वतःचा निर्णय घेतात. या गोष्टी त्यांना श्रीमंत होण्यास मदत करत असतात.

Read More इकिगाई : IKIGAI दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी लोकांचे रहस्य


स्वार्थी बना : Be Selfish


स्वतःच्या प्रगतीसाठी दुसऱ्या कुणाला न त्रास देता, केलेले कामाला चुकीचे म्हणता येणार नाही. कारण प्रत्येकाला आपलं अस्तित्व आणि यशस्वी व्हायचे असते. आणि मुख्य म्हणजे जो पर्यंत तुम्ही स्वार्थी बनत नाहीत, तो पर्यंत या कलियुगात तरी तुम्ही यशस्वी बनू शकत नाही.

मित्रहो.. प्रामाणिकपणा असायलाच हवा आहे. परंतु जेव्हा स्वतःच्या प्रगतीची आणि आत्मसम्मानाची वेळ येते, तेव्हा तुम्हाला अति प्रामाणिक असून चालत नाही, तर त्यावेळी तुम्हाला स्वार्थी बनावेच लागते.

चैनीच्या वस्तूंना शेवटी प्राधान्य द्या : Prioritize luxury items last

गरीब आणि श्रीमंत लोकांमध्ये हा फरक तुम्हाला दिसून येईल, गरीब लोकं प्रथम चैनीच्या वस्तूंना प्राधान्य देतात. आपल्याकडे असणारे पैसे इतर ठिकाणी गुंतवायचे सोडून, ही लोकं कोणत्या ना कोणत्या अनावश्यक वस्तू खरेदी करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे भविष्याची तरतूद काहीच नसते. मग अशी लोकं जीवनभर कष्ट करत बसतात.

परंतु श्रीमंत लोकांच असं नसतं. ते प्रथम आलेल्या पैशामधून इतर ठिकाणी गुंतवणूक करतात. त्यानंतर ते पैसे येण्याचे अनेक मार्ग निर्माण करतात. ते भविष्यात Passive इनकम तयार करून ठेवतात. आणि मग ते पुढला काळ अधिक मेहनत न घेता, आरामात खात बसतात.

खर्च आणि देणी कमी करणे : Less Expenses and labilities                              

श्रीमंत लोकं कोणत्या गोष्टींवर किती खर्च करावा आणि कोणत्या गोष्टींवर कमी करावा, हे त्यांनी आधीच ठरवलेले असते. ते आवश्यक गोष्टच प्रथम खरेदी करतात. आणि राहिलेल्या पैशातून ते कुठेतरी इनवेस्टमेंट करतात. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात आणि पैसे वाढत जातात.

बचत और इनवेस्टमेंट करणे : Seving Plan and Investment

श्रीमंत लोकांचे सेविंग आणि इनवेस्टमेंट प्लानवर विशेष भर असतो. त्यांनी आधीच पैशाला कसं वाढवायचं आणि त्यासाठी काय करायला हवे आहे, याचे परफेक्ट नियोजन ठरवेलेले असते. त्यामुळे त्यांच्या जीवनात पैसा भर भरून वाढतो.

नव नवीन गोष्टी शिकत राहणे : Focus on learning

मित्रहो.. माणसाने सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी शिकत राहिल्या पाहिजे. सतत शिकत राहिल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. आणि ज्ञान म्हणजे यशस्वी लोकांचे मुख्य हत्यार असते. त्या मार्गाने ते खूप पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात.

मित्रहो.. परंतु गरीब लोकांचे याच्या उलट असते. ते फक्त आराम देणाऱ्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करत  असतात. त्यांना नवीन शिकण्यात काहीच आवडत नाही. मग मला सांगा अशी माणसे प्रसिद्धी आणि पैसा कसा मिळवणार.

हुशार माणसांच्या सहवासात राहणे : Living in the company of intelligent people

माणसाच्या मनावर दुसऱ्याचा अधिक प्रभाव पडत असतो. म्हणून जीवनात यशस्वी आणि चिंतामुक्त राहायचे असेल तर हुशार आणि प्रामाणिक माणसांच्या सहवासात राहिले पाहिजे. आणि याची समज श्रीमंत लोकांनी आधीच आत्मसात केलेले असते. म्हणूनतर त्यांना प्रत्येक कामात ज्ञानी लोकं भेटतात. त्यांच्या बिजनेसला हुशार लोकांचे मार्गदर्शन मिळते. असा बिजनेस यशस्वी शिखर गाठतो.

दररोज पुस्तके वाचणे :  Read a Lot

जगातल्या श्रीमंत लोकांचा जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा त्यांच्या स्वभावात एक सवय कॉमन दिसून आली, ती म्हणजे ही लोकं भरपूर पुस्तके वाचतात. जगातला श्रीमंत माणूस वारेन बफेट हा दिवसातले ४ ते ५ तास फक्त आणि फक्त पुस्तके वाचायला ठेवतो. यावरून तुमच्या लक्षात येईल की, पुस्तके वाचणे किती फायद्याचे असते.

परंतु गरीब लोकांच सर्व काही उलटच असते. त्यांचं एकच म्हणणे असते, ते म्हणजे पुस्तके वाचायला कुणाकडे वेळ आहे. त्यांना त्यांच्या कामातून वेळच मिळत नाही, तर पुस्तके कधी वाचणार. आता मला सांगा, अशी माणसे जगाला लीड कशी करणार?

मित्रहो.. श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये कोणताही फरक नसतो. देवाने सगळ्यांना समान बनवले आहे. फरक आहे तो फक्त त्यांच्या विचारांमध्ये. हे विचारच प्रत्येक माणसाला कोणता मार्गाने जावे हे सुचवत असतात. मग ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते की, त्याने कोणत्या मार्गाने जावे.

रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे अमेरिकन लेखक रोबर्ट टी कियोसाकी यांनी या पुस्तकात प्रत्येक गोष्ट स्वतः समजून आणि त्यावर खोलवर अभ्यास करून, फायनान्स, सेविंस, इनवेस्टमेंट,लाइफ स्टाईल, मानसिकता अशा बऱ्याच गोष्टीं समाविष्ट केल्या आहेत. जीवनात खरच... श्रीमंत, प्रसिद्धी मिळवायची असेल तर, हे पुस्कत तुमच्या हातात असायलाच हवे आहे.   

   
                                              

    

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!