दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी मदत करते

SD &  Admin
0

 जेवणात दही असेल तर दोन घास अधिक जातात, मला वाटत.. जगभरात प्रत्येक देशात दह्याचे सेवन केल जाते.  आंबट गोड चवीने परिपूर्ण हे खाद्य प्रत्येक माणसाला आकर्षित करत असते.

दही हे भोजनात चव देतेच, परंतु लोक सौंदर्य खुलवण्यासाठी देखील उपयोग करत आहेत. आणि याचे रिझल्ट देखील खूप छान येत आहेत. त्यामुळे होममेड पद्धतीने दह्याचे पदार्थ बनवले जातातच, परंतु मोठ मोठ्या कंपन्या देखील आता दह्यापासून अनेक क्रीम वगैरे ई वस्तू बनवत आहेत.

पाहूया आपण  दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी मदत कसे करते ते...

दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी मदत करते

दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी कशा प्रकारे मदत करते?


दही पचनासाठी अतिशय उत्तम मानले जाते. दही पोटातील रुक्षपणा कमी करण्यासाठी मदत करते. तुम्हाला माहितीच आहे, दह्यामध्ये कॅल्शियम असते, जे आरोग्यासाठी फायद्याचे असते.

दही शीतलता देते. त्यामुळे अधिक उन्हात बचाव करण्यासाठी आपल्याला मदत करते.

दही सौंदर्यवर्धक आहे. फार पूर्वीपासून लोक दह्याचा सौंदर्यवर्धक म्हणून उपयोग करत आहेत. जसे दही त्वचेची स्वच्छता करते. तसेच उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत करते. कारण दह्यामध्ये असणाऱ्या खास जीवाणू त्वचेला चमकदार आणि मऊ बनविण्यास मदत करतात.

पूर्वी आणि आता सुद्धा लहान मुलांना अंघोळ घालण्यापूर्वी  त्यांच्या शरीरास दह्याचे मालिश केले जाते. त्यामुळे बाळाचे शरीर चमकदार आणि आकर्षक दिसते.

शरीराच्या अंगाबरोबर केसालाही दही वरदान आहे. केसांना चमक आणि केस स्वच्छ धुण्यासाठी दह्याचा उपयोग केला जातो.

वजन नियंत्रित करण्यसाठी देखील दह्याचा उपयोग केला जातो.

दह्याचे हे गुणकारी फायदे फार पूर्वी पासून लोकं करत आलेले होते. आणि आज अनेक अनुभवी लोक दह्याचा उपयोग आपल्या जीवनात दररोज करावा असे सांगत असतात.




Read More:

ध्यान करण्याचे फायदे | Benefits of Meditation

थंडीच्या दिवसात व्यायाम केल्याने आजारांपासून कसं दूर राहता येते?

न्यूजपेपरवर तेलयुक्त खाद्यपदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक असते : कसे ते जाणून घ्या?

लहान मुलांना काजळ लावणे आरोग्यासाठी चांगले असते का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ


 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!