अवघ्या महाराष्ट्राला आराध्य दैवत विघ्नहर्ता श्री महा गणपतीचे आगमनाची चाहूल लागली आहे. या गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येकजण हर्षित झालेला आहे. प्रत्येक गोष्ट गणरायाला साजेशी आणि मनासारखी असावी म्हणून, आधीच सर्व तयारीला लागले आहेत.
Ganesh Chaturthi 2024 : प्रत्येक भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थी तिथि वर या गणरायाचा उस्तव साजरा केला जातो. विघ्नहर्ता श्री गणपतीचा हा सण सार्वजनिक ठिकाणी १० दिवस आणि घरा-घरात दीड दिवस, पाच, सात दिवस साजरा केला जातो. या दिवसात वातावरण अगदी स्वर्गापेक्षाही आल्हादायक आणि सकारात्मक असते.
गणेश चतुर्थी २०२४: गणेश उत्सव कधी सुरू होत आहे? जाणून घ्या बाप्पाची मूर्ती बसवण्याची योग्य पद्धत आणि नियम.
गणेश चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्त :
वैदिक पंचांगानुसार गणेश चतुर्थीची सुरवात शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ ला होईल. आणि दुसऱ्या दिवसी ७ सप्टेंबर संध्याकाळी ५: ३७ ला समाप्त होईल. यावर्षी उदय तिथीनुसार शनिवार 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. या दिवसी गणेश मूर्तीची सर्वजन प्रतिष्ठापना करतील.मूर्ती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त :
या वर्षी उदय तिथीनुसार ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होईल. तसेच मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त ११:०४ ते दुपारी १:३४ पर्यंत असेल. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी भाविकांना एकूण २ तास ३० मिनिटे मिळणार आहेत.विसर्जनाची तारीख :
यंदा गणेश उत्सव शनिवारी ७ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. ते मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाची सांगता होणार आहे.मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा योग्य नियम :
शुभ मुहूर्ताप्रमाणे घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला मातीची मूर्ती बसवावी. फक्त उजव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती बसवावी.काळजी कशी घ्यावी
भगवान गणेशाची मूर्ती स्थापित करण्याची जागा ही पवित्र, शुद्ध असावी. नकारात्मक गोष्टीपासून मूर्तीला दूर ठेवा. यावेळी स्वतःचे मन आणि व्यवहार हा भक्तिमय असावा. मूर्ती स्थापित करताना पश्चिम दिशेला आहे की नाही ते निश्चित करा. मूर्तीला विसर्जन करण्याआधी बिलकुल हलवू नका.
बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे सगळेच उत्साही असतील. आणि ते असावेच. परंतु उत्साहाचे वातावरण भक्तिमय असावे. कोणालाही त्रास होईल असे वर्तन करू नये. आवाजाचे प्रमाण मर्यादित असावे. कारण आपल्या आजूबाजूला लहान मुल, म्हातारी माणस, आजारी माणस असतात. त्यांना या आवाजाचा त्रास होवू शकतो. या सगळ्या गोष्टींची भक्तांनी काळजी घ्यायला हवी.
Read More:
Raksha Bandhan Special Day 2024 : भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस