मध जवळ जवळ सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. याची चव अमृतासमान असते. नुसती जिभेवर घेताच मेंदू दुसऱ्याच विश्वास तल्लीन होऊन जातो. अशा या मधाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही प्रमाणात आणि योग्य वेळी मधाचे सेवन केलेत तर तुम्हाला अनेक फायदे होतील.
मध खाण्याचे गुणकारी फायदे
ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे, त्या लोकांनी नियमितपाने काही महिने सेवन केले तर वजन वाढण्यास मदत होईल.
तुम्ही दररोज संध्याकाळी मधाबरोबर आवळ्याचे चूर्ण मिक्स करुन सेवन केले तर पोटाचे आरोग्य चांगले राहते.
खोकला येत असेल तर, आल्याचा रस मधात मिक्स करुन चाटण्याने आराम मिळतो.
रात्री कोमट पाणी किंवा दुधात मध मिसळून पिण्याने झोप चांगली येते, तसेच पोट ही साफ राहते.
गर्भवती स्त्रियांनी मधाचे सेवन अवश्य करावे. हे त्यांच्या शरीराला स्वस्थ्य ठेवते. तसेच गर्भस्त बाळाला सुडौल आणि बाळ तंदृस्त राहण्यास मदत होते. या अवस्थेमध्ये मधाचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता, अशक्तपणा, झोप न येणे यासारख्या समस्या दूर होतात.
जर जिभेला भेगा पडल्या असतील तर मधाच्या पाण्याने गुळण्या करण्याने भेगा दूर होण्यास मदत होते. तसेच गळाही साफ राहतो.
घशामध्ये खव खव होणे, आवाज बसणे, या सारख्या त्रासा वेळी दिवसातून ३-४ वेळा मध चाटण्याने आराम मिळतो.
मधाच्या गुणकारी फायद्यामध्ये सौंदर्यवर्धकाची भूमिका देखील मध निभावतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी झोपताना मधाचे काही थेंब चेहऱ्यावर चोळावेत. त्यानंतर काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
मध, लिंबाचा रस आणि थोडस पाणी मिसळून चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहरा स्वच्छ होतो.
मधाचा नैसर्गिकरित्या उपयोग केल्याने त्याचे चांगले फायदे मिळतात. तुम्हीही महागडी सौंदर्य प्रसाधने लावण्यापेक्षा कमी खर्चात आणि कोणताही दुष्परिणाम न होणाऱ्या आपल्या आसपास मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे.
Read More :
मनाला चांगलं फील करण्याचे पाच मिनिटाचे मेडीटेशन तंत्र
स्टोन थेरपी काय आहे ? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ?
शरीरात पाणी टिकून राहिल्याने कोणत्या समस्या उद्भवतात : Water Retention Bad for Body
त्वचेला होणारी खाज कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा