वॉटर रिटेंशनमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सगळ्या प्रक्रियेत शरीर त्रासाने कोमेजून जाते. परंतु जर आपण आपली जीवन शैली व्यवस्थित ठेवली, तर अशा समस्या तुम्ही कमी करू शकता.
जर आपण चुकीची जीवन शैली आत्मसात केली तर, आपले शरीर अनेक व्याधींनी जखडले जाते. नेमकं कारण समजायला मुश्कील होऊन जातं. या सर्व कारणामुळे शरीरात नको ते बदल होणे सुरु होतात. जसे वजन वाढणे, अंगाला सूज येणे, अंगुठी घट्ट बसने ई. अशा जेव्हा व्याधी दिसायला लागतात, तेव्हा याचे कारण वॉटर रिटेंशन असू शकते. याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. जसं तुम्हाला माहीतच आहे, शरीरात ७० टक्के पाणी असते. आणि शरीराला समतोल ठेवण्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. परंतु जेव्हा शरीरात अतिरिक्त आणि अनावश्यक द्रवपदार्थ वाढू लागतात, म्हणजेच वॉटर रिटेंशन होते, तेव्हा मात्र तुम्हाला जाणीवपूर्वक शरीराकडे लक्ष देणे आवश्यक होते. अन्यथा हे वॉटर रिटेंशन तुमच्या शरीरात जे जे करेल, ते तुम्ही स्वप्नात देखील विचार केला नसेल.
थोडक्यात तुम्हाला अशी लक्षणे उती आणि पोकाल्यांमध्ये उद्भवते. त्यामुळे हात, पाय आणि घोट्याला सूज येऊ लागते. ही सूज कुठपर्यंत जाऊन पोहोचेल, हे सर्वस्वी तुमच्या लाइफ स्टाईल वरती अवलंबून आहे. जर तुम्हाला यातून मुक्तता हवी असेल तर, तुम्हाला स्वतःची लाइफ स्टाईलं चेंज करावी लागेल. यातून तुम्ही शरीरातील पाणी कमी करू शकता.
या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्यालाला प्रथम वॉटर रिटेंशन म्हणजे काय? वॉटर रिटेंशन होण्याची कारणे आणि वॉटर रिटेंशन कमी कसे करू शकतो ? याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
वॉटर रिटेंशन म्हणजे काय?
वॉटर रिटेंशन तेव्हा होते, जेव्हा वॉटर टिश्यूमधून जाण्यास अडचणी येतात. यामध्ये तुम्हाला पूर्ण शरीराला सूज येते किंवा ठराविक एरिया प्रभावित होतो.
वॉटर रिटेंशन होण्याची कारणे काय आहेत?
वॉटर रिटेंशन होण्याची अनेक कारणे आहेत, ज्या मुळे शरीरात अनावश्यक पाण्याची मात्रा वाढते. जाणून घेऊया कारणे जी तुमच्या वॉटर रिटेंशन होण्यास कारण ठरतात.
शारीरिक काम न करणे
काहीही काम न करता, सतत बसून किंवा उभे राहिल्याने शरीराभोवती द्रवपदार्थ नीट सर्कुलेट होत नाहीत. यामुळे, शरीराच्या ऊतींभोवती अनावश्यक पाणी साचते. ज्यामुळे हात आणि पाय सूजतात.
हृदय किंवा मूत्रपिंड रोग
या प्रक्रीयेमध्ये शरीराभोवती रक्ताचा सामान्य प्रवाहमध्ये अडथळा येतो. या कारणामुळे शरीरात द्रव जमा होते. त्यामुळे वॉटर रिटेंशन होते आणि शरीरावर सूज येते.
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असावे
मित्रहो शरीरात पाणी वाढणे, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की, पाणी कमी प्यावे. हे बिलकुल चुकीचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे आहे. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवता येते. तसेच तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स, अतिरिक्त मीठ आणि घाण देखील काढून टाकते.
नियमित व्यायामामुळे शरीर क्रियाशील राहते. आपल्या रक्ताभिसरण व्यवस्थेला योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत होते. तसेच पचन आणि मूत्रमार्गातून द्रव कमी करण्यास मदत करते.
खाण्याच्या वाईट आणि चुकीच्या सवयींमुळे
हाय सोडियम आणि उच्च कार्बन आहारामुळे पाणी शरीरात साचून राहते. त्यामुळे पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या कमतरता कमी होते आणि शरीरात व्याधी निर्माण होण्यास सुरवात होते.
ही पोस्ट वाचा : त्वचेला होणारी खाज कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा
ही पोस्ट वाचा : त्वचेला होणारी खाज कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा
वॉटर रिटेंशन कमी कसे करू शकता?
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असावे
मित्रहो शरीरात पाणी वाढणे, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की, पाणी कमी प्यावे. हे बिलकुल चुकीचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे आहे. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवता येते. तसेच तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स, अतिरिक्त मीठ आणि घाण देखील काढून टाकते.
नियमित व्यायाम करा
मीठ कमी खा
मीठ सोडियम आणि क्लोराईडने बनलेले असते. सोडियम तुमच्या शरीरातील पाण्याला योग्य ठेवते आणि तुमच्या पेशींच्या आत आणि बाहेरील द्रवांचे संतुलन राखण्यास मदत करते.
परंतु मित्रहो.. जर तुम्ही वारंवार जास्त मीठ असलेले पदार्थ खात असाल, तर मात्र तुम्हाला हे कमी करावे लागेल कारण सोडियममुळे तुमच्या शरीरात पाणी टिकून राहते. हे कमी करण्यासाठी, सोडियमचे सेवन कमी करणे आवश्यक आहे.
पोटॅशियम युक्त पदार्थांचे सेवन करा
पोटॅशियम द्रव पदार्थाचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत करते आणि युरीनचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे शरीरातून अतिरिक्त सोडियम कमी होण्यास मदत होते. यासाठी आहारात केळी, टोमॅटो यांसारखे पोटॅशियमयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे.
"मित्रहो.. समस्या मोठी आहे, परंतु वेळीच तुम्ही तुमच्या लाइफ स्टाईल मध्ये बदल केलेत तर, ही समस्या तुम्ही छोटी किंवा खत्म करू शकता. गरज आहे ती फक्त योग्य आहार आणि दररोज व्यायामाला जीवनाचा भाग बनवणे."
लेख आवडल्यास इतरांनाही शेअर करा... धन्यवाद