युनिसेफच्या रिपोर्ट नुसार जगात प्रत्येक चौथे मुल कुपोषित आहे.

SD &  Admin
0

वाढत्या लोक संख्येमुळे जगभरात गरीबीचे प्रमाण वाढत आहे. परिणामी कुपोषित होण्याचे प्रमाण वाढणार हे धरूनच चला. कारण देशातील खाद्य सर्वाना बराबरीने मिळेल हे सध्या तरी सांगता येणार नाही. युनिसेफच्या रिपोर्ट नुसार जगभरात सुमारे २७ टक्के मुलांना पोषक आहारचं मिळत नाही. बरोबर जगभरात ५ वर्षापेक्षा कमी १८+ कोटी मुलांना गंभीर गरिबीचा फटका बसत आहे.

आपल्या भारत देशातही गरीबीचे प्रमाण फार आहे. तसेच आज कुपोषित मुलांचे प्रमाण ही वाढत आहे. आपल्या देशासाठी ही धोक्याची घंटा आहे. रिपोर्ट नुसार भारत देशासह १५ ते २० देशामध्ये ६५ टक्के कुपोषित मुले आहेत.

युनिसेफच्या रिपोर्ट नुसार जगात प्रत्येक  चौथे मुल कुपोषित आहे.


 जाणून घेऊया  युनिसेफच्या रिपोर्ट मध्ये आहाराचे काय नियम आहेत.

युनिसेफचे म्हणणे आहे की लहान मुलांना कमीत कमी पाच खाद्य पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. आणि या पेक्षा कमी श्रेणीचा आहार असल्यास ते मुल कुपोषित श्रेणीमध्ये येते.

१) आईचे दुध
२) दुग्ध उत्पादने
३) फल भाज्या, धान्य, कंद, केळी.
४) डाळी, कडधान्य
५) मांस, कोबडी आणि मासे
६) अंडी
७) जीवनसत्व ए युक्त फळे


कुपोषणाचा परिणाम

पाच वर्षापेक्षा लहान मुलांना योग्य ते भोजन न मिळाल्यास त्यांन गंभीर दुर्बलता येऊ शकते. परिणामी अशी मुलं अनेक रोगांना बळी पडतात. आणि पुढे अशी मुलं मृत्यूमुखी पडतात. काही वेळा थोड्याश्या अन्नावर ही मुलं आपलं जीवन जगत असतात. परंतु अशी मुले कधीच जगाबरोबर संघर्ष करू  शकत नाही. म्हणून तर अशी मुल सगळ्यांच्या पाठीमागे असतात.

आपण आपल्या आशियाई देशामधील बाल खाद्य गरिबीचा चार्ट पाहूया   

युनिसेफच्या रिपोर्ट नुसार जगात प्रत्येक  चौथे मुल कुपोषित आहे.

निष्कर्ष

युनिसेफचा हा अहवाल प्रत्येकाला विचार करायला लावणारा आहे. प्रत्येक देशाला यावरती उपाय योजना राबवाव्या लागतील. जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन या गंभीर विषयावरती तोडगा काढला पाहिजे. कारण राज्यकर्ते / सरकार  यावरती निश्चित ठोस उपाय योजना राबवतील हे निश्चित सांगता येणार नाही. यासाठी तरुण वर्गाला एकत्र येण्याची गरज आहे.




Read More : 

गृहिणी म्हणजे मोलकरीण नव्हे : सामाजिक गैरसमज बदलण्याची गरज

सुंदर आयुष्य कसं जगायचं? सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे

महिला दिवस २०२३ : ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो ?

आपल्या पाळीव प्राण्याशी नातं कसं असावं ? How to have a relationship with your pet?  


 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!