सुंदर आणि कलरफुल कोंकण | Beautiful and Colorful Konkan | कोकण फोटो कलेक्शन

SD &  Admin
0

पैसे मिळवण्याच्या नादात शहरात भटकत असतो. मनाला अगदी ग्लानी आलेली असते. मन अगदी भारावून गेलेले असते, कधी एकदाची वाट कोंकणाकडे वळतेय. खरच.. आयुष्य सुंदर जगायचं असेल तर आपल्या आवडत्या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे. आणि कदाचित आजच्या पीडिला हेच जमत नाही आहे.


एकदाची सुट्टी मिळाली आणि घरी जायची गडबड सुरु झाली. कधी एकदाचा कोकणात पोहोचतोय असं झालं होतं. आणि तो दिवस आलाच. सकाळी पहाटे पाचला उठलो. सगळ्या विधी आटपून बस स्टॉपवरती पोहचलो. गाडीत बसलो आणि गाडी माझ्या गावाकडे जायला निघाली. आज कुणास ठावूक रस्ता काही संपल्या संपेना. मन अगदी व्याकूळ झालं होतं.  हां.. पण मन मात्र कधीच घरात पोहचलं होतं. आईने बनविलेल्या स्वादिष्ट जेवणाचा स्वाद कधीच मनातल्या मनात चाखत होतो. खरच.. तुम्हाला काहीतरीच वाटेल पण.. माझं कोंकण मुळात आहेच खूप खूप सुंदर.

घरी गेल्यानंतर माझा रोजचा एकच छंद असतो, तो म्हणजे लहान मुलांना घेवून, जंगल सफारी करायची. नदी ओढ्यावरती जायचं.. तिथे पोहायचं. खूप मजा करायची. खरच खूप मजा येते. बालपण आठवतं! मोठी माणसं म्हणतात लहान झालास की काय.. पण मी मनात म्हणतो, या लोकांना बालपणीची मजा काय कळणार. ही माणसं सुख इकडे तिकडे शोधत बसतात. पण मी मात्र शोधत बसत नही. तर मी प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुखात परिवर्तीत करत असतो.

सुंदर आणि कलरफुल कोंकण


खर.. तर मी कधीच यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मला जे करायचं असते, तेच मी करतो. मला ज्या गोष्टीत आनद वाटतो त्या साठी वाट पाहत नाही,.. तर वेळ न घालवता तो अनुभवण्याचा प्रयत्न करतो. मनाला एक वेगळाच आनंद वाटतो.


गावाला असताना काही महत्वाचे क्षण मी माझ्या कॅमेरा मध्ये बंदिस्त केले होते, आठवण म्हणून. वेळ मिळतो तेव्हा त्यांना पाहत असतो. आठवणीना उजाळा द्यायला मला खूप आवडतं. पहा.. तुम्हाला कसे वाटतात ते...

कोंकणातील सुंदर फोटो कलेक्शन 

Beautiful and Colorful Konkan

मनाला अनंत सुखद अनुभव करुन देणारें हे दृश्य आहे. पाऊस नुकताच निघून गेला होता. तसा मी जंगलाच्या दिशेने निघालों. जंगलातील ते सुंदर दृश्य पाहून मन आनंदून गेले. हा फोटो त्या वेळी निर्मित झाला होता.

भात लावणीचा सुंदर फोटो

भात लावणी झाल्यानंतरचं सुंदर दृश्य. मनाला आनंद देणारं आहे. चार नारळीच्या झाडाच्या मागून या दृश्याला टिपले आहे.


भात लावणीचा सुंदर फोटो

नुकतीच भात लावणी झाली होती...


भात काढणीचा फोटो

भात काढनी अशा पद्धतीने आमच्या कडे होते. पावसात भाताची रोपं काढायला खूप मजा येते. खरं.. म्हणजे मातीत काम करने कधीही मला आवडतं.  

लहान मुलांसोबत पोहण्याचा आनंद घेताना

काय सांगू.. हे दृश्य माझ्यासाठी खास आहे. कारण जेव्हा जेव्हा पोहण्याची तळप येते, तेव्हा मी गावातील लहान मुलांना गोळा करुन त्यांना पोहण्यासाठी ओढ्यावर घेवून येतो. लहान मुलं ही माझ्याबरोबर धावत पळत  येतात. त्यानंतर फक्त आणि फक्त धमाल मस्ती असते.

लहान मुलांसोबत पोहण्याचा आनंद घेताना

पाण्यात खेळता खेळता नको त्या करामती करने आम्हाला खूप आवडते. ओढ्यावरती मोठा बांध घालण्यात बच्चे कंपनी व्यस्त आहे. मी ही त्यांच्या सोबत आनंद घेत असतो. 

लहान मुलांसोबत पोहण्याचा आनंद घेताना

पावसाची मस्त सर निघून गेली की, पाण्यात बुडी मारण्याची मजाच काही वेगळी असते.... एकदा तुम्ही ही अनुभव घ्या.


सुंदर निसर्ग


मित्रहो .. बालपणीच्या आठवणी अनेक असतात. तसेच वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या मुलांचे विचार वेगवेगळे असतील. पण आनंद मात्र एकच असतो. तसेच माझे आहे. कोकणात माझा जन्म झाल्यामुळे निसर्गाचे अद्भुत दर्शन सतत घेत असतो. आज अधिक वेळ हा शहरात असतो. परंतु घरी कोकणात येण्यासाठी मला कारण लागत नाही. नुसतं मनाने इच्छा केली तरी, गावाकडची वाट पकडतो.

अनुभव भरपूर आहेत. भरपूर म्हणजे ते सतत वाढतच असतात. असं सगळ्यांचच होतं. कधी कधी मी इतका बावरून जातो की.. शब्द पण काय लिहावेत तेच समजत नाही. प्रत्येक शब्दाची रस्सीखेच सुरु असते. पण शेवटी सगळ्याचा नंबर नक्कीच येतों.


मित्रहो... भेटूया पुढील ब्लॉग मध्ये सुंदर आणि कलरफुल कोंकणचा अनुभव घ्यायला ..... धन्यवाद  
 

Read More...

आनंदाचं झाड माझ्या अंगणी आहे | आनंदाने जीवन कसं जगावं

कोकणातील मातीची घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण
  






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!