सुंदर आयुष्य कसं जगायचं? सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे

SD &  Admin
0


माझ्या रसिक वाचकांचं खूप खूप आभार. तुमच्या प्रेमामुळेच मला लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते. आज या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला ‘सुंदर आयुष्य कसं जगायचं’ या अति महत्वाच्या जीवनदायी विषयावरती माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

माणसाला मिळालेले हे सुंदर जीवन खूप अनमोल आहे. आणि म्हणून या जीवनाचं प्रत्येकाला सार्थक करता आले पाहिजे. कुणास ठावूक या जीवनानंतर माणूस पुन्हां धरतीवर जन्म घेतो का? या प्रश्नाच उत्तर मनुष्य जातीला कधीच अचूक सांगता येणार नाही. म्हणतात ते खोटे नव्हे, मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही. मी म्हणतो मेल्यावर तरी स्वर्ग दिसेल याची काय शास्वती आहे.

म्हणून माणसाने ईश्वराने दिलेल्या या सुंदर आणि अनमोल जीवनाचे काळजीपूर्वक ध्यान ठेवले पाहिजे. या जीवनरुपी स्थूल शरीराशी मस्ती करण्यापूर्वी पुढे मृत्यूदेवी तुमची आतुरतेने वाट पाहत आहे, याचे भान ठेवले पाहिजे.

या संपूर्ण मानवी अस्थिर विचारांचा अभ्यास करता मला जाणवते की, मनुष्य कुठेतरी आपले आयुष्य जगण्यास चूक करत आहे. त्याला या जीवनाशी प्रेम नाही. त्याला कसले भय नाही. परंतु जेव्हा शरीर त्याला धोका देण्यास सुरवात करते, तेव्हा त्याला जाग येते. त्याला जाणवते की, त्याने किती मोठी भयानक चुकी केली आहे. परंतु आता त्याला समजून काहीही उपयोग नाही, कारण वेळ कधीच निघून गेलेली असते. आता फक्त वाट पाहत बसायचे असते, कधी मृत्यू त्याला आलिंगन देईल.

माझ्या रसिक वाचकांना सांगू इच्छीतो की, आयुष्य खूप सुंदर आणि सरल आहे. त्याला अवघड करण्याचा प्रयत्न करू नका. एकदा का तुम्हाला सुंदर आयुष्य जगण्याचा मार्ग मिळाला की, तुम्ही या शरीराचा दीर्घकाळ आस्वाद घ्याल...  


सुंदर आयुष्य कसं जगायचं? सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे


माझं पान : Happiness life कसं जगायचं?


खूप सुंदर प्रश्न आहे. परंतु तितकाच तो समजण्यासाठी ही कठीण आहे. आणि मी खात्रीने सांगू शकतो की, माणसाच्या उत्पत्ती पासूनच हा प्रश्न त्याला सतावत आलेला असणार आहे. परंतु एवढा मोठा काळ निघून गेलेला असूनही माणसाला आपल आयुष्य अजूनही सुंदर कसं करायचं? हे समजल नाही
, याची मला खंत वाटते. माझ्या मते, माणसाचं हे दुर्भाग्य समजाव की त्याच्या कर्माच फळ, भगवान ही जाने.

मी माझ्या आयुष्यात कित्येक लोकांना पाहत असतो, जे सतत कोणत्या ना कोणत्या विचारात अडकून दु:खाने ग्रासलेल्या असतात. ते दुःखाच्या डोहात अडकून सुखासाठी धडपड करत असतात. परंतु सुख काय त्यांच्या पदरी पडत नाही. काही लोकांच्या नशिबी सगलं काही असतं , तरीही ते दु:खी असतात. ते ही असेच सुखाच्या शोधात असतात. परंतु त्यांच्या ही सुख काही पदरी पडत नाही. मग प्रश्न असा पडतो की, या जगात सुखी तरी कोण आहे? खरच! या जगात ‘आयुष्य सुंदर कसं जगायचं’ या अंकगणिताच कोड अजूनही कोणालाही सापडलं नाही आहे का?

तसं म्हटलं तर माणूस हा अंत्यत लोभी आणि महत्वकांक्षी प्राणी. या प्राण्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही आणि नाही त्याची महत्वकांक्षा कमी होत. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींच्या पाठीच असतो. त्या मिळवण्यासाठी धडपड करत असतो. हे सगलं करत असताना त्याला जर यश आलं तर हवेत भरारी मारत बसतो आणि अपयश आलं तर दुःखाच्या खाईत आपल डोकं अडकवून निपचित डोळ्यातील अश्रू पुसत बसतो. अपयश आलं म्हणून विचाराच्या दर्द डोहात इतका डुबून असा जातो की, त्याला आयुष्य जगावसच वाटत नाही. असा हा माणूस फक्त त्याला सुख पाहिजे असते. दुःखाची छोटीसी लहर सुद्धा त्याला पसंद नाही. छोट्या छोट्या अपयशाने देखील तो खचून जातो. आणि असे करत असताना तो शेवटी तो दुःखाच्या जाळ्यात अस काय अडकून बसतो की, तो देवानं दिलेलं सुंदर आयुष्यच जगायचं विसरून जातो.

काय म्हणावे या मनुष्य प्राण्याला, परमेश्वराने सगलं काही त्याच्या साठी उपलब्ध करून देऊन ही, याला आपलं आयष्य सुंदर-सुखी करता येत नाही आहे. मला वाटतं, याला त्याच्या बुद्धीचा निव्वळ मूर्खपणाच म्हणावा लागेल. माणूस म्हणून जगताना याला कोणत्या गोष्टींचा विसर पडला आहे, म्हणून तो या फालतू विचारांच्या गर्दीत अडकून पडला आहे, हेच मला मुळात समजत नाही.

मी आता पर्यंत अनेक गोष्टींच विचारमंथन करत आलेलो आहे. यामध्ये खूप काही गोष्टींचा उलगडा पडला अन काही माझ्या विचाराच्या पलीकडे वाटतात. परंतु या सगळ्या मध्ये “ आयुष्य सुंदर कसं करायचं?” या प्रश्नाचा उलगडा करताना मला अनेक अडचणी आल्या. प्रत्येकवेळी काही ना काही कमीच पडत होतं, असे वाटत होतं. आणि मला वाटत, ते कमीच पडत राहणार. याचं मुख्य कारण म्हणजे, या प्रश्नाशी माणसाच्या मनाशी, हृदयाशी आणि बुद्धीशी तार जोडलेली आहे. आणि मला वाटतं, जगातला कोणताही विचारवंत या प्रश्नाला पूर्णतः सोडवू शकत नाही. शाक्षात ब्रम्हदेव सुद्धा या माणसाच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि हृदयात साचलेला गुत्ता सोडवताना त्रासून जाईल.

परंतु काहीही असलं तरी, माणूस हा अत्यंत जिज्ञासू आणि प्रयत्नशील प्राणी आहे. त्याने धरतीवर केलेली विलोभनीय प्रगती आपल्याला विसरता येणार नाही. नक्कीच तो लोभी आहे, परंतु त्या पाठीमागे तो आपल्या येणाऱ्या पिढी साठी काहीतरी करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. हा भाग वेगळा आहे की, तो जे जे करत आहे, त्याचे अनेक चुकीचे परिणाम पुढील पिढीवर पडणार आहेत. परंतु त्याच्या साठी हे क्षुल्लक कारण आहे.

आज खूप काही माणसाने कमवून ठेवलं आहे. विज्ञाण्याच्या जोरावर त्याने अशक्य कामे शक्य करून दाखवली आहेत. अनेक आधुनिक उपक्रमे त्याने तयार केली आहेत. त्यांच्या सहाय्याने तो आपली कामे झटपट करत असतो. त्याला जे पाहिजे ते तो करू शकतो. स्वतःच्या शरीराला जास्त मेहनत नको म्हणून तो अतिशय अधीर आणि प्रयत्नशील असतो. खरच.. माणसाची बुद्धी एक खतरनाक बॉम्बच आहे. कधी काय करेल हे, कोणीही सांगू शकणार नाही.

या सगळ्या गोष्टीच्या आधारे, माणसाच्या भूमिकेचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला जाणवून येईल की, माणूस हे सगलं करताना स्वतःला सुखी मानतो आहे
? खरच.. त्याने एवढी मोठी प्रगती केली आहे, त्याने तो सुखी आहे का? तो खरच सांगू शकतो, तो पूर्णतः सुखी आहे? त्याच्या सगळ्या इच्छा, आकांश पूर्ण झाल्या आहेत? काय वाटतं तुम्हाला?

तरीही काहीही असलं तरी, माणूस स्वतःला सुखी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. सुख या एकाच वलया भोवती माणूस भरकटत असतो. जर आपण विचार केला तर, कोणीही सांगू शकेल, धरती वरचा प्रत्येक जीव आपल्या शारीरिक आणि मानसिक सुखासाठीच एवढा मोठा खटाटोप करत असतो. या दोन गोष्टी नसतील तर त्याच्या जीवनाला काय उपयोग आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, सगळ्या गोष्टींमागे सुख हे कारण दडलेलं असतेच. आणि या सुखाला माणूस उत्पत्ती पासून शोधत आला आहे. दुर्भाग्य एवढच आहे की, एवढा मोठा काळ निघून गेल्या नंतर ही माणसाला अजून ही सुख काही भेटले नाही.

असो... शेवटी तुम्हाला समजलेच असेल की, आपण येथे कोणत्या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी आलो आहोत ते. आणि मी तुम्हाला आता पर्यंत केलेल्या अनुभवातून सांगणार आहे की, सुखी जीवनासाठी काय आवश्यक आहे. खरं.. पाहता सुख हे आपल्या अंतर मनामध्येच असते. ते आपल्या भोवतीच असते. परंतु ते आपल्या पकडीत येत नाही. काय कारण असेल? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण या माझ्या “सुंदर आयुष्य कसं जगायचं” या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मला खूप खूप आनंद होत आहे की, या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासाठी काहीतरी चांगल देण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं माणसाने प्रत्येक गोष्टीतून आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला सांगतो, आनंद हा कुठे स्वतः उत्पन्न होत नाही, तर तो आपण स्वतः निर्माण करायचा असतो. यासाठी प्रथम स्वतःमध्ये चांगले बदल घडविणे आवश्यक आहे. ते कोणते आहेत. ते जाणून घेऊया.      
        
                                       

सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे


सुखी आयुष्य जगण्यासाठी माणसाला प्रथम स्वतःला परिथितीनुसार बदलायला शिकले पाहिजे. आवडतं म्हणून त्याच्यातच गुंतून जाऊ नये. या जगात कोणत्याच गोष्टीचा अति प्रमाणात उपभोग घेऊ नये. जर असं घडत असेल तर, वेळीच स्वतःला सावरा. अन्यथा समजून जा की,  तुमच्या जीवनात फार मोठ्या घातक घडामोडी घडणार आहे.

एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, माणसाची आंतरिक गोष्टीच मग त्या कोणत्याही असतील, त्याच अधिक त्याला अधिक पिडा देतात. यातून सावरण्यासाठी त्याला प्रत्येक गोष्टीचा समतोल राखता आला पाहिजे. तसेच हे करण्यासाठी माणसाकडे संयम ही असावा लागतो. अधिकांश लोक याच करणामुळे अधिक दु:खी असतात. आणि याच दु:खात बुडून आपलं आयुष्य बरबाद करून घेतात.

आपल्याला यातून सुटका करून घेण्यासाठी आणि सुखी आयुष्याच्या घरात नांदण्यासाठी, आपल्याला सुंदर सुखी आयुष्याची सूत्रे माहित असणे आवश्यक आहे. तसेच ती आचरणात आणणे खूप महत्वाचे आहे. नुसतं  माहिती असून उपयोग नाही. माझा विश्वास आहे, ही अमुल्य सूत्रे तुमच्या जीवनात नक्कीच आनंद घेऊन येतील.

 स्वतःला ओळखा   


माणूस जेव्हा दु:खी असतो, तेव्हा स्वतःला विसरूनच जातो. तो कोण आहे, तो काय करत आहे, याचे त्याला थोडी पण कल्पना नसते. स्वतःला तो तुच्छ मानतो. मला सांगा असा व्यक्ती स्वतःलाच ओळखत नाही. स्वतःवर प्रेम करत नाही. अशी व्यक्ती कशी काय जीवनात समाधानी असेल. माझ्या मित्रानों जीवनात सुखी आणि आत्मविश्वासी बनायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. किंबहुना तुम्हाला करावेच लागेल. तुम्ही जेव्हा तुमच्या अंतरमनावरती प्रेम कराल. स्वतःला या जगातला महत्वाचा घटक समजाल, तेव्हाच तुम्ही स्वतःवर प्रेम कराल. आणि एकदा का तुम्ही ही पायरी जिंकलीत ना... मग तुम्हाला सुखी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आणि एक गोष्ट, जो माणूस स्वतःवर अधिक विश्वास आणि प्रेम करतो ना.. त्याला कोणीच दु:ख देऊ शकत नाही.                           

प्रथम विचार आणि सवयी बदला

माणसाच्या मनावर विचारांचा आणि सवयीचा फार मोठा प्रभाव पडलेला असतो. असे म्हटले जाते, माणसाचे जसे विचार आणि स्वभाव असतो, तो त्याच प्रकारे अंतरमनाने वागत असतो. समोर वेळ त्याला चुकीच्या मार्गावरून दूर जाण्यास खुणावत असते, परंतु तो बुरसट विचार आणि सवयीमुळे स्वतः मध्ये बदल करण्यास घाबरत असतो. काही तरी चुकीचे तर होणार नाही ना.. म्हणून सतत कचरत असतो.

खरच, ही फार चुकीची सवय आहे. यामुळे मनुष्य सतत दु:खात असतो. सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीत तो सापडत असतो. अशी माणसं सतत घाबरत असतात. तुम्हाला खरच, आनंदाच्या झाडाचा अनुभव करायचा असेल तर, तुम्हाला परिस्थिती नुसार स्वतःला ओळखून, समजून विचार आणि सवयी बदलल्या पाहिजेत.

प्रथम स्तःवर प्रेम करायला शिका

स्वतःला कमी लेखने, स्वतः मध्ये काही कमी आहे, अशी सतत भावना निर्माण होणे, मी  हे करूच शकत नाही, असे विचार तुम्ही करता आणि त्या प्रकारे वागू लागता, तेव्हा समजून जा की तुम्ही खऱ्या सुखी जीवनाची पटरी चुकला आहात. असे तेव्हा घडते, जेव्हा तुम्ही स्वतः वर प्रेम करत नाही. स्वतःवर प्रेम न करणारा मनुष्य असे नकारात्मक विचार करून, स्वतःबद्दल अनेक गैरसमज निर्माण करून घेतो.

अशा अंधकारमय जाळ्यातून सुटका करायची असेल तर, तुम्हाला प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करणारा मनुष्यच सतत सकारात्मक विचार करत असतो. छोट्या छोट्या दु:खाने तो कधीच हार मानत नाही. पुढे काहीतरी चांगलच होणार आहे, ही आशा फक्त स्वतःवर प्रेम करणारा मनुष्यच करू शकतो.      

आणि असा मनुष्य स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर, अनेक अशक्य कामे शक्य करून दाखवतो.

आपल्या बुद्धी मध्ये आणि पोटात कधीच वाईट गोष्टीचा संचय करू नये

मिळेल त्या गोष्टीत समाधान मानणारा मनुष्य, सतत आनंदाच्या झाडाची फळे खात असतो. तो विनाकारण कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही. अशी लोकं जे काही कमवतात, ते सर्व त्यांनी मेहनातीनेच कमावलेलं असतं. अशी माणसं दुसऱ्याच्या यशाने कधीच जळत नाही. दुसरा किती श्रीमंत आहे. त्याच्या कडे किती पैसा आहे. या बद्दल ते कधीच विचार करत नाही. अशी लोकं सुखी जीवनाची व्याख्या अचूक जाणत असतात.

याच्या उलट आपल्या बुद्धी मध्ये वाईट विचार करणारी लोकं, सतत दुसऱ्या लोकांवर जळत असतात. दुसऱ्याच्या यशाने ते दु:खी होऊन जातात. सतत ते कुरगुडी करण्याचा प्रयत्न करत असतात. असा घाणेरडा विचार करून ते स्वतःच्या बुद्धीला चिखलात फेकून देतात. मग अशी लोकं कशी काय आनंदी होऊ शकतात. 
         
         

 स्वतः मधला मी पणा काढून टाका

मीच हुशार आहे. मलाच सगलं येते. माझ्या शिवाय हे कोणीच करू शकत नाहीत अशी भावना मनात असणारी लोकं सतत चिखलात पडत असतात. खरं तर.. या लोकांच ज्ञान हे अधुरं असतं. पण ते मान्य करायला तयार नसतात. ते सतत आपल्या पेक्षा कमी ज्ञानाने असणाऱ्या लोकांपुढे बडाया मारत असतात. परंतु जेव्हा कधी यांचा असली बाप त्यांच्या समोर येतो, तेव्हा त्यांची सारी हेकडी निघून जाते. सतत काहीतर लोकांच्या उणीवा काढण्याचे काम करणारे हे मनुष्य सतत दुःखाच्या ओझ्याखाली पडत असतात. त्यांना त्रास तर होत असतो, परंतु अहंकारा मुळे ते आपला स्वभाव बदलायला तयार नसतात.

आयुष्य हे लहान मुलांसारख जगावं

मला वाटतं, सुखी आयुष्य जगण्याचा हा सर्वात्तम मार्ग आहे. हे वय म्हणजे, जणू काही आनंदाचं झाडचं. या झाडावर फक्त आणि फक्त सुखच प्राप्त होतं. याच कारण असं की, यांचं मन फुलासारखं सुंदर आणि निरागस असतं. अहंकाराला येथे मुळीच जागा नसते. यांच्या मनात इतरांविषयी थोडी देखील दृष्ट भावना नसते. त्यांच्या मनात आपण या जगात काही मिळविण्यासाठी आलो आहोत, हे त्यांना वाटतच नाही. त्यांना फक्त प्रत्येक गोष्टीतून आनंद घ्यायचा असतो. त्यांना आपलं आणि परकं काहीच समजत नाही. जे त्यांच्यावर प्रेम करतात, ते त्यांच्याकडे आकर्षित होतात.

यावरून आपल्याला समजलच असेल, की आयुष्य हे लहान मुलांसारखं का असावं? आपल्याला पण सुखी जीवन अनुभवायचं असेल ना..तर, एकदा लहान मुलांसारखं जीवन जगून बघा. खरच.. तुम्हाला वाटेल, आयुष्य हे आपणच अवघड करून ठेवत असतो.

 स्वतःवर विश्वास असावा

आपण जे काम करतो किंवा आपल्याला जे काही करायचं आहे, त्यावर आपला विश्वास असणे गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजेच तुम्ही जे पण करता ते प्रामाणिकपणे आणि आनंदाने करता. तुम्ही ते काम या साठी करत नाही, की तुम्हाला त्यातून काही मिळणार आहे. तर.. तुम्ही यासाठी करता, की त्यातून तुम्हाला आनंद मिळत असतो.

स्वतःवर विश्वास असणे आणि आनंद यांमधलं अंतर जरी तुम्हाला अधिक वाटत असलं तरी, ते नक्कीच एकमेकांचे पूरक आहेत. त्यांचं कोणतं ना कोणतं हे नात आहेच.

अपेक्षांचं ओझ खाली उतरून द्या

अपेक्षा माणसाला नको ते करायला भाग पडतात. सतत माझ्याकडे हे कमी आहे, ते कमी आहे. ते मला मिळवायचे आहे. असं काही ना काही आपण अपेक्षांचं ओझं आपल्या डोक्यावर ठेवत असतो. यात आपण हे विसरून जातो की, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील, हे सांगता येणार नाही, किंबहुना होतच नाहीत. मग आपल्या मनासारखं झालं नाही की, आपण दु:खी होऊन बसतो. काही तरी आपल्याकडे कमी आहे, म्हणून सतत विचार करत बसतो.

आपल्याला हे ओझं उतरायला हवं आहे . हे ओझं माणसाला मानसिक दृष्ट्या विकलांग करून टाकते. येणाऱ्या सुखाला अडवण्याचा प्रयत्न हे अपेक्षांचं ओझं करते. ते ओझं वेळीच उतरायला हवं. अन्यथा ओझ्याचा भार वाढत जातो आणि तुम्ही कायमचे त्याखाली दबून जाता.

दुसऱ्याचे अनुकरण करणे टाळाव


दुसऱ्याचे अनुकरण करणे, हे मी सगळ्यात मूर्खपणाचे लक्षण समजतो. अशी व्यक्ती सतत दुसऱ्याचे अनुकरण करताना दिसते. तो हे करत आहे, तर मी पण तेच करणार. त्याचे कडे ही महागडी वस्तू आहे, तर ती माझ्याकडे ही हवी आहे. सतत ते दुसऱ्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असतात. मग मला सांगा.. अशी व्यक्ती कधी सुखी होऊ शकते? जी व्यक्ती आपलं सुख दुसऱ्याच्या सुखाला वाईट नजरेने बघून मिळवण्याचा प्रयत्न करते, त्या  व्यक्तीला सुख कसं काय भेटू शकतं.

माणसाने आपले आयुष्य हे दुसऱ्यावर अवलंबून न ठेवता. त्याला जे काही मिळवायचे असेल, ते मेहनतीने मिळवण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे.


Read More: चांगले विचार : तुमच्या आयुष्यातील चांगली कामे कोणती आहेत?
                                           

१० स्वतःला काय वाटते तेच करा

दुसरा हे करत आहे, म्हणून आपण ही हेच करायला हवं, असं करणे खरच.. चुकीचे आहे. यात आपण आपला विनाकारण वेळ वाया घालवत आहोत, असे मला वाटते. दुसऱ्याच्या घड्याल्याच्या काट्यावर, आपल्या जिवनाचं गणित चुकुवू नका. असं करणे, आपल्या यशस्वी होण्याचा मार्गात अडथला निर्माण होतो.

या पेक्षा तुम्हाला काय वाटते, तेच करा. तुमचा आनंद कशात आहे. तुम्हाला समाधान कशात मिळत आहे. आणि स्वतःवर विश्वास ठेऊन, तुमच्या मनाने जे चांगलं ठरवलं आहे, त्याचा आदर करा. एक सागतो, जो आपल्या मनाला चांगला विचार करायला लावतो आणि त्या प्रकारे वागतो, तो मनुष्य जीवनात आनंदाचं मिळवतो.

११ राजहंसा सारखा स्वभाव असावा - पानी आणि दुध वेगळ करने

या जगात काय चांगल आहे आणि काय नाही आहे, याच अचूक मुल्यांकन माणसाला करायला हवं आहे. जसं मी वरती म्हटलं आहे की, माणसाचा स्वभाव हा राजहंसा सारखा असायला हवा. कारण असे की, राजहंस हा पाणी आणि दुध या मधला फरक ओळखून, दोघांना ही वेगळ करण्यात माहीर असतो. तो बरोबर दुधच पिणार. असं माणसाला ही करता येयला हवं आहे. या जगात चांगलं ही आहे आणि वाईट ही आहे. यातून माणसाला फक्त चांगलच निवडायला हवं आहे. प्रत्येक गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाला आपण सुखाची व्याख्या देता येणार नाही. जे सुख आपल्याला मिळतंय, त्या सुखामुळे इतरांना त्रास तर होत नाही आहे ना.. असा जो व्यक्ती विचार करतो..तोच खरा राजहंस.

१२ कोणाशीही स्पर्धा करू नका

जेथे स्पर्धा असेल, तेथे नक्कीच मेहनतीने ती जिंकण्याचा प्रयत्न करा. परंतु यात तुम्ही प्रतिस्पर्धी असणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा करू नका, तर तुम्ही तुमच्या खेळाला १००% पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. तुम्हाला सांगतो, विजय तुमचाच असेल.

अशात जर तुमच्या पदरात अपयश आलं तर, कोणाला ही दोष न देता. पुनः ती मेहनतीने जिंकण्याचा प्रयत्न करा. परंतु येथे तुम्हाला एक लक्षात ठेवायला हवं आहे, कधीच कोणाशी स्पर्धा करू नका. दुसऱ्या व्यक्तीशी स्पर्धा केल्याने, तुम्ही सतत दडपणा खालीच असणार. तुम्ही आनंदाने कधीच खेळू शकणार नाही. आनंदाने न खेळल्याने अधिकतर तुमच्या पदरात हारच पडेल.       
       

 १३ कोणताही मोह मत्सर करू नये

एखाद्या गोष्टीचा अति मोह, मत्सर करणे, आपल्याला कधी ना कधी वाईट परिणामांना सामोरे जावे लागणार हे मात्र नक्की. स्पर्धेच्या युगात. दुसऱ्या माणसाचे यश, श्रीमंती पाहून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल चुकीचा मोह, मत्सर निर्माण होतो. त्यांना वाटत असत, त्यांच्याकडेही असेच असले पाहिजे. म्हणून ते नकोते आटापिटा करत असतात. चुकीच्या मार्गाने ते मिळविण्याचा प्रयत्न करतात.

अशा या सगळ्या गोष्टींचं फळ, काय असणार हे तुम्हाला सांगायला नको. एक सत्य आहे. चुकीचा मार्ग तुम्हाला एक दिवस खड्यात टाकणार म्हणजे टाकणारच. खर तर.. माणूस हे विसरूनच गेला आहे.

१४ क्रोधावरती नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे

क्रोध हा विनाशाचा जन्मदाता आहे. जेथे क्रोध आला तेथे विनाश हा अटल असतो. आनंदाच्या झाडाची चीरफाड जो करतो, तो म्हणजे क्रोध. तुम्ही अति क्रोध आणि कारण नसताना ही क्रोधाला आमंत्रण दिलं, तर तुम्ही कधी आनंदाला आपल्या जवळ पाहू शकणार नाही. तुम्ही अशा माणसाना पाहिलं की, तुम्हाला नक्कीच किळस येणार. त्यांचा चेहरा देखील भयानक दिसत असतो. बघताच क्षणी तो काही तरी वाईट करेल, असे आपल्याला वाटत असते. अशा माणसांच्या सहवासात कोणाला ही राहायला आवडत नसतं. अशी माणसं शक्यतो एकटीच राहतात आणि त्यांचे मित्र-मंडळी ही त्याच गुणाचे दिसतील.

या साठी माणसाला क्रोधाला नियंत्रित करता आलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की, क्रोध करूच नका. कधी कधी वाईट गोष्ट नष्ट करण्यासाठी क्रोध आवश्यकच आहे. परंतु आपल्याला माहित असलं पाहिजे की, आपण जो क्रोध करत आहोत, त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालं पाहिजे. चांगल्या साठी क्रोध वाईट नाही. परंतु आपल्या स्वार्थासाठी क्रोध नक्कीच चुकीचा आहे. त्याचे परिणाम पुढे वाईटच होतात.   
              
        

१५ सगळीकडे सकारात्मक दृष्टीने बघावे

आपल्या मनाला आनंदी ठेवायचे असेल तर, तुम्हाला प्रथम सगळीकडे सकारात्मक दुर्ष्टीने बघावे लागेल. सकारात्मक दृष्टीकोन वाईट आणि दु:खद गोष्टीवर विजय मिळवण्याचे औषध आहे. एकदा विचार करा, जेव्हा तुम्ही खूप दु:खी असता, त्यावेळी काय करावे आणि काय नाही असे तुम्हाला होऊन जाते. परंतु जेव्हा तुम्ही एका सकारात्मक दृष्टीने त्या दु:खा कडे बघता, विचार करता, कधी ना कधी हे दु:ख, ही वाईट वेळ निघून जाणारच आहे, त्यावेळी तुम्ही दु:खातून बाहेर पडण्यासाठी यशस्वी प्रयत्न करता.  .

दु:खाचे दार बंद करून आनंदाचे दार उघडण्याची ही चावी तुमच्या जीवनाला खरोखर नवीन सुखाचा मार्ग दाखवते. तुम्हाला ही असच केलं पाहिजे. येणाऱ्या दु:खाला न घाबरता त्याला संयमाने सामोरे जाऊन, त्यातील गुत्ता सोडविण्याचे काम केलं पाहिजे. दु:ख आलं म्हणून मी आता करू, असं म्हणत बसण्यापेक्षा, त्याला सकारात्मक दृष्टीने बघून, तसेच आपल्या जीवनाच्या परीक्षेचा भाग समजून, तो पेपर सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. माझा विश्वास आहे, तो पेपर नक्कीच तुम्ही विश्वासाने सोडवाल.


१६ प्राणी आवश्यक असेल तितकेच मिळवतात, बाकी उरलेले  दुसऱ्यासाठी ठेवतात हा गुण आपल्या जवळ ठेवा

मनुष्य हा लोभ आणि मोहापायी सगलं काही मलाच मिळूदे, म्हणून प्रमाणापेक्षा मिळविण्याचा प्रयत्न करतो. त्याला त्याची मर्यादा माहिती असूनही लोभापायी स्वतःला आणि घरच्यांच्या इच्छा पूर्णकरण्यासाठी काहीही करण्यास तयार राहतो. या सगळ्यात तो स्वतःला वाईट चक्रात अडकवून घेतो. आपल्या भुकेपेक्षा अधिक मिळविण्याच्या मोहापायी तो सतत वाईट विचारत आणि दु:खात अडकलेला असतो.

मला वाटतं, एवढे कमवून जर, तुम्हाला सुखच मिळत नसेल तर, एवढा मोठा खटाटोप कशाला. जेवढ मिळतं तेवढ्यात समाधान मानलं तर, दु:ख अधिक काळ तुम्हाला त्रास देणार नाही. प्राण्यांचं उदाहरण घ्या. कोणताही प्राणी असो. तो कधीच भुके पेक्षा अधिक मिळवत नाही. त्याचबरोबर कदाचित त्याने अधिक काही कमावलं असेल तर, ते दुसऱ्यासाठी ते सोडून देतो. असा चांगला गुण जर प्राणी आपल्या अंगी ठेवतात, तर बुद्धिमान मनुष्याला का जमत नाही.

 १७ छोट्या छोट्या संकटाला घाबरून दु:ख करत बसू नये

माणूस जरी बुद्धिमान प्राणी असला तरी, त्याच मन हे अति चंचल आणि भावनेच्या आहारी जाऊन दु:ख करत बसतं. छोट्या छोट्या संकटाला बळी पडून, दु:ख करत बसतं. आता काय होईल? काय नाही होईल? अशा नकारात्मक विचारणं ते अंधारात डुबून जातं.

गोष्ट छोटीसी असते. तो संयमाने विचार केला तर लगेच सुटणारी देखील असते. परंतु अति विचार आणि सतत असमाधानी यामुळे मनुष्य सरल चाललेल्या जीवनाला कठीण करून टाकतो. मला वाटतं, सुखी जीवन जगण्यासाठी अशा गोष्टी घातक असतात.

१८ दु:खा नंतर सुख आणि सुखानंतर दु:ख हा क्रम कोणालाही चुकलेला नाही

माणसाला सुखी जीवनाची सूत्रे आणि नियम माहित असायला पाहिजेत. ही सूत्रे, हे नियम त्याला प्रत्येकवेळी आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे की चांगलं करत आहोत, यांपासून सावधान करत असतात. तसे म्हटल्याप्रमाणे दु:खा नंतर सुख आणि सुखानंतर दु:ख हा क्रम कोणालाही चुकलेला नाही. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर, तुमची अर्ध्यापेक्षा अधिक संकट अपोआप सुटतील.        

मनुष्य जन्म म्हटला की त्याला सुख-दुःखाच्या चक्रातून जावच लागतं. मग ती व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब. परंतु निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी स्थिर नसते. ती कधी ना कधी नष्ट होणारच आहे. तर मग माणसाला हे कळायला हवं की, दु:खे जरी आली तरी ती कधी ना कधी नष्ट होणारच आहे. म्हणून त्याने संकट आल्याने दु:ख करण्या ऐवजी त्यातून कसे बाहेर येत येईल, या कडे लक्ष दिले पाहिजे.

 १९ ईश्वरावर विश्वास ठेवा

हे सारं ब्रम्हांड ईश्वरचं प्रतिक आहे. आणि त्यामध्ये असणारी ही आपली धरती देखील त्याच ईश्वरचं अंश आहे. आणि त्या धरतीवर वास करणारे आपण त्याचबरोबर अन्य सर्व जीव प्राणी ही त्या ईश्वराचे अंश आहेत. हे जेव्हा आपण सत्य माणू, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जीवन जगायला सुरवात करू.

ईश्वरावर श्रद्धा आणि विश्वास आहे, हा एकच विश्वास मनुष्याला वाईट कामापासून दूर ढकलत असतो. मनुष्य घाबरत असतो की, तो जे वाईट काम करत आहे, ते काम वरून ईश्वर बघत असतो. या आपल्या वाईट कामाचं फळ देखील ईश्वर आपल्याला वाईटच देणार म्हणून आपण घाबरत असतो. ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे या धरती वर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करणे होय.

२०  मनावर संयम ठेवा

मनावर संयम असणे खूप गरजेचं आहे. संयम नसेल तर मनुष्य जनावरांप्रमाणे उधळत सुटतो. त्याला बिलकुल लगाम नसतो. कोणतीही गोष्ट तो विचार करून कधीच करत नाही. तर त्याला ती गोष्ट पाहिजेच, त्या गोष्टीवर फक्त त्याचाच अधिकार आहे, असे समजून तो कशाचाही विचार न करता त्या गोष्टीवर तुटून पडतो. अशा वेळी तो हा विचार बिलकुल करत नाही की, तो जे काम करत आहे ते चांगल आहे की वाईट.

अशा या चुकीच्या कृत्यामुळे, तो निसंदेह खड्यातच पडतो. या वेळी तो एवढ्या खोलवर खड्यात पडलेला असतो की, त्याला वाचवायला देखील कोणी येत नाही. म्हणून जेवढे होईल तेवढे मनावर संयम ठेवणे, तुमच्या सुखी जीवनासाठी आवश्यक आहे.

२१  जीवनात चांगलीच माणसे निवडा

असं म्हटलं जातं, ज्यांनी आपल्या आयष्यात चांगली माणसं जोडली, ती लोकं लवकर यशस्वी होतात. आणि हे तितकच खरं आहे. याच कारण असं की, भविष्यात कधी माणूस संकटात सापडतो, तेव्हा त्याला मदत करण्यास ही माणसं धाऊन येतात. त्याला पाहिजे ती मदत करतात. आणि त्याला संकटातून बाहेर काढतात.

म्हणून जीवनात माणसं निवडाल तेव्हा, अचूकपणे त्यांची पारख करून, त्यांना आपल्या आयुष्यात प्रवेश द्या. वाईट लोकं निवडाल तर, तुमचे आयुष्य देखील वाईटच असेल.

२२  प्रत्येकाच्या सुख दु:खात साथ द्या

मदत करणे हा गुण प्रत्येक माणसाला अंगीकारला पाहिजे. एक नैसर्गिक नियम आहे. तुम्ही जेवढ दुसऱ्याला द्याल, तेवढी तुमच्या आयुष्यात संकट कमी येतील. म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त आनंदी राहाल. या साठी प्रत्येकाला एक दुसऱ्याला मदत करणे, एक दुसऱ्याला सुख-दु:खात साथ देणे आवश्यक आहे.

एक दुसऱ्याला साथ दिल्याने नाती घट्ट होतात. प्रत्येकजन आपलाच कोणीतरी आहे, म्हणून संकटात सतत साथ देतात. वेळो-वेळी मानसिक आधार देतात. हे सगलं एकाच गोष्टीमुळे साध्य होत. ते म्हणजे तुमचा दुसऱ्याला देण्याचा गुणधर्म.


Read More:
 आठवणीतल्या सरी : मनातले चांदणे

२३  प्रेम आणि तिरस्कारामध्ये प्रेमाला निवडा


राजहंस माहिती आहे. हा राजहंस पाणी आणि दुध सहजरीत्या वेगळ करतो. त्याचा तो गुणच आहे. तसेच माणसाला प्रेम आणि तिरस्कारा मध्ये एकाला निवडायचे असेल तर, प्रेमाला निवडा. कारण प्रेम हे ईश्वराच प्रतिक आहे. यात असीम आनंद आणि सुख आहे. या नियमाप्रमाणे, प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि तिरस्कार दिल्याने परत तिरस्कारच मिळतो. हे युद्ध मनुष्य त्याच्या उत्पत्ती पासूनच लढत आला आहे.

यातून तुम्हाला बोध घ्यायला शिकलं पाहिजे की, आपल्या यातून निष्पन्न काय होणार आहे? जर तुम्हाला शांती पाहिजे असेल तर, तुम्ही प्रेम निवडाल आणि जर तुम्हाला अशांती, दुख, संकट पाहिजे असतील तर तिरस्कार निवडाल. हे सगलं तुमच्यावरतीच अवलंबून आहे.

२४  काहीतरी नवीन होणार आहे यावरती विश्वास ठेवा

आपल्या जीवनात काही ना काही घडतच असते. काही गोष्टी चांगल्या घडत असतात तर काही वाईट. पण काहीतरी घडतच असतं. पण कधी कधी आपलं आयुष्य अशा मोड वरती येते, तेव्हा आपण गांगरून जातो. आपल्याला काय करायला हवं आहे, तेच समजत नाही. आपण दुःखाच्या गर्दीत जाऊन अडकून बसतो. अशा वेळी आपल्या कडे कोणता मार्ग शिल्लक राहतो की, त्यातून आपण बाहेर पडू शकतो.

खरं तर मार्ग भरपूर आहेत, पण ते सर्व निश्चित नाही आहेत. मग या वरती उपाय काय? तर यावरती एकच भक्कम उपाय आहे, तो म्हणजे आपल्यावरती स्थिर विश्वास आणि पुढे काहीतरी आपल्या जीवनात नक्कीच काहीतरी चांगल होणार आहे, यावरती विश्वास. एक सांगतो, आपण जसा मनातून ईश्वराला साक्षी मानून विचार करतो ना.. तसीच आपल्या जीवनात कृती घडत असते. अशी एक शक्ती आहे, ती आपल्या मनामधल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत करत असते. ती म्हणजे आपली आत्मशक्ती. ही आत्मशक्तीची ईश्वराच्या इच्छाशक्तीशी लिंक जोडलेली असते. म्हणून घाबरून न जाता, ईश्वरावर विश्वास ठेवा की, पुढे काही तरी नक्कीच चांगलं होणार आहे.

मित्रहो.. ही सूत्रे नक्कीच तुम्हाला एक चांगले जीवन जगण्यासाठी मदत करतील. याचा मला विश्वास आहे. कुठे काही कमी पडलं तर, ते नक्कीच तुम्ही भरून काढा. आणि आपल्या जीवनाला यशस्वी करा..

धन्यवाद...         

           

 

 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!