घरामध्ये किचन ही सर्वात महत्वाची जागा असते. आणि अशी जागा आपल्याला नीट आणि क्लीन ठेवणे फार आवश्यक असते. कारण आपल्या माणसांचे आरोग्य किचनच्या क्लीनेसवर अधिक अवलंबून असते. अशा वेळी जर तुम्ही किचन साफ करण्यात टाळाटाळ करत असाल तर, त्याचे परिणाम घरातील सगळ्यांच सहन करावे लागतात. यात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते.
एक गोष्ट आपल्याला नक्कीच मान्य करावे लागेल, ते म्हणजे ज्या घरामध्ये स्वच्छता असते. वातावरण आल्हादायक असते. शांती असते. अशा घरात राहायला सगळ्यांच आवडते. अशा घरात मन प्रसन्न होते. पाहुणे मंडळी त्या घराचं सतत कौतुक करत असतात.
परंतु कधी कधी घर सुंदर ठेवायच्या नादात आपण अशा काही जागांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे सुंदर घराचंही कौतुक फार कमी होते. त्या घराला शेवटी लोकं नावच ठेवत बसतात. ती जागा म्हणजे आपले किचन. मला वाटतं कितीही वेळ झाला किंवा कंटाळा आला म्हणून किचनच्या स्वच्छतेकडे कधीच दुर्लक्ष करू नये. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. घरातील लहान मोठे मेंबर आजारी पडतात. त्याचबरोबर लोकांनाही नावं ठेवायला जागा मिळते.
Read More : घरातील फर्निचरची काळजी कशी घ्यावी?
यामध्ये घरातील किचनमधली सर्वात नाजूक जागा असते ती म्हणजे, भांडी साफ करायचे ड्रेनेज. हे ड्रेनेज सतत साफ करणे आवश्यक असते. येते टाळाटाळ करणे तुम्हाला महागात पडू शकते. बऱ्याचदा लोकं उरलेलं अन्न पदार्थ दस्बीनमध्ये न टाकता, ते तसेच मोऱ्यामध्ये किंवा सिंकमध्ये टाकले जाते. आपण त्यानंतर दुर्लक्ष करतो. परंतु पुढे विनाआमंत्रित पाहुणे आपले काम करण्यास सुरवात करतात. हे पाहुणे तुमच्या घराचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम करतात. अशा गोष्टी जवळून जेवढ्या आपल्याला सोप्या वाटतात, तेवढ्याच त्या आपल्यासाठी खूप धोकादायक असतात, हे विसरणे फार चुकीचे असते.
बेस्ट किचन ड्रेनेज क्लीन टिप्स
घरातील सांडपाण्यापासून आणि ड्रेनेजमधील अडकेलेल्या खराब अन्नपदार्थांपासून होणारे नुकसान
तुम्ही ज्या नको त्या गोष्टी ड्रेनेज मध्ये टाकता. आणि नंतर ते साफ करणे विसरून जाता, त्या वरती अनेक जीव आपले जीवन जगतात, जसे झुरळ, उंदीर, पाल, तसेच अन्य घातक जीव. आणि शेवटी सर्वात म्हत्वाचे डास. हे डास अगदी माणसाला त्रासून सोडण्यात पटाईत. याची उदाहरणे तुम्ही जवळच पाहिली असतील.
यांपासून होणारे सर्वात नुकसान म्हणजे घरात सगळीकडे दुर्गंधी पसरली जाते. सगळीकडे डांस भन भन करत असतात. जेवणात, भाज्यांवरती, अन्य लिक्विड पदार्थांवरती बसल्यामुळे ते दुषित होतात. आणि जेव्हा आपण असे अन्नपदार्थ खातो, तेव्हा न चुकता डॉक्टरकडे जाण्याची पाली येते. कधी कधी घातक व्याधींना देखील सामोरे जावे लागते.
दुसरी गोष्ट म्हणजे, घरातील वातावरण अशांत बनते. पाहुणे मांडली जेव्हा घरात येतात, तेव्हा घरातील दुर्गंधीला कंटाळून तुमच्याकडे ते परत येत नाहीत. उलट काही पाहुणे तुमची बदनामी करण्यात पुढे असतात. अशा गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाहीच, बरोबर आरोग्याच्या दृष्टीने देखील ते तुमच्यासाठी घातक आहेत. मित्रहो.. किचन मधल्या या महत्वाच्या टिप्स तुमच्या सतत लक्षात असणे आवश्यक आहे.
किचन स्वच्छ ठेवण्याच्या हेल्पफुल टिप्स
तसे बाजारात घातक केमिकल्स मिळतात, परंतु मी तुम्हाला त्या वापरण्यास सुचवत नाही. परंतु बाजारात काही ड्रेनेज क्लीनर मिळतात, ते उत्तम प्रकारे साफ करण्याचे काम करतात. त्याच बरोबर जर तुम्ही असे ड्रेनेज क्लीनर जेव्हा सिंकमध्ये टाकता, तेव्हा त्यावरती भरपूर पाणी साठवून एकदम जोरात सोडून दिले, तर सिंकमध्ये अडकलेल्या पाईपमधून अन्नपदार्थ जोरात पुढे ढकलले जाते, त्यामुळे सिंकचा पाईप स्वच्छ होऊन त्यामधली घाण निघून जाते. पर्यायाने कोणतेही डांस, झुरळ किंवा अन्य घातक जीवांना अन्ना अभावी जगणे मुश्कील होऊन बसते. आणि त्यांचे प्रमाण कमी होते.
इतरही गोष्टी तुम्ही करू शकता, त्यामुळे डांस, झुरळ होणार नाहीत. परंतु माझ्या मते, अशा गोष्टी होवूच नयेत, म्हणून सुरवातीलाच काळजी घेतली पाहिजे. बरोबर ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण योग्य केले पाहिजे. यामुळे घरातला कचरा योग्य त्यावेळी, योग्य त्या ठिकाणी बाहेर फेकला जाईल.
तसेच वेळोवेळी घरचे ड्रेनेज साफ करत चला. हेच मुख्य कारण आहे, ज्यामुळे अनेक समस्या सुटल्या जातील. तसेच ड्रेनेज बरोबर किचनचा आजूबाजूचा भाग ही स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी होममेड लिक्विड बनवून, विना कोणत्या साईड इफेक्ट्स शिवाय वापरू शकता. यूट्यूब वरत्या अशा गोष्टी बनवण्याच्या विधी सोप्या पद्धतीने सांगितल्या जातात. त्या तुम्ही फॉलो करू शकता.
सावधानेतेच्या हेल्पफुल टिप्स
घर स्वच्छ ठेवण्याच्या नादात, घातक पदार्थांचा वापर करू नका. त्या आपल्यासाठी बरोबर लहानमुलांसाठी धोक्याचे ठरू शकते. घरामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे कचऱ्याची योग्य व्हील्लेवाट करता येते. घरात जमा झालेला कचरा दरोरोज कचरा कुंडीत टाकला पाहिजे. यामुळे डांस आणि अन्य कीटक जन्म घेत नाहीत. तुमचे घर स्वच्छ आणि नीट नेटके दिसते.
या काही ठराविक पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर, तुमचे घर सुंदर आणि आरोग्यशील होईल. यासाठी प्रथम आरोग्यशील गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे.