खूप दिवसांनी घरात अलगडीच्या रूम मध्ये गेलो होतो, तेव्हा कोपऱ्यात निपचित पडलेली माझ्या बालपणीची आठवण दिसली. खूप वाईट वाटल. पटकन तिला सापसुप करुन चांगल्या ठिकाणी तिची व्यवस्था केली. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ती कोणती आठवण असावी?
"जातं" मित्रानो जात्याची महती खूप मोठी आहे. जर तुमचा जन्म ९० च्या दशकात झाला असेल तर, जातं म्हणजे काय असतं ते सांगण्याची गरज लागणार नाही. मला जात्या विषयी खूप प्रेम आहे. कारण मी बालपणी याच जात्यावर दळलेली भाकरी खालली आहे. त्यामुळे मी या आठवणींच्या खूप जवळ आहे.
जात्याची आठवणींतील माहिती
जातं म्हणजे पावित्र, जातं म्हणजे घराची शोभा, जातं म्हणजे संस्कृतीचा ठेवा. खरं तर अनेक औलोकिक अलकांरानी जात्याला सजवलेले आहे. चुकून जरी पाय लागला तरी माणस तिला नमस्कार करायची. अशा या जात्यावर अनेक कवींनी तर ओव्यांची बरसात केली आहे. बहिणाबाई चौधरी यांनी जात्याची महिमा खूप उंच स्तरावर नेऊन ठेवली आहे.
जात्याची रचना कशी असते ते समजूया
साधारण पणे दीड दोन फुटाचा व्यास आणि साडे तीन इंच उंची असते. गोलाकार एकाच दोन मापाच्या दगडांची सुंदर मैत्री. यामध्ये वरच्या गोलाकार भागाला "वरची तली" आणि खालच्या भागाला "खालची तली" अस म्हटलं जाते. ही जातं त्यावेळी दगडा बरोबर लाकडाची, तेसेच मातीची देखील मिळायची. मी कधी लाकडाची किंवा दगडाची नाही बघतली, पण आजीने मला या विषयी सांगितलं होतं.
खरच.. जात्याकडे बघितले की बालपणीची खूप आठवण येते. लहान असताना याच जात्यावर दळलेल्या धान्याच्या भाकऱ्या खालल्या होत्या. फार चांगली चव लागायची. माझी आई-आजी जात्यावर धान्य दळायला बसायची तेव्हा मी पण थोड थोडं धान्य दलायचा. फार मजा येत असायची. लहानपणी आमच्या सगळयांची पहाट ही जात्याच्या आवाजाने व्हॉयची. आवाज आला की आम्हाला कळायचे कि आई किंवा आजी जात्यावर धान्य दळत आहे. मग आम्ही एक एक करुन उठायचे.
मला जात्यावर भरडलेल उडीद डाळीच डांगर खूप आवडायचं. आणि हे डांगर काहीस पाच मिनिटात तयार होतं. फक्त पिसलेल्या उडदाच्या पिठात तिकट मीठ, आणि गरजे नुसार पाणी टाकल की तयार होतं डांगर. त्यावेळी काय चव लागायची हों. परंतु आज या गिरणीच्या पिठाला काय म्हणावे तेच कळत नाही..
फार छान दिवस होते ते. श्रीमंती नव्हती परंतु सुख मात्र भरभरून होतं त्यावेळी. मदतीला ये म्हणून सांगायची गरज नव्हती. अगदी माणसाला चाहूल लागली तरी, धावून येत असायची.
जात्याविषयी माझी आजी काय म्हणते..
माझी आजी बहुतेक वेळा जात्यावर धान्य दळत असायची. तिला जातं खूप आवडायचं. खरं तर आज जेव्हा मी विचार मंथन करतो, तेव्हा समजत कि माजी आजीची ती मैत्रिणीच होती. दिवसभर तिला सगळे सोडून कामाला जायचे . पण तेव्हा जातं मात्र तिच्या सोबतच असायचं. मला आजी म्हणायची, तू जेव्हा खूप लहान होतास तेव्हा, तुला मांडीवर घेवून जात्यावर दळण दळायची. तु रडायला लागलास कि जात्यावरची गाणी देखील म्हणायची. आज ती गाणी मला आठवत नाहीत, परंतु ती गुणगुणायची तेव्हा कानात गोडवा दरवळायचा. खूप छान वाटायचं. झोप कधी लागायची तेच कळायचं नाही.
मला आजी सांगायची, हे जातं तिच्या आजी सासूच्या काळापासून आपल जीवन जगत आल होत. तिच्या सासूच्या सासूने ते तिला दिलं होतं आणि ते जपून ठेवायला सांगितलं होतं. त्या नंतर ते आजीने माझ्या आई कडे दिले होतं. आणि तिने ही तेच सांगितलं होतं, जे तिच्या सासूने तिला सांगितलं होतं. माझ्या आजीच्या काळापर्यंत ते जातं खूप सुरक्षित होतं. परंतु काळाच्या ओघात आणि आधुनिक विकास या गोष्टीमुळे जातं आज अडगळीच्या खोलीत धूळ खात आहेत.
खर तर.. कोंकणात आज ही लग्न वैगरे कार्यक्रमात जात्याची पूजा केली जाते. तुम्हाला माहिती आहे का ते ठाऊक नाही. पण जात्याला ही पूजेचा मान आहे. आपल्या हिंदू धर्मात गृहदेवता म्हणून तिला मान आहे. खूप काही आहे या जात्याविषयी सांगण्यासारखं. पण दु:ख एवढंच वाटतं कि काळाच्या ओघात माणूस हे सर्व विसरला आहे.
माझे शब्द
जुनं ते सोनं ही म्हण फक्त कागदावरच ठेऊ नका. तिला तिचा मान ही द्या. बोलण्याचा उद्देश हा आहे कि आपण ज्या गोष्टीचा उपभोग घेतला. तिच्या पासून काम करुन घेतली. तर अशा गोष्टींना विसरून जाऊ नका. हा.. नव्या गोष्टी धारण केल्या पाहिजेत. परंतु हे ही विसरू नका कधीकाळी त्या जुन्याच गोष्टी तुमच्या आयुष्याचा भाग होत्या. मित्रानो.. जुन्या गोष्टी जपून ठेवा. आठवणीचा भाग म्हणून तरी जपून ठेवा. कारण सरत्या काळात त्याच जुन्या गोष्टी तुम्हाला आनंद देत राहतील.
तुम्ही वाचत आहात.. जात्याची महती : जातं म्हणजे पावित्र, जातं म्हणजे घराची शोभा
Read More :
शाळा : बालपणाला आधार देणारं घर - माझे पान
आठवणीतल्या सरी : मनातले चांदणे
चांगले विचार : तुमच्या आयुष्यातील चांगली कामे कोणती आहेत? | Delight Life Style