महिला दिवस २०२३ : ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो ?

SD &  Admin
0


स्त्रियांचे हक्क आबाधित राहावे आणि समाजात आदराचे स्थान मिळावे, या साठी ८ मार्च  रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. या अभिमानी दिवसाचे आपण महत्व आणि त्यामागचा इतिहास या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.

 

महिला दिवस २०२३

प्राचीन काळापासून स्त्रियांवरती अन्याय होत आलेला आहे. मग तिचे माहेर असो किंवा सासर. दोन्ही कडेही तिला कधीच हक्क किंवा न्याय मिळत नाही. सतत ती दबावाखाली जगत असते. तिच्या मनाचा विचार करायला कुणाकडेच वेळ नसतो. अशा वेळी तिच्या मनाची काय अवस्था होत असेल, हे फक्त तीच सांगू शकते.

घरात लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाची जबाबदारी तिलाच घ्यावी लागते. मुलांच्या जन्मानंतर त्यांना मोठं करताना ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या सर्व तिला पार पाडाव्या लागतात. या सगळ्यात पुरुषांची भूमिका ही फक्त एक स्वतंत्र कामाची असते. आणि त्यातही  त्याला कंटाळा वगैरे आला तर, तो लगेच अंग बाजूला घ्यायला मोकळा  असतो. परंतु स्त्रियांचं मात्र तसं नसतं. तिला ठरलेली सगळी कामे करावीच लागतात. आणि कदाचित या गोष्टी करायला उशीर किंवा नाही झाल्यातर, घरातील लोकांची बोलणी खावी लागतात ते वेगळ.

Read More :-  महाभारतकालीन राजकन्या जिला तिच्याच पित्याने वेश्या होण्यास भाग पाडले

यात मात्र एक दु:ख वाटतं, ते म्हणजे या सगळ्यात एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसाठी कधीच धावून येत नाही.किंवा तिची बाजू घेत नाही. उलट तिलाच दोष देते.

या सगळ्या गोष्टींवर गंभीर पणे विचार करून. महिलांना तिचे सर्व अधिकार मिळावेत, म्हणून ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. यादिवशी त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा आदर केला जातो.

मित्रहो.. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो, हे तुम्हाला माहीतच आहे, परंतु तुम्हाला त्या मागचा इतिहास माहित आहे का? चला तर जाणून घेऊया, काय आहे त्या मागचा इतिहास.

महिला दिवस साजरा करण्यामागचा इतिहास

मित्रहो.. यामागचा इतिहास जवळ जवळ १०९ वर्षापूर्वीचा आहे. म्हणजेच १९०९ मध्ये या दिवसी अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिलांचा न्युयोर्कमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये जवळ जवळ  १५०००+ महिला एकत्र आल्या होत्या. यामध्ये त्यांनी कामावरती जास्त वेळ काम करून घेणे, त्या बदल्यात कमी वेतन देणे आणि मतदानाचा अधिकार न देणे या अन्यायावरती सगळ्यांना समान अधिकार मिळावेत, या मागण्या केल्या गेल्या.

या सगळ्याचा सकारात्मक प्रभाव दिसून आला. आणि १ वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने पहिला राष्ट्रीय  महिला दिवस घोषित केला. रशियाने याचं वर्षी म्हणजे ८ मार्च रोजी १९११ रोजी महिला दिवस सुरु केला. पुढे १९१३ रोजी अधिकृत महिला दिवस घोषित केला गेला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तर काही क्षेत्रात फक्त महिलांचेच वर्चस्व आहे. कुठेही त्या कमी नाही आहेत. तरीही महिलांना जे स्थान मिळायला हवे आहे, ते मिळत नाही. सतत तिला कमी असण्याचा त्रास सहन करावा लागतो.

या सगळ्या गोष्टींचा विचार करून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. याद्वारे महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात येईल. त्यांच्या कामाचे कौतूक केले जाईल. आणि त्यांना नव-नवीन क्षेत्रात संधी मिळतील. आणि जर कुणी या नियमांचे पालन करत नसेल तर, त्यांच्या विरोधात त्यांना संरक्षण प्राप्त होईल. म्हणून महिला दिवस हा खूप महत्वाचा आहे.  

Read More : आनंदाचं झाड माझ्या अंगणी आहे

या दिवसाची सुरवात कशी केली गेली

एक आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दिवसी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला. आणि हा प्रस्ताव एका स्त्रीनेच केला होता. त्याचं नाव क्लारा जेटकिन होतं. ज्या परिषदेत क्लाराने या दिवसाचा प्रस्ताव दिला होता, त्या दिवसी त्या परिषदेत १०० महिला उपस्थित होत्या. हा प्रस्ताव सगळ्यांनी मान्य केला. आणि पुढे डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या देशांनी महिला दिवस साजरा करण्यास सुरवात केली. आतापर्यंत झालेल्या क्रांतीमुळे सगळेच देश ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस साजरा करू लागले. 

माझ्या मनाच्या शब्दातून  

मित्रहो.. तसं म्हटलं तर महिला दिवस हा फक्त कागदावरच दिसून येतो. कारण ज्या अधिकारासाठी महिला दिवस सुरु करण्यात आला होता, त्याचा परिणाम कधी दिसून आला नाही. एवढे प्रयत्न करून ही महिलांना पुरुषांच्या आणि समाजाच्या काळ्या नजरेला बळी पडावे लागते. मित्रहो.. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिवस साजरा झाला असे म्हणावे लागेल.

तुम्हाला काय वाटते, ते नक्कीच कमेंट्स द्वारा कळवा.. वाट पाहत आहोत.                         ,                 

                     

                                          

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!