Raksha Bandhan Special Day 2024 : हिंदू धर्मात रक्षाबंधन पवित्र सण मानला जातो. हा दिवस श्रावण महिन्याचा पौर्णिमेला साजरा केला जातो. या वर्षी रक्षा बंधन १९ ऑगस्ट २०२४ ला साजरी करण्यात येईल. भाऊ-बहिणीसाठी हा दिवस फार महत्वाचा असतो. या पवित्र दिवसी बहिण आपल्या भावाला राखी बांधते. त्याचे औक्षण करते. भावाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून ईश्वराकडे प्रथांना करते. भाऊ आपल्या बहिणेचे आयुष्य भर रक्षण करत राहील याचे वचन देतो. फार गोड आणि सकारत्मक उर्जेने भरलेला दिवस असतो.
आपण आता जाणून घेवूया या दिवसी राखी बांधण्याचा शुभमुहर्त कोणता असेल?
राखी बांधण्याचा शुभ मुहर्त - ( Raksha Bandhan Shub Muhart )
वर्ष २०२४ मध्ये रक्षाबंधन दिवस हा १९ ऑगस्ट २०२४ असेल. या दिवसी शुभमुहर्त १ वाजून ४३ मिनिटांनी सुरु होईल ते 4 वाजून २० मिनिटापर्यंत असेल. या वेळात आपण राखी बांधावी. ही वेळ आपल्याला 2 तास ३७ मिनट साजरी करण्यासाठी मिळेल.
बरोबर ज्यांची वेळ चुकली गेली तर, तुम्ही प्रदोष काळात राखी बांधू शकता. ही वेळ ६ वाजून ५६ मिनिटांनी सुरु होईल ते रात्री ९ वाजून ७ मिनिटापर्यंत असेल.
राखी बांधण्याची विधी ही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
राखी बांधण्याची विधी ( Raksha Bandhan Puja Vidhi)
रक्षाबंधनाच्या दिवसी भाऊ आणि बहिणीला उपवास करायचा आहे. त्या दिवसी तुम्हाला एक स्वच्छ ताट घ्यायचे आहे. ताटात कुंकू, हळद, चंदन, दही, अक्षत, राखी, गोड मिठाई आणि तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हे पूजेचे ताट प्रथम तुम्हाला देवाला समर्पित करायचे आहे. त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला चेहरा करुन पाठावर बसण्यास सांगणे. त्यानंतर भावाला आधी कुंकू लावा आणि मग राखी बांधा. राखी बांधल्यानंतर त्याची आरती करा. त्यानंतर मिठाई भरवून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ईश्वराकडे प्राथना करा.
शास्त्रामध्ये राखी कशी आसावी हे ही सांगितले आहे.
राखी कशी असायला पाहिजे?
राखीला तीन दोरे असायला पाहिजे. लाल, पिवळा आणि सफेद राखीला चंदन लावले तर ते शुभ मानले जाते.
राखी बांधताना बहिणीने जर या मंत्राचा जप केला तर भावाला दीर्घआयुष मिळते तसेच भाऊ-बहिणीमध्ये प्रेम दीर्घकाळ राहते असे म्हटले जाते. पाहूया हा कोणता मंत्रजप आहे.
राखी बांधताना या मंत्राचा जप करा
'येन बधो बळीराजा, दानवेंद्रो महाबलः।
तेनत्वाम प्रति बद्धनामी रक्षे, माचल-माचलः
परंतु शास्त्रामध्ये भद्राकाळा मध्ये राखी बांधायला नकार दिलेला आहे.
भद्राकाळा मध्ये राखी का बांधत नाही?
बहिणीने भावाला राखी भद्राकाळामध्ये बांधू नये. याचे कारण जाणण्यासाठी तुम्हाला एक पौराणिक कथा ऐकावी लागेल. रावणाची बहिण शूर्पणखाने रावणाला भद्राकाळामध्ये राखी बांधली होती, आणि पुढील एका वर्षातच रावणाचा वध झाला होता. अशी मान्यता आहे कि भद्रा ही शनी देवाची बहिण होती. या भद्रेला ब्रम्ह देवाचा श्राप होता कि भद्राकाळामध्ये जो कोणी शुभकार्य करेल त्याचा परिणाम हा अशुभ होईल.
माझे शब्द
मित्रांनो राखी ही पवित्र बंधनाची निशाणी आहे. या निशाणीला व्यर्थ जाऊ नका. बोलण्यचा हा उद्देश आहे कि आजच्या काळात राखीला पाहिजे तेवढ महत्व दिल जात नाही. कधी कधी वाटत कि हा फक्त कागदावर सणच राहिला आहे. याची अनेक कारणे आहेत. तरीही या दिवसाचे पावित्र राखून प्रत्येकाने भाऊ-बहिणीच्या या पवित्र दिवसाला स्मरणात ठेवूया.
Read More :
महिला दिवस २०२३ : ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो ?
प्रत्येक दिवसाचा एक स्पेशल आणि लाभदायक रंग असतो
सुंदर आयुष्य कसं जगायचं? सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे