भगवान श्रीकृष्णाचे प्रेरणादायी विचार : Motivational Thought by Lord Shree Krushna

SD &  Admin
0

 

रतीवरती जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकी एक होते भगवान श्रीकृष्ण. शाक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीच तोडले नाहीत. जनकल्याणासाठी केलेल्या महान कार्यामुळे हजारो वर्षे उलटूनही ते आज जनमानसात ईश्वर रूपाने विराजमान आहेत.

मित्रहो.. त्यांचे विचार प्रत्येकाला सकारात्मक उर्जेने भरून टाकतात. माझा जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो, तेव्हा तेव्हा मी लॉर्ड श्रीकृष्णाचे विचार ऐकतो आणि फक्त ऐकतच नाही तर, ते समजून ही घेतो. खरच.. शरीरात अगदी उर्जा संचारते. काहीतरी वेगळ करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते.

माझ्या आयुष्यात भगवान श्रीकृष्णाचे प्रेरणादायी विचार माझ्या जगण्याचे कारण आहेत. कारण कलियुगात खऱ्या अर्थाने स्वालंबी आणि अभिमानाने जगायचे असेल तर, भगवान श्रीकृष्णाचे विचार आपल्या जीवनाचा भाग असणे आवश्यक आहे. मला वाटतं.. तुम्हाला ही त्यांचे विचार आत्मसात करायला हवेत. कारण हे नुसते विचार नाहीत, तर सुंदर जीवन जगण्याची अद्भुत शक्ती आहे. आणि ही ज्याच्या ज्याच्या जवळ असेल, त्याला या कलियुगात घाबरण्याचे काहीही कारण नाही.

मित्रहो.. जाणून घेऊया त्यांचे महान विचार. हे विचार कोणत्या ना कोणत्या मार्गाने सगळीकडे प्रवाहित करा, हेच या ब्लॉगचे खरे यश असेल.

भगवान श्रीकृष्णाचे प्रेरणादायी विचार : Motivational Thought by Lord Shree Krushna


Motivational Thoughts by Lord Shree Krushna in Marathi : लॉर्ड श्रीकृष्ण यांचे मोटिवेशनल कोट्स


मित्रहो... असं म्हणतात, मनुष्य जन्म हा ८४ लाख योनियानंतर प्राप्त होतो. आता हे खरं आहे किंवा नाही. हे मला माहित नाही. हे सर्र्स्वी आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे या वरती तुमचा विश्वास आहे किंवा नाही. हे तुम्हीच सांगू शकता.

"कर्म" मनुष्य जन्माचे अभिन्न अंग आहे   

परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो, प्रत्येक क्रियाची प्रतिक्रिया ही असतेच. म्हणून माणसाने मिळाल्या या मनुष्य देहाचे चांगली कर्म करण्यासाठी करावे. मनुष्य जन्म  ८४ लाख योनियानंतर मिळो, अथवा न मिळो. याकडे सध्या लक्ष देवू नका. लक्ष द्या तुमच्या चांगल्या कर्माकडे. कारण तुमची चांगली कामेच पुढे तुम्हाला चांगले फल देणार आहेत.

मित्रहो.. भगवान श्रीकृष्ण हे शाक्षात ईश्वर आहेत. त्यांनी महान भागवत गीतेमध्ये कर्म यावरती अर्जुनाला पटवून देताना अनेक उदाहरणे देतात. यावरून तुमच्या लक्षात येईल, कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा. कारण नियती फक्त कर्माचे फल तुम्ही भोगणार की तुमचे भविष्य हेच सांगते. सर्व काही मित्रहो.. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.

ही पोस्ट वाचा :  प्रेरणादायी विचार मेसेज | Motivational Quotes | Positive Thinking Message  

तुम्हाला एक मस्त उदाहरण देतो. तुमच्या ते नक्कीच लक्षात राहील. साधी साधी उदाहरणे समजायला कठीण जात नाहीत. बघा.. जेव्हा कुणी आंब्याचे झाड लावतो. त्या झाडाला फळेही लागतात. येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्याची फळे खालली देखील नसतील आणि कदाचित खालली देखील असतील. मात्र त्याने एक चांगले काम केले, ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता लावले.

परंतु जर त्यांने या जागी कोणतेतरी काटेरी झाड लावले असते, तर... त्यामुळे त्याला किंवा येणाऱ्या पिढीला काटेच मिळाले असते. ते सतत त्यांना बोचत बसले असते. म्हणजेच मित्रहो.. तुम्ही जसे रुजवता, फलही त्याच प्रकारे मिळते.

जसे मित्रहो.. झोपला जेव्हा आपण पुढे ढकलतो, तो तसाच पाठीमागे ही येतो. म्हणजेच प्रत्येक क्रियाची ही प्रतिक्रिया ही होतेच. म्हणजेच प्रत्येक कर्माचे फल हे कधीना कधी मिळतेच. मित्रहो.... नियतीचे नियम हे अटल आहेत. त्यांना कुणीच बदलू शकणार नाहीत. स्वयं ईश्वर देखील त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण शाक्षात ईश्वरी अंश असूनही, त्यांनी कर्म किंवा इतर कोणत्याही निसर्गाच्या नियामध्ये हस्तक्षेप केला नाही. 

यावरून प्रत्येक माणसाने न चुकता कर्माच्या फळाची नुसती अपेक्षा न करता. सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे. नियती तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फल नक्कीच देणार आहे.

जेव्हा चांगले आणि वाईट यामध्ये पर्याय निवडताना मनाची कोंडी होते, तेव्हा कोणता पर्याय निवडावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.

मित्रहो.. मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो. त्या वेळी त्याला अनेक प्रश्न उद्भवतात. त्याच्या मनात काहूर माजलेले असते. कुणाची निवडा करावी आणि कुणाची नाही, अशी कोंडी निर्माण होते. तेव्हा मित्रहो.. तुम्हाला कुणाला निवडावे हे तुमच्यावर अवलंबून असते. नियती तुम्हाला अनेक पर्याय देते. यात तुम्ही गोंधळून जाता. परंतु शेवटी तुम्हाला कुणा एकाला निवडावे लागते. मित्रहो.. येथेच तुमची परीक्षा असते. आणि या परीक्षेत चुकुनही तुम्ही नापास झालात तर, पुढे महाभारतातील कर्ण या योध्यासारखी होईल. सगलं काही माहित असतानाही, त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दृष्ट वृत्तीकडून लढण्याची पाली आली. आणि भयानक मृत्यूला त्याला सामोरे जावे लागले. 

मित्रहो.. असे नाही की कुणी त्याला समजावले नाही. स्वयं श्रीकृष्णाने त्याला चांगले आणि वाईट काय आहे, याची जाणीव करून दिली. परंतु मित्रहो... कधी कधी मनुष्य प्रेमाच्या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला असतो. अशा वेळी त्याला चांगले आणि वाईट यामध्ये अंतर माहित असूनही त्याला वाईट वृत्तीला निवडावे लागते. परंतु येथे अशी माणसे चांगली कर्म आणि नैतिक धर्मातून भविष्यात होणारे चांगले ते तो विसरून जातात. त्याला फक्त स्वतः स्वार्थ दिसतो. त्याला फक्त कुणीतरी केलेली मदत आठवते. परंतु येथे तो त्याच्या जन्माचे मुख्य कारणच विसरून जातो. आणि शेवटी तो हतबल होऊन दृष्ट प्रवृत्तीसाठी स्वतःचा जीव गमावून बसतो. 

मित्रहो एक लक्षात ठेवा नियती हमेशा आपली परीक्षा घेत असते. सतत काही ना काही संकटे आपल्या पुढे टाकत असते. यातून आपण कसे बाहेर पडतो. ही आपली एक धर्म परीक्षाच असते. जे येथून पास होतात. ते नक्कीच भविष्यातील गोड फळे खातील. दुसरे आहे भाग्य जे आपल्याला अनेक पर्याय देते. मग येथे पर्याय निवडण्याचे काम आपले असते. जर पर्याय चांगला निवडला तर, तुम्हाला संकटाना सामना करावा लागेल, परंतु शेवटी तुम्हाला फळे ही गोडच मिळतील. परंतु तुम्ही याच्या उलट केलत तर, शेवटी तुम्हाला दंडच प्राप्त होणार आहे. परंतु मित्रहो... आपले भविष्य हे आपल्या निवडीवर अवलंबून असते. जर तुमची निवड चांगली असेल, तर तुमची कर्मे तुम्हाला चांगलच देणार. परंतु निवड चुकीची झाली तर...तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही. तुम्ही तेवढे हुशारच आहात.

परिवर्तन अटल आहे

मित्रहो... निसर्गाचा एक नियम आहे, "परिवर्तन अटल आहे." याला कुणीच बदलू शकत नाही. तरीही मनुष्य सतत परिवर्तनाला घाबरत असतो. तो मान्यच करायला तयार नसतो, की जे आज त्याच्याकडे आहे, ते उद्या दुसऱ्या कुणाकडे असेल. तो सतत आपलं आपलं करत असतो. त्याला बदल मान्यच नाही. परंतु असा विचार करणे तुमचा मूर्खपणा आहे, तुमच्या विचार करण्याने जग चालत नाही. जे होणार आहे, ते होणारच आहे. त्याला कुणीच बदलू शकणार नाही. 

मित्रहो.. आज तुम्ही तरुण आहात, काही काळाने तुम्ही म्हातारे होणार आहात आणि नंतर मृत्यू. तसेच आज आनंद आहे, तर उद्या दु:ख असेल. हे मित्रहो अटल चक्र आहे. आणि ते असेच फिरत असणार आहे. यात आपला हाच रोल आहे, तो म्हणजे काळानुसार आपल्यात परिवर्तन करायला हवे. येथे काहीच स्थिर नाही आहे. ज्याचा जन्म झाला आहे, जे अस्तित्वात आले आहे, ते कधी ना कधी नष्ट होणारच आहे. आणि हे तुम्हाला मान्य करावेच लागेल

मित्रहो... महाभारत होण्याचे मुख्य कारण होते, ते म्हणजे कुणालाही परिवर्तन मान्य नव्हते. ज्याला त्याला सत्तेची ओढ होती. कुणीही सत्ता सोडायला तयार नव्हते. शेवटी काळ त्यांची वाटच पाहत होता. आणि झालेही तसेच. शेवटी सगळ्यांचा अंत झाला.

मित्रहो.. आपल्याला त्यांच्याकडून शिकवण घेतली पाहिजे. जे त्यांनी केले ते तुम्ही करू नका. प्रत्येकाने परिवर्तनशील असायला हवे आहे. तरच तुमच्या मनातला अहंकार आणि लोभ नष्ट होईल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी जीवन जगाल.                                     


मित्रहो... भगवान श्रीकृष्णाचे प्रेरणादायी विचार मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून पार्ट पार्टमध्ये पब्लिश करत राहील...

क्रमश...                 .                    






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!