अलीकडेच शाळा चित्रपट पहिला आणि चटकन अनुभवलेल्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. फार बरं वाटलं. खरच.. बालपणीच्या आठवणींना उजाळा द्यायला खूपच आवडतं. या नुसत्या आठवणी नाही तर, दु:खावर पांघरून घालण्याचे आनंदाचे अनमोल क्षण असतात.
या बालपणाच्या वेलीवर अनेक आठवणी असतात. मोजता ही येणार नाहीत. जेव्हा जेव्हा कुठतरी ऐकटं बसलेले असतो, तेव्हा आठवणी भराभरा एका पाठोपाठ एक नदीच्या प्रवाहाप्रमाणे दत्त म्हणून पुढे येतात. मित्रहो. या सगळ्यात मला शाळेतल्या आठवणी सांगायला खूप आवडेल.. कारण या आठवणीत अनेक मित्र-मैत्रिणी, गुरुजन वर्ग आपल्या सोबतीला असतो.
पाहूया शाळा म्हणजे काय असते....
असं भरपूर लोक म्हणतात, "शाळा सुटली पाटी फुटली” खरं.. तर ही म्हण बरोबरच आहे. कारण एकदा का शाळा सुटली की पाठीवर दप्तर कधीच येत नाही.. येतात त्या फक्त आठवणी. शाळेत असताना पाठीवर दप्तर ओझ वाटायचं. कधी कधी कंटाळा देखील येयाचा. आणि म्हणून दप्तरात जेवढी कमी पुस्तकं भरता येतील, तेवढ आम्ही बघायचे. पण आज मात्र ते पाठीवरचं जड दप्तराचं ओझ हवहवसं वाटतंय. सतत त्या वेळच्या आठवणी जाग्या होत असतात. आज माझ्याकडे सगळं काही आहे. परंतु आज माझ्याकडे शाळेचे सुख नाही आहे. माझ्याकडे ते मित्र- मैत्रिणी नाही आहेत. माझ्या कडे आज गुरुजी नाही आहेत. त्यावेळी आम्हा मुलांमध्ये रुसवा फुगवा, भांडण होयची. पण आज ती बिलकुल नाही आहेत. खरच शाळा म्हणजे बालपणाला आधार देणारं घर होतं.
शाळेतल्या आठवणी खूप असतात. संपल्या काही संपत नाही. नुसत्या झऱ्यातील पाण्यासारख्या प्रवाहित होत असतात. मी अलीकडेच मिलिंद बोकील यांच्या शाळा या पुस्तकावर आधारित चित्रपट पाहिला. चित्रपटात फार चागल्या पद्धतीने शाळेतील क्षणांना टिपले आहे. मस्ती, भांडणे, नकळत मनात बसलेल तिच प्रेम. शेवटी झालेला विरह, आणि बरच काही.
शाळेत जेव्हा पहिल्या वर्गात प्रवेश घेतो.. तेव्हा मनात शाळेविषयी फक्त भीती असते. जसे, मित्र कसे असतील, गुरुजी कसे असतील. मारकुटे तर नसतील ना..? अभ्यास जमेल का? असं बरच काही. परंतु जस जसे शाळेतले वर्ग पुढे पुढे ढकलत जातात, तस तसे मनात शाळा घर बनून जाते. अनेक विषय, भावना दाटल्या जातात. या वळणावर कधी कधी मनात काहूर माजलेल असते. काय कराव आणि काय नही अस झालेलं असते. परंतु शेवटी आनंद हाच मुख्य हेतू असतो.
मला माध्यमिक शाळेत खूप गोष्टी अनुभवयाला मिळाल्या. आणि खर तर, वय पण त्या गोष्टींना मिळत-जुळत असते. मन अगदी भावनेने वेडेपिसे झालेले असते. कदाचित या वयात तुमचेही असेच झाले असेल.
शाळा या चित्रपटात जोशी आणि शिरोडकर हे पात्र अगदी सगळ्यांच्याच मनात घर करून राहतील. कारण या वयात प्रेम सगळेच करत असतात, किंबहुना ते होतच जातं. खर तर.. कुणीही नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या मनात कोणतीतरी शिरोडकर ही हृदयाच्या कोपऱ्यात बसलेली असतेचं. या वयात असं घडतच असते. वयच तसं असत. आपण कधीच मनाला आवरू शकत नाही. ते नाचायलाचं लागलेले असते. तिला बघताच काय करावे आणि बोलावे तेच समजत नसते. दिवस रात्री फक्त ती आणि तिच दिसते. वाटत.. दररोज तिला भेटाव. तिच्याशी गप्पा गोष्टी माराव्या. कुठेतरी फिरायला जाणे. अशावेळी एक दिवस सुद्धा तिच्या शिवाय रहावस वाटत नाही. एखाद्या दिवसी ती शाळेत आली नाही तर, शाळेत मूडचं येत नाही. दिवस खराब गेला असे वाटते.
प्रेमाचा अथांग सागरात बुडलेलं मन, बाहेर येईल असे वाटते का तुम्हाला? खूप कठीण आहे. हा.. पण पहिल्या प्रेमाच्या प्रसंगी तर हे शक्य नाही.
या भागडीत एक तरफी प्रेम सुद्धा आपण अनुभवलं असेल. असे बहुतेक मुलाचं झाले असेल. म्हात्रे आणि केवडा याचं गणित कुणालाच समजल नाही. प्रेम होत का फक्त फालतुगिरी हेच समजत नव्हत. शेवटी अशा प्रेमाचा शेवट देखील चांगल्या मारानेच होतो. चित्रपट किंवा पुस्तक वाचले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, कशाप्रकारे म्हात्रे आणि जोश्याने गुरुजींचे मार खालेले होते. अगदी सडकून मार मिळाला होता. मलम पट्टी करावी लागली होती. ९० दशकात शाळेतील गुरुजी फार कडक होते. त्यांच्या आवाजाने शु..ला व्हायचं. त्यावेळी गृहपाठ आम्ही अगदी भीतीनेच करायचो..
मित्रानों, शाळा फक्त काही प्रेमासाठीचं आठवणी देत नाही तर,.. येथे जीवाला जीव देणारे मित्र ही भेटतात. जसे जोशी, म्हात्रे, चित्रे, पवार सारखे अप्रतिम मित्र असतात. वेळ प्रसंगी भांडणेही करायला तयार असतात. खूप मौज मस्ती असते. काय अनुभव असतात हो.. खरच ९० च्या दशकात अश्या गोष्टी मिळाल्या हे आपले भाग्याच होतं
खूप लांब लचक शाळेतल्या आठवणी आहेत . मौज, मस्ती, रुसणे-फुगणे, रडणे, खेळ, प्रेमाचे सुखद क्षण आणि अभ्यास या गोष्टीवर त्यावेळचे जीवन आधारित असते. प्रेमाने बहरलेले ते दिवस. अगदी मन मोहित करत असतात.
जसी सुरवात ही आनंदाने होत असते, तसेच सुखद दुःखाचे दिवस ही येतात. सुखाने मंतरलेले दिवस अगदी.. भावनिक स्टेज वर येवून पोहचतात. मन बावरून गेलेले असते. खरं.. तर या वयात अशा गोष्टी मनाला अति लावून नाही घेतल्या पाहिजे. परंतु या वयातल मन मात्र मानायला तयार नसते. ते तिच्यात गुंतून गेलेले असते.
शेवटी वेळ येते ती एकेमेकांपासून दूर होण्याची. अगदी दु:खद मनाने तिचा निरोप घेण्यास मजबूर होवून जाते. दोघांचेहे डोळे पाण्याने भरलेले असत्तात. निरोप कसा द्यायचा हेच मुळात कळत नसते. या वयात थांबवायला देखील कोणी नसत.
शाळेतल पहले पर्व संपते आणि दुसऱ्या पर्वाला सुरवात होते. माध्यमिक शाळेतल शेवटच वर्ष. मनात काहूर माजलेल असत. परंतु मौज-मस्ती बरोबर अभ्यास ही महत्वाचा असतो. मग कस तरी, अभ्यासाच्या पाठी लागतो. बरोबर घरचे आणि इतर गावातली माणस अगदी अभ्यास कर कर म्हणून पाठी लागलेली असतातच. जरा कधी मुलीबरोबर बोलताना बघितलं की अगदी बोंबाटा सुरु होतो. जस काही बिघडलेलं पोरगच आहे. पण रात्री झोपेत असे क्षण आठवले जातात, कि खुदकन हसायला येत. मन अगदी वेगळ्याच दुनियेत फिरायला नेतं.
असे दिवसा वर दिवस निघून जातात. वर्ष संपत येत. महत्वाची परीक्षा येते. अभ्यास जोरात चाललेला असतो. परंतु मनात एक खंत वाटत असते. पुढे काय करायचं. परीक्षा संपली की सगळे मित्र मैत्रिणी इकडे तिकडे जाणार. कुणी पुढे शिक्षणासाठी बाहेर जाईल. कुणी शाळा सोडेल. कुणी दूर नुघून जातील. जवळ कुणी असतील-नसतील काय सांगता येत नाही. आतापर्यंत घालवलेले सुखाचे दिवस, केलेली मौज मस्ती, एकत्र खेळलेले खेळ. रुसवा फुगवा आणि बरच काही, कुणास ठाऊक परत अनुभवता येईल का..?
मित्रानों आपल्या आयुष्यात शाळा आणि बालपण एक साथ कधीच पुन्हा परत येणार नाही, पण आपली शाळा आठवणीच्या घरात नक्कीच कायम असणार आहे.
एकदा नक्कीच भेटूया....
नोट : लेखक मिलिंद बोकील यांचे शाळा हे पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे. या पुस्तकात छान पद्धतीने शालेय जीवन कसे असते, त्याबद्दल सांगितले. किंवा त्याच्या पुस्तकावर आधारित शाळा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. एकदा पहा.
Also Read :
बालपणीच्या आठवणी | ९० व्या दशकातील बालपणीच्या आठवणी
माझ्या बालपणीचा पावसाला | ९० व्या दशकातला पावसाला
पक्षांची शाळा | Pakshanchi Shala | 90th Childhood Memories
माझे अंगणातील चांदणे | Maze Anganatil Chandane