मानवी वस्तीमध्ये सर्वात अवघड काय असेल? ते म्हणजे स्वतःला आनंदी ठेवणे. हे जरी तुम्हाला खूप सोपं वाटत असलं तरी, तितकं हे सोपं नाही है. या प्रश्नांच्या उत्तराला मनुष्य त्याच्या उत्पत्ती पासून शोधत आला आहे, परंतु त्याला या प्रश्नाचं उत्तर अजून तर सापडले नाही आहे.
तरीही ही काही ऋषी मुनींनी आपल्या या मनाला शांत आणि निरोगी ठेवण्यासाठी काही विधी सांगितल्या आहेत. या विधी करणारा मनुष्य निश्चितच निरोगी राहतो. या साठी मात्र सात्यत्य असणे आवश्यक आहे. अर्धवट काम करून या विधींचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही.
या विधी पैकी ध्यान मानवी शरीराला निरोगी ठेवणारे प्रभावी साधन आहे. योग्य वेळी आणि आणि योग्य पद्धतीने जर ध्यान म्हणजेच मेडीटेशन तुम्ही करत राहालात तर, मेडीटेशन तुम्हाला दीर्घायुषी नक्कीच बनवेल. एवढी शक्ती या मेडीटेशनमध्ये आहे.
Image Credit to Pexels.com
ध्यान केल्याने शरीरात कोणते बदल होतात ?
ध्यान करताना शरीरात रक्तप्रवाह आणि उर्जेचा संचार वाढतो. या कृतीमुळे शरीरात स्नायूंना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. या प्रक्रियेमध्ये शरीरात लैक्टिक ऍसिडचे प्रमाण वाढते, जे शरीरातील तणाव आणि नकारात्मक उर्जेला बाहेर फेकून देते आणि शरीरात फ्रेशनेस निर्माण करते.
थोडक्यात मेडीटेशनमुळे आपण शरीराला आणि मनाला निरोगी आणि शांत करू शकतो. हा एक प्रकारे व्यायामच आहे. परंतु अध्यात्मिक भाषेमध्ये मेडीटेशनला अनन्यसाधारण महत्व आहे.
थोडक्यात मेडीटेशन म्हणजे काय आहे ?
मेडीटेशन म्हणजे एका ठिकाणी शांत बसून एकाग्र होऊन आत्मनिरीक्षण करणे. ही विधी करताना स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करणे. मनामध्ये तुसभरही गोष्टींनाही जागा न देता, मन अगदी खाली ठेवणे. ना दु:ख, ना आनंद, ना राग, ना तृष्णा, लोभ. यावेळी फक्त आणि फक्त श्वासाला नियंत्रित करून त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून असणे. हे जेव्हा तुम्ही अचूक पद्धतीने करता तेव्हा या वैदिक विधीचा तुम्हाला चमत्कारिक फायदे दिसून येतात.
Read More: स्टोन थेरपी काय आहे ? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ?
Read More: स्टोन थेरपी काय आहे ? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ?
पाच मिनिटाचे चांगलं फील करण्याचे मेडीटेशन तंत्र
पहिले मिनिट :
एका शांत ठिकाणी आरामात बसा. या पहिल्या मिनिटात तुम्हाला संथ आणि दीर्घ गतीने श्वास आत बाहेर करायचा आहे. यावेळी मात्र तुमचं सारं लक्ष तुमच्या श्वासावर असणे आवश्यक आहे.
असे तुम्हाला काही वेळ श्वास आत बाहेर करायचा आहे. यावेळी शरीर पूर्णपणे स्थिर आणि सैल सोडा. असे वाटले पाहिजे, शरीर तुमच्या जवळ आहे की नाही.
दुसरे मिनिट :
श्वास घेत असताना तुम्हाला तुमची दृष्टी नाकावर ठेवायची आहे. आणि तुमचं ध्यान श्वासावर लक्ष केंद्रित असावं. यावेळी तुम्हाला काहीतरी चांगलं वाटत आहे, असं फील करा. मन शांत आणि आनंदाने नाचत आहे असे मनाला सांगा. हळू हळू तुम्ही ध्यानामध्ये एक होऊन जाल.
तिसरे मिनिट :
तिसरे मिनिट तुमच्यासाठी महत्वाचे आहे. या प्रक्रीयेमध्ये तुम्हाला डोळे बंद करायचे आहे. आणि येथे तुम्हाला शरीरातील स्पर्श शक्तीला जागे करायचे आहे. येथून काही सेकंद तुम्हाला बाहेरच्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचे आहे. काहीतरी शरीराला स्पर्श होत आहे असं जाणवा. त्यानंतर गंध, स्वाद आणि अनुभवलेल्या शक्तीचे विचार मंथन करा.
चोथे मिनिट :
यावेळी तुम्हाला नको ते विचार येवू शकतात. परंतु तुम्हाला बावरून जायचे नाही आहे. त्याच बरोबर त्यांना त्रासाने नियंत्रित करण्याचा प्रयत्नही करू नका. ते येत असतील तर येवू द्या. हळू हळू तुमच्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करा. स्वतःला एक मां प्रकृतीचा भाग समजा आणि विचारांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. पुढे विजय तुमचा होणार आहे.
पाचवे मिनिट :
ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. या प्रक्रीयेमध्ये तुम्हाला स्वतःला जाणायचे आहे. यामध्ये तुम्ही एका अस्थायी उर्जेवर फोकस करा. असे दृश्य डोळ्यासमोर आणा, त्यामध्ये मां प्रकृतीचा वास असेल. सकारात्मक उर्जा असेल. जी तुम्हाला दिव्य बनवेल. ही अवस्था माणसासाठी स्वर्ग मिळण्यासमानच आहे. या अवस्थेमध्ये माणूस सगळ्या अनैतिक विचारांपासून दूर राहतो आणि ईश्वराच्या असीम उर्जेचा अनुभव करतो.
ध्यान या विधीचा निष्कर्ष काय सांगतो
ध्यान ही एक वैदिक अध्यात्मिक विधी आहे. जी शरीराला आणि मनाला निरोगी आणि सुखमय ठेवते. मन वाईट विचारांपासून दूर राहते आणि मनुष्य एक सात्विक आयुष्य जगण्याचा अनुभव करतो.
मित्रहो.. इथून पुढे तुमचा ध्यानयोग सुरु होतो. परंतु त्यापूर्वी तुम्हाला या प्रथम पायरीचे लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे. तरच तुम्ही पुढीलं अंतिम ध्यानापर्यंत पोहचू शकता.
मित्रहो.. इथून पुढे तुमचा ध्यानयोग सुरु होतो. परंतु त्यापूर्वी तुम्हाला या प्रथम पायरीचे लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे. तरच तुम्ही पुढीलं अंतिम ध्यानापर्यंत पोहचू शकता.