डोळे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. डोळे किती महत्वाचे असतात, ते आंधळ्या माणसाला विचारा. ती व्यक्ती अगदी बरोबर सांगेल, कि जीवनात डोळे किती महत्वाचे असतात.
डोळ्याचे महत्व ओळखून आपल्याला डोळ्याची निगा चांगली राखने आवश्यक आहे. यासाठी वेळोवेळी डोळे धुणे आणि डोळ्यांचा व्यायाम करने अति आवश्यक आहे.
यासर्वामध्ये डोळे धुणे ही पद्धत फार महत्वाची आहे. चुकीच्या विधीमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. आपण येथे डोळे कशा प्रकारे धुवावे, जेणेकरून डोळे स्वच्छ आणि डोळ्यांना कधीही त्रास होणार नाही, या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
डोळे धुण्याची प्रभावी पद्धत कोणती?
जेव्हा तुम्ही डोळे धुवायला जाल तेव्हा प्रथम हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्या. त्या आधी चष्मा किंवा लेन्स लावत असाल तर त्या वस्तू बाजूला काढून टाका. त्यानंतर आपल्याला योग्य त्या कृती करायच्या आहेत.
गरम कोमट पाण्यात कापूस भिजवून घ्या. कापूस ठेवताना डोळे बंद असावेत. ध्यान ठेवा किंवा पाणी गरम फार नसावे. तुम्हाला झेपेल तितकेच असावे. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल आणि डोळ्यातील घाण निघून जाईल.
एका ग्लास मध्ये कोमट पाणी घ्या. त्यानंतर आपले डोके ठेवलेल्या पातेल्यात एकदा उजवीकडे आणि डावीकडे वळवा. त्यामुळे चेहऱ्याच्या दोन्ही बाजू स्वच्छ होतील.
एका पातेल्यात पाणी घ्या. त्यामध्ये आपला चेहरा बुडवा. त्यानंतर डोळे उघड झाप करा. असे काही वेळा करा. तसेच हातावर किंवा लहान बशीत पाणी घेवून ही तुम्ही कृती करू शकता.
ध्यान ठेवा कि लहान मुलांचे डोळे तुम्ही धुवत असाल तर ते कालजी पूर्वक या कृती करा.
चेहरा चमकदार आणि फ्रेश दिसण्यासाठी दिवसातून तीन चार वेळा असे करावे. बाहेरून काम करुन आल्यानंतर न चुकता चेहरा स्वच्छ धुवा.
चेहरा धुण्यासाठी शक्य तो आयुर्वेदिक साबणाचा किंवा फेसपॅकचा उपयोग करा. आरोग्यासाठी ते चांगले असते.
गोष्टी खूप लहान आहेत, परंतु आरोग्यासाठी या लहान लहान गोष्टी फार महत्वाच्या असतात.
Read More
दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी मदत करते
मनाला चांगलं फील करण्याचे पाच मिनिटाचे मेडीटेशन तंत्र
स्टोन थेरपी काय आहे ? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ?