स्टोन थेरपी काय आहे ? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ?

SD &  Admin
0


"स्टोन थेरपी" अर्थातच दगडाचा वापर करून केलेली वैदिक थेरपी म्हणजे स्टोन थेरपी. तसी ही थेरपी वैदिक काळापासून सुरु आहे. आणि आज २१व्या आधुनिक शतकात ही या स्टोन थेरपीचा तितकाच आदरतेने वापर होत आहे. एक आरोग्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी ही थेरपी खूपच कामी येते. जाणून घेऊया येथे स्टोन थेरपी काय आहे? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ? 

काळ बदलत जातो, समाज बदलत जातो, लोकं बदलत जातात, त्याचबरोबर परंपरा देखील काळानुरूप  बदलत राहतात. मित्रहो हे जरी सत्य असले तरी, आज ही काही गोष्टी अशा आहेत, त्या वैदिक काळापासून आजपर्यंत अखंडित सुरु आहे. याचे येथे कौतुक करायला पाहिजे. त्यापैकी एक वैदिक काळापासून चालू असणारी स्टोन थेरपी आज ही लोकं तिचा वापर करून आजारांवरती मात करत आहेत.

तसं म्हटलं तर, आज आधुनिक शतकात अनेक थेरपी माणसाने शोधून काढल्या. त्यापैकी काही सर्जरी द्वारा करण्यात येतात तर, काही वैदिक पद्धतीने करण्यात येतात. सर्जरी द्वारा करण्यात येणाऱ्या थेरपी या शरीराचे खूप नुकसान करतात. बरोबर त्या खूप खर्चिक ही असतात. सामान्य लोकांना त्या परवडू देखील शकत नाहीत.

परंतु वैदिक पद्धतीने केलेल्या थेरपी या स्वस्त ही असतात आणि त्याचा शरीरावर कोणताच वाईट परिणाम होत नाही. उलट त्याचा फायदाच होतो. बरोबर  त्याचे चांगले परिणाम देखील ही मुळांपासून दिसून येतात. खरच आपल्याला आभार मानायला हवेत, ज्यांच्या निर्मितीमुळे आपण स्वस्त आणि कोणत्याही वेदनेरहित थेरपीचा वापर करत असतो.

जाणून घेऊया प्रथम स्टोन थेरपी काय आहे? ज्यामुळे आपल्याला तिची मुळांपासून प्रचीती घेता येईल.

स्टोन थेरपी काय आहे ?
Image Credit to Canva.com

What is stone therapy?  स्टोन थेरपी म्हणजे काय?


स्टोन थेरपी ही एक थर्माथेरपी आहे, तिचा वैदिक काळापासून वापर होत आलेला आहे. ज्यामध्ये विविध आकार आणि वजनाच्या दगडांना शरीराच्या अवयवांवरती ठेवून उपचार केले जातात. या थेरपी साठी नॉर्मल दगड वापरत नसून, बेसाल्ट आणि संगमरवर दगडांचा वापर करण्यात येतो. हे दगड या साठी वापरले जातात कारण बेसाल्ट दगड हा गरम असतो आणि संगमरवर हा थंड असतो.   

ही स्टोन थेरपी म्हणजे शरीराचा एक व्यायामच आहे. याद्वारे शरिराच्या स्नायुंना क्रियाशील  केले जातात. ज्यामुळे रक्तभिसरण चांगले होते. आणि झालेली व्याधी हळू हळू मूळापासून कमी होते. होतं काय.. थंड वातावरण किंवा शरीराची हालचाल न केल्यामुळे धमन्या आणि शरीराच्या भिंती आकुंचन पावतात, त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत नाही. परिणामी शरीरात व्याधी सुरु होण्यास सुरवात होते. यावरती प्रभावी उपाय म्हणून स्टोन थेरपी कडे बघितले जाते.

स्टोन थेरपीचा इतिहास


स्टोन थेरपीची व्याख्या खूपच सिंपल आहे. आणि ही तिच्या नावावरून  पटकन लक्षात येते. स्टोन थेरपीचा शोध हा १९९३ साली लागला. त्या वेळी तिला La Stone Therapy असे नाव दिले होते. तरीही आपल्या हिंदू धर्मात या थेरपीचा वापर वैदिक काळापासून होत आलेला आहे. सध्या ही थेरपी नव्या कौशल्यानुसार वापरण्यात येते.

स्टोन थेरपी हा मसाजचा प्रकार असून, या प्रकारामध्ये विशिष्ट प्रकारचे दगड, जे गरम आणि थंड दोन्हीही असावेत. असे दगड शरीराच्या विविध भागावरती ठेवले जातात. ज्या मुळे शरीरामध्ये रक्त प्रवाह सुरळीत चालू होतो. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. या थेरपीसाठी बेसाल्ट आणि संगमरवर दगडाचा वापर केला जातो.

स्टोन थेरपी काम कशी करते?


स्टोन थेरपीसाठी बेसाल्ट आणि संगमरवर दगडाचा उपयोग केला जातो. यामध्ये बेसाल्ट दगड हे गरम असतात, तर  संगमरवर दगड थंड असतात. या प्रक्रियेमध्ये बेसाल्ट दगडांना गरम करून शरीराच्या विविध भागांवरती ठेवले जातात. त्यामुळे रक्तभिसरण वेगाने होऊ लागते. त्या नंतर त्याच भागांवर थंड संगमरवर दगडांना ठेवले जाते. त्यामुळे शिरा पुन्हा पूर्वीच्या अवस्थांमध्ये परत येतात. 

ही प्रक्रिया व्यक्तीच्या आजारानुसार अनेक वेळा केली जाते. या प्रक्रियेमुळे शिरांचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत चालतो. ही थेरपी खऱ्या अर्थाने लाभदायक आहे. या थेरपीचा वापर वैदिक काळापासून होत आलेला आहे. त्यावेळी असे आधुनिक उपचार पद्धती वगैरे नव्हती. परंतु ज्या उपचार पद्धती त्या वेळी होत्या त्या आजही माणसांसाठी वरदान म्हणून पुढे असतात. 

Read More : Self Care Habits for Women in Marathi : महिलांसाठी स्वत:ची काळजी घेण्याच्या खास सवयी

Read More : ध्यान करण्याचे फायदे | Benefits of Meditation 


स्टोन थेरपीचा वापर करून कोणते आजार बरे करू शकतो?

स्टोन थेरपीचा वापर करून तुम्ही अनेक असाध्य रोग बरे करू शकता. त्यासाठी शास्त्रीय दृष्ट्या या थेरपीचा उपयोग होणे आवश्यक आहे. या थेरपीचे रिझल्ट हे खूप प्रभावी आहेत, असे ज्यांनी या थेरपीचा लाभ घेतला, त्यांचे म्हणणे आहे. या थेरपीचा वापर करून स्नायू दुखी, पाठदुखी, आर्थरायटीस, डिप्रेशन, तसेच हाय आणि लो ब्लड प्रेशरमध्ये समतोल ठेवण्यासाठी ही थेरपी प्रभावी समजली जाते. 

ही थेरपी कुणीही आजारी पडल्यावरच घेतली पाहिजे असे नाही. तुम्ही आजारी असाल किंवा नाही. कधीही तुम्ही या थेरपीचा लाभ घेऊ शकता. या थेरपीचा उपयोग करून, होणाऱ्या आजारांना आधीच पळवू शकता. खरं तर.. आजच्या धावपळीच्या काळात, अधिकांश लोकांना पाठदुखी, ब्लड प्रेशर, स्नायू दुखी अशा त्रासदायक आजाराने ग्रासलेले असते. अशावेळी ही स्टोन थेरपी तुम्हाला वरदान साबित होऊ शकते.

खरच आपल्याला वैदिक काळापासून आलेल्या आणि ज्यांनी या थेरपीला जन्म दिला अशा महान विद्वानांना अभिवादन केले पाहिजे. यांच्यामुळे शरीराचे कोणतेही नुकसान न करता, शरीराला बरे केले जाते. ही महान ऋषी मुनीची आपल्या मनुष्य जातीला दिलेली अमुल्य देणगी आहे. 

थोडक्यात : स्टोन थेरपीचा काय करते ?

  • रक्तभिसरण वाढवते  
  • पाठदुखी साठी उपयोगी
  • स्नायू दुखी साठी उपयोगी
  • तणाव कमी करते
  • शरीरातील घातक टॉक्सिन बाहेर काढते.
  • डिप्रेशन कमी करण्यसाठी

महत्वाची टिप्स                                                                                  

कोणतीही गोष्ट करण्यासाठी तिची आपल्याला पूर्णपणे माहित असावी लागते. किंवा योग्य त्या तज्ञाकडून माहित घेतली पाहिजे. जेणेकरून त्या गोष्टीचा आपल्याला लाभ मिळतो. त्याच प्रकारे स्टोन थेरपी जेव्हा तुम्ही घेण्याचा विचार करत असाल, तेव्हा ती अनुभवी तज्ञाकडूनच करून घेणे लाभदायक ठरेल. 

Read More Post  : 

वजन कमी करणे आणि मधुमेह ( डायबेटीस ) नियंत्रण | डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅन     

निरोगी जीवनासाठी स्वयं-शिस्त कशी अंगीकारावी?

 
       

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!