भगवान श्रीकृष्णाविषयी अनमोल माहिती | श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल ब्लॉग

SD &  Admin
0

 योगेश्वर श्रीकृष्ण शाक्षात ईश्वर. दृष्ट कृतीने माजलेल्या मनुष्याला योग्य ती दिशा देण्यासाठी या धरतीवर मनुष्य रुपात अवतरीत झाले. दृष्टाना शासन आणि निष्पाप लोकांच रक्षण करुन त्यांनी धरतीवर धर्माच राज्य स्थापित केलं.

या माझ्या ईश्वराला कोटी कोटी प्रणाम. यांच्या विषयी अनंत गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. कारण त्यांनी लहानपासूनच आपल्या अद्भुत शक्तीचे दर्शन घडवले होते. मोठ मोठ्या राक्षसांना त्यांनी याम लोकी पाठवले होते. समाजात शांती आणि धर्माचे राज्य स्थापित व्होवे म्हणून त्यांनी अनेक लीला केल्या.

आज या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाविषयी अनमोल माहिती देणार आहोत. कदाचित तुम्ही ही माहित ऐकली देखील नसेल. चला तर जाणून घेऊया.

भगवान श्रीकृष्णाविषयी अनमोल माहिती | श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल ब्लॉग

भगवान श्रीकृष्णांचा जीवन परिचय | श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल ब्लॉग 


भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीलांच दर्शन 

भगवान श्रीकृष्णाचा जन्म : ५२५२ वर्षापूर्वी झाला.

त्यांची जन्म तारीख : १८ जुलै ३२२८ इसवी सन पूर्व ( बी.सी )

महिना : श्रावण 

दिवस : अष्टमी 

नक्षत्र : रोहिणी

वार : बुधवार 

वेळ : रात्री १२:०० वाजता.

भगवान श्रीकृषणाचा जीवनकाळ : १२५ वर्ष, ०८ महिने आणि ७ दिवसाचा होता.

महानिर्वाणाची तारीख: १८ फेब्रुवारी ३१०२ इसवी सन पूर्व ( बी. सी ).

भगवान श्रीकृष्ण ८९ वर्षाचे असताना कृरूक्षेत्रावर महाभयंकर युद्ध सुरु झाले होते.

कृक्षेत्रावरील महायुद्ध संपल्यानंतर ३६ वर्षानी भगवान श्रीकृष्ण यांचे महानिर्वाण झाले.

भीष्म पितामह यांचा मृत्यू २ फेब्रुवारी ३१३८ इसवी सन पूर्व रोजी झाला.

भगवान श्रीकृष्ण यांची विविध रुपात भक्ती केली जाते

१) कृष्ण कन्हैया, जगन्नाथ, विठोबा, श्रीनाथ, रणछोड, मधुसुधन, मुरारी, वासुदेव, आदि .

पिता: वासुदेव 

माता : देवकी 

पालक पिता : नंद 

पालक माता : यशोदा

ज्येष्ठ बंधू : बलराम 

भगिनी : शुभद्रा 

जनस्थळ : मथुरा 

पत्नी : रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बुवंती, कालिंदी, मित्रविंदा, नगनजिती, भद्रा आणि लक्ष्मणा.

लहानपणी  भगवान श्रीकृष्ण यांना त्वचेच्या रंगामुळे गोकुळवासी त्यांना कान्हा म्हणत असत.

वृंदावनामध्ये ते १६-१७ वर्ष राहिले. तेथे १४ -१६ व्या वर्षी त्यांनी कंस मामाला मारले.

मगध देशाचा राजा जरासंध याच्या सततच्या युद्धामुळे जनतेच्या रक्षणासाठी त्यांनी मथुरा सोडून द्वारकेला स्थलांतर केले.

वयाच्या  १६-१८ व्या वर्षी ते शिक्षणासाठी उजैनमधील संदिपानी आश्रमात दाखल झाले.

शिक्षण संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पांडवांना मिळाले. लाक्षागृह जळीत प्रकरणात त्यांनी पांडवांना वाचवले. आणि नंतर त्यांनी त्यांचा द्रोपदी बरोबर विवाह करुन दिला.

इंद्रप्रस्थ ही राजधानी उभी करण्यासाठी त्यांनी पांडवांना मदत केली 

वस्त्रहरणाच्या गैरवर्तन प्रकरणी भगवान श्रीकृष्ण यांनी द्रोपदीचे रक्षण केले.

पांडवांच्या वनवास काळात ते पांडवांच्या बाजूने उभे होते.

जरा नावाच्या शिकाऱ्याने मारलेल्या बाणामुळे भगवान श्रीकृष्ण यांचे महानिर्वाण झाले.

मित्रानो भगवान श्रीकृष्ण ईश्वरी अंश होते, तरीही त्यांचे जीवन इतके सोपे नव्हते. त्यांचे जीवन हे संघर्षमय होते. अनेक शत्रूंनी वेढलेले होते. जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत ते लढतच राहिले. ही मनुष्य जातीला शिकवण आहे कि संघर्ष आणि मृत्यू कोणालाही चुकलेला नाही आहे.


निष्कर्ष

मित्रानो भगवान श्रीकृष्ण यांचा जीवनपट वाचल्यावर समजते की, कर्म कोणालाही चुकले नाही. जो मनुष्य या धरतीवर जन्म घेतो, त्याला संघर्ष हा करावाच लागतो. मग तो गरीब असो किबा श्रीमंत. तुम्हाला या वरून लक्षात येईल कि भगवान श्रीकृष्ण स्वयं ईश्वर असून ही त्यानो मानवी जीवनाच्या नियमांचे कधी उल्लघन केले नाही.

जेव्हा प्रकृती माणसाला शक्ती देते, तेव्हा त्याचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी केला पाहिजे, हे तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांचे जीवन चरित्र वाचल्यावर समजते.   

माझे पान 

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ ही २६ ऑगस्टला  येत आहे आणि दहीहंडी ही २७ ऑगस्टला येत आहे. आपल्या लाडक्या योगेश्वराराच्या भेटीसाठी सगळेच आतुर आहे. तरीही उत्सव हा प्रेमाचा आणि आनंदाचा असतो. तो शांततेत पार पडावा यासाठी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे.


Read More :

विघ्नहर्ता श्री गणपतीचे आगमन २०२४ : दिवस आनंदाचे आणि उत्सवाचे

Raksha Bandhan Special Day 2024 : भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस

महिला दिवस २०२३ : ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो ?

    


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!