गृहिणी म्हणजे मोलकरीण नव्हे : सामाजिक गैरसमज बदलण्याची गरज

SD &  Admin
0

आजच्या प्रगतशील काळातही समाजात महिलांबाबत अनेक गैरसमज आहेत. विशेषता: घरात ज्या गृहिणी काम करतात त्यांच्यासाठी. अर्थात मग त्या जॉब ही करत असल्यातरी. परंतु या प्रगतशील समाजातील लोकं हे विसरून जातात की, गृहिणी होणे तितकं सोप नाही आहे. आजची गृहिणी ही फक्त सतत नागरनीला बैल जोडतात तश्या त्या फक्त घरासाठी मेहनत घेत असतात.

 
काळ बदलला, माणूस चंद्रावरती जाऊन आला. आता मंगल ग्रहावरती जाण्याची तयारी करत आहे. एवढ्या आधुनिक काळातही समाजाची मानसिकता बदलताना दिसत नाही. आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करत आहेत. काही तरी पुरुषांच्या वरचढ ही आहेत. तर काही स्त्रिया घरात राहून संसाराला, मुलाबाळांना सांभाळण्याचे काम करतात. पण त्यांना असं नाही म्हणू शकत कि त्या कामच काही करत नाही. खर..तर गृहिणी होणे तितके सोप नाही आहे. घरातील सर्व गोष्टी सांभाळताना आणि मुलां बाळांना मोठ करताना त्यांना अनेक अडचणी येतात. हे मात्र आजच्या आधुनिक समाजाने विसरू नये.

गृहिणी म्हणजे मोलकरीण नव्हे : सामाजिक गैरसमज बदलण्याची गरज

काही लोक गृहिणीना रिकाम टेकड्या देखील म्हणतात. त्यांना मुळीच काम नसत. त्या फक्त स्वयंपाक झाला की, टीवी बघायला मोकळ्या झाल्या. बरोबर इतर स्त्रियांबरोबर गॉसिप करने हे आलेच, असे अनेकांना वाटते. परंतु मूर्ख लोकानो असा विचार करने आपल्या मूर्ख पणाचे लक्षण आहे. मी माझ्या आईला सकाळपासून ते रात्र होईपर्यंत काम करताना पाहत आहे. खूप काम करते. थोडा वेळ देखील ती आपल्यासाठी देत नाही. आपल्या घरासाठी ती सतत कामच करत असते. बर एवढ करुन ही वर तिला इतर लोकांची दमदाटी आणि बोलणी खायला लागतात ती वेगळीच. पण कोणी असा विचार करतो का,..? तिला आपण कामात मदत करावी. तिच दु:ख समजावून घेऊया. तिला बर तर वाटत नाही आहे ना!... कदाचित खूपच कमी.

आपल्या समाजात आणखी एक गैरसमज आहे तो म्हणजे, जर मुलांनी वर्गात कमी मार्क्स मिळवले तर त्याच्या  अपयशाचे खापर हे त्या पाल्याच्या आईवर फोडले जाते. मग तिला अनेक टोमन्यांना सामोरे जावे लागते. तू जर त्यांचा अभ्यास घेतला असता, तर त्याला चांगले मार्क्स पडले असते. तुझेच लक्ष नसते. वगैरे अनेक टोमन्यानी तिला मार झोड केली  जाते.

अभ्यासा बरोबर एखाद मुल फार अतरंगी किवा अति खोडकर स्वभावाचे झाले तर, त्याचे ही खापर त्या मुलाच्या आईच्यावर फोडले जाते. एकंदरीत काय तर समाज हा गृहिणीला तिचे मानाचे स्थान द्यायला कधीच तयार नसतो. ती एक मोलकरणीच आहे, हे पटवून द्यायला तो सतत पुढे असतो.

गृहिणी होण्याचा निर्णय घेण्यामागे आरोग्याच्या समस्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, स्पर्धेपासून राहण्याची इच्छा आदि अनेक कारणे असू शकतात. त्या महिलेला तिचा निर्णय करू द्या आणि ती समाधान असेल तर त्यात हस्तक्षेप करू नका. प्रत्येकाला आपले मत स्वातंत्र्य असल्याचे लक्षात ठेवा. तसेच गृहिणी होणे ही सुद्धा फार मोठी जबाबदारी असल्याचे समाजाने विसरू नये.   

 

गृहिणी म्हणजे मोलकरीण नव्हे : सामाजिक गैरसमज बदलण्याची गरज 

समजाने आपले विचार बदलण्याची खरी गरज आहे. गृहिणी ही फक्त कामवाली नसून, ती घराला घरपण देणारी उर्जा आहे. तिच्या शिवाय तुम्ही घर चालवूच शकत नाही. समाजाने पहली चुकीची मानसिकता मनातून काढायला हवी ती म्हणजे, गृहिणी घरात बसून काय करते. हा विचार करनेच मुळात मूर्खपणाचे लक्षण आहे. ही विचार सरणी समाजात उच्च नीच कायम करणारी आहे. हे त्याने विसरू नये.

एखाद्या स्त्रीने काय करावे आणि काय नाही. हे स्वत: तिने ठरवले पाहिजे. जर तिला गृहिणी व्हॉयचे  असेल तर, तुम्ही तिचा आदर केला पाहिजे. तिला प्रत्येक कामात मदत केली पाहिजे. तिला काय पाहिजे आहे, काय नाही हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. पहले मुख्य म्हणजे तुम्हाला तिच्या कामाचे कौतुक केले पाहिजे. कौतुक हेच तिला सर्वात उत्तम भेट आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या कामात प्रथम स्त्रीने स्त्रीचा आदर केला पाहिजे. स्त्रीच जर तिचा आदर करत नसेल तर समाज हा तिला  डिवचन्यासाठी सतत तयार असतो. घरात स्त्रीने स्त्रीची बाजू घेतली तर इतर कोणीही तिच्या विरोधात उभे राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घेऊन एकदा नव्याने समाजात गृहिणीला स्थान देऊया आणि समाज शिक्षित करूया.




Read More:

सुंदर आयुष्य कसं जगायचं? सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे

महिला दिवस २०२३ : ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो ?

आठवणीतल्या सरी : मनातले चांदणे

वेल सेटल व्हायचं कस? लग्न जमत नाही - तरुणांना पडलेला गंभीर प्रश्न.
  

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!