धावपळीच्या या आयुष्यात नैराश्याविषयी विचार करणे आवश्यक आहे

SD &  Admin
0

 स्पर्धेच्या या काळात जीवन जगणे अगदी कठीण झाले आहे. सततच्या कामाच्या ओझ्यामुळे माणूस  नैराश्यामध्ये आणि तानावाखील जगत असतो. कधी कधी अशी माणसे टोकाचे पाऊल देखील उचलायला मागे पुढे पाहत नाही. ही बाब फार गंभीर आहे. समाजाला याबाबत जाणीव आहे. परंतु जीवन जगण्यासाठी पैशाची गरज असते. आणि पैसा तेव्हाच मिळतो, जेव्हा काम कराल. आणि जेथे काम येते तिथे प्रेशर हे आलेच.

मित्रानो हा विषय आजकाल गंभीर होत चाललेला आहे. तुम्हाला तुमच्या आजूबाजूल तणावात अडकलेली माणसे अनेक मिळतील. काही माणस तर तुमच्या जवळची ही असतील. मित्रानों खऱ्या अर्थाने अशा माणसांना तुमच्या मदतीची गरज असणार आहे. काही माणस तुमची मदत मागतील तर काही नाही मागणार. परंतु तुम्ही त्यांच्या भावना समजून त्यांना मदतीचा हात पुढे करा. तुमचा हा हात कुणाचा तरी जीव वाचवू शकतो. कुणाच्या तरी कुटुंबात आनंदाचा क्षण येऊ शकतो.

धावपळीच्या या आयुष्यात नैराश्याविषयी विचार करणे आवश्यक


धावपळीच्या या आयुष्यात नैराश्येत अडकलेल्या लोकांसाठी तुम्ही काय करू शकता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

नैराश्यामध्ये अडकलेल्या लोकांसाठी आपण काय मदत करू शकतो?


प्रथम ऐकून घ्या. थट्टा मस्करी करू नका

संयम आणि दुसऱ्याचे ऐकून घेणे ही एक जबाबदार आणि सामंजस व्यक्तीचे लक्षण आहे. याचा प्रत्येय तुम्हाला अनेक ठिकाणी देणे खूप गरजेचे आहे. जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याच्या काही अडचणी सांगत असेल तर, त्याला तुम्ही हटकू नका. तर त्याला जवळ घेऊन त्याच्या अडचणी समजून घ्या. त्याला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होत आहे, हे समजून घ्या. आणि त्याच्या समस्यावर तुम्ही त्याला मदत कराल हे आश्वासन द्या, हे त्याच्यासाठी देवच मिळाला असे असेल.

मेडिकल उपचारासाठी प्रोत्साहित करा

माणूस हा स्वतःला कमी लेखायला मागत नाही. म्हणून समाजहीन गोष्टी तो इतर लोकांना सांगत नाही. त्याचप्रमणे 
नैराश्येत अडकलेली माणसे उपचार घ्यायला संकोच करतात. अशा वेळी तुम्हाला त्यांना अशा गोष्टीबद्दल जागरूक करुन उपचार करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. त्याचं प्रमाणे मेडीटेशन करने, संगीत ऐकणे, त्याच्या आवडीचे खेळ खेलने ई. गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी जरूर करू शकतात. एकदा का ते अशा गोष्टी मनापासून करायला लागले कि  हळू हळू त्यांच्यामध्ये बदल दिसून येतील.

स्वतःहून त्यांना मदत करा

कधी कधी नैराश्येत अडकलेली लोकं स्वतःहून तुम्हाला अडचणी सांगायला येणार नाहीत. अशावेळी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्यांच्यासाठी आवश्यक गोष्टींची माहिती तुम्ही स्वतः मिळावा. त्यांना त्या गोष्टींचा विश्वास द्या आणि उपचार करण्यास विनंती करा.

प्रेम आणि विशास द्या  

नैराश्यामध्ये किवा जबरदस्त तणावाखाली असलेल्या व्यक्तींना संभाळणे फार कठीण असते. एखाद्या वेळी आजारी व्यक्तीला लगेच उपचार होऊ शकतील. परंतु मानसिक बिमारी कधी ठीक होईल हे सांगता येत नाही. म्हणून अशा वेळी तुम्हाला न रागवता त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर प्रेम करायला हवे आहे. अशा व्यक्ती दुसऱ्यांना त्रास नको म्हणून सगळ्यांपासून दूर दूर जातात. अशा वेळी तुम्हाला त्यांची समजूत काढून, तुम्ही त्यांच्यासाठी किती स्पेशल आहात हे पटवून द्या. तुमच्या या प्रेमळ आधारामुळे त्यांच्या जीवनात हळू हळू आशेचा किरण जागृत होईल. पुढे हळू हळू त्यांच्यात चांगले बदल होतील.

या गोष्टी तुम्ही एकदा त्यांच्यासाठी करुन पहा

* तुम्ही त्यांना विश्वास द्या की , तू जसा असतील तसा आम्हाला आवडेल. आणि तुला काहीही बदलण्याची गरज नाही. असा प्रेमळ विश्वास त्यांच्या मनात बिंबवू द्या.

*सतत   त्याला सल्ले देत बसू नका. किंवा विनाकरण लगेच मदत करू नका. त्याला ही त्याच्या पायावर उभे राहण्याची संधी द्या. तो दुर्बल आहे याची भावना अजिबात त्याच्या मनात येईल असे त्याच्याशी वागू नका.

* तू आमच्या साठी किती महत्वाचा आहेस, हे मात्र त्याला विश्वासाने सांगा, तूं आमच्या कुतुबातील एक सदस्य आहेस. याची जाणीव करून द्या.


निष्कर्ष

थोडक्यात तुमची मदत ही दुसऱ्या कोणाचा प्राण वाचवू शकते. आणि ही शक्ती तुमच्यात आहे. आणि याच शक्तीला आपण ईश्वर म्हणतो. सांगण्याचा हा उद्देश कि तुमच्या आसपास तणावाखाली असलेली व्यक्ती आढळली तर तिला प्रेमाने मदत करा. आणि त्याला तणावापासून बाहेर काढण्यसाठी आवश्यक ती मदत करा.




Read More :   





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!