Balpanichya Athavani Marathi Poem By Sanjay Dhumak

SD &  Admin
0


काश ही ठेंगण होतं, असं आपलं बालपण असतं. कितीही गुणगान गायलं, तरी मनाची इच्छा काही पूर्ण होत नाही. सतत बालपणाची ओढ लागलेली असते. सतत त्याला शोधत असतो. पण आता बालपण काही हाती लागत नाही. मग रडव्या चेहऱ्याने त्या हरवलेल्या बालपणाकडे, पाणावलेल्या आणि थकलेल्या मनाने निपचित कायतरी शोधत बसतो.

मित्रहो... बालपणाची किमयाच न्यारी असते. ते कोणत्या का परीस्थित गेले असेना, पुन्हा पुन्हा ते हवे असतेच. या जगात, ही अशी गोष्ट आहे, त्याला मनुष्य कधीच नाही म्हणत नाही. मग ते गरिबीत गेले असले तरी. माझं ही असेच आहे. तुमचं ही असेच असणार आहे. बालपणावर काय बोलू? असा प्रश्न कुणी कधी विचारतो तेव्हा, तेव्हा मनात आणि ओठावर खूप काही असते. आणि ते बोलायचं देखील असते. पण मित्रहो... जेव्हा बोलायची वेळ येते, तेव्हा सगळेच शब्द आठवणी बनून ओठावर येऊन मी मी म्हणत गर्दी करतात. मग काय.. आपण बावरलो जातो. काहीच समजत नाही. आपण एवढे भारावून गेलेलो, असतो की मन आणि हृदय देखील बालपणाची थोरवी सांगायला कमी पडतात.

मित्रहो..मी काही कवी नाही की वक्ता. पण बालपण म्हटलं की शब्द स्वतःहून पुढे पुढे येतात. विचार करण्याची काही आवश्यकता नसते. मित्रहो.. येथे फक्त हृदय आणि मन एकत्र कनेक्ट झाले की, शब्दांचा अगदी पाऊस पडतो. माझं ही असेच झाले आहे.

मित्रहो माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यातून थेट ओठापर्यंत जे शब्द बालपणासाठी आले, ते आपल्यापर्यंत पोहचवत आहे. आवडल्यास शेअर करा. 

बालपणीच्या आठवणी मराठी कविता

Balpan Marathi Kavita |  बालपण कविता | ए डिलाईट लाइफ स्टाईल


बालपणीच्या आठवणी -  पुन्हा परतून ये


किती मस्त असते बालपण,
हंतरुणातून जेव्हा डोकं काढतो, आई अलगद आपल्याला कुशीत घेते,
गालावर मायेची झप्पी मिळते, आणि तुला गोड खाऊ देते म्हणून,
बदडत बदडत अंघोळी घालते. 

किती मस्त असते बालपण,
दिवसभर  रानावनात उधडत फिरतो, वाऱ्याच्या वेगाने,
खूप भूक लागते तरीही मन काही घरी जेवण्यासाठी धावत नाही,
मग आईच निगडीची काठी घेवून पाठीमागे धावून येते,
जेवायला चल म्हणून बदडत बदडत घरी घेवून येते.

किती मस्त असते बालपण,
बालपणीच्या मित्रांची किमयाच न्यारी, कितीही भांडण झाली तरी,
एका करंगळीच्या जुळण्याने, पुन्हा मैत्री घट्ट बनायची,
तेव्हा एक बॉल घेण्यासाठी अकरा जन पटकन जमा व्हायचे,
आणि आता एकटा बॉल आणतो, पण अकरा खेळाडू आणणे कठीण असते.

किती मस्त असते बालपण,
आयुष्याच्या पारावर मित्र भेटतात, जीवा भावाचे,
संकटाच्या काटावर हातात हात घेवून, चल मी आहे सोबत घाबरू नकोस म्हणणारे,
मित्रहो..नव्हतं कुणी श्रीमंत, सगळेच होतो गरीब,
तरीही डब्यातला भुकेचा शेवटचा घास देखील, हे घे भावा म्हणून मायेने विचारणारे.
                                  
किती मस्त असते बालपण,
कितीही पडलो तरी मनाला वेदना होत नव्हत्या, कारण सोबत बाल सवंगडी होते,
चल रे काय होत नाही, म्हणून खांद्यावर हात ठेवून, हिम्मत देत होते,
काय सांगू माझ्या बालमित्रांची थोरवी, बालपणीच्या पारावर त्यांचीच साथ होती.

किती मस्त असते बालपण,
ना दुःखाची छाया होती, ना अहंकाराचा गंध होता,
मना मनात दडलेली एकच मैत्रीची आस होती,
किती मस्त असते बालपण, याच्या शिवाय जगण्याला अर्थच नाही..     


                                                                       - संजय धुमक 


माझ्या मनाच्या शब्दातून:

बालपण हे आयुष्य आनंदाने, सुखाने आणि समाधानाने जगण्याची दोर आहे. ही दोर जेवढी मजबूत असेल, तितकी आयुष्य जगण्याची मजा आनंदाची असेल. खूप मस्त जीवन असेल ते. त्याची कल्पना देखील करणे म्हणजे आयुष्याला आकार देण्यासारखे आहे.

मित्रहो जेव्हा बालपणावरती आपण कविता करतो, त्यावेळी त्या मनाच्या अंतकरणातून आलेल्या असतात. आपण त्यात आता पर्यंत साचलेले सगळे भाव ओतत असतो. आणि ज्या वेळी ही कविता पूर्ण होते, तेव्हा वेगळाच आनंद मिळतो. मित्रहो.. सांगण्याचा हाच उद्देश की, आयुष्य जेव्हढ  सुखाने आणि समाधानाने जगता येईल, तेव्हढ जगत राहावं. कारण हीच वेळ असते, तिला आपल्याला क्षणा क्षणाला आनंदाने जगता आलं पाहजे. नंतर ती वेळ पुनः परतून येणार नाही आहे. याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी आहे.

तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्या नक्कीच न विसरता कळवा....                            


Read More Poem

१. 31 मधुर मराठी कविता | Best Marathi Kavita | Delightful Marathi Poems

२.  झाला बेभान पाऊस मराठी कविता | Zala Bebhan Pavus Marathi Kavita | कवी नलेश पाटील

३. इवलीशी एक मुठ मराठी कविता | Ivalishi Ek Muth Marathi Kavita | स्पृहा जोशी






        


                                                

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!