आठवड्याचे वार ओवी | सात वारांची ओवी | मराठी ओव्या | Marathi Ovi

SD &  Admin
0

जगभरात तुम्ही कुठेही गेलात तरी, प्रत्येक वार हा पुन्हा आठ दिवसांनीचं येतो. म्हणून आपण त्याला आठवडा म्हणतो. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक वराची विशेषता आहे. तसेच आपला हा वार प्रत्येक देवाचे प्रतिनिधित्व करत असतो. कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या कोणत्या देवाचा आवडता असतो.

म्हणून तर अनेक कवींनी, लेखकांनी  या आठवड्याच्या वारा वरती ओव्या लिहिल्या आहेत. फार सुंदर आणि ऐकायला मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत.

आठवड्याचे वार ओवी | सात वारांची ओवी| मराठी ओव्या | Marathi Ovi

Athavadyache War Ovi | Sat Varanchi Ovi


आठ दिसाचा बुधवार, भाऊ आनंद कुणी केला.

गवळण बोले तिथ, कृष्ण गोकुळी जल्मला.

बुधवार या वाराला धार्मिक विधी मध्ये खूप महत्व आहे. बुधवार हा वर श्री विष्णूचा, विठ्ठळाला आणि बुध ग्रहाला समर्पित आहे. त्यामुळे बुधवार हा बुद्धीचा वार  देखील म्हटलं जात. कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात ही बुधवारीच केली जाते.  

 

बुधवार टाकुनी गुरुवार आला ग,

साखर कापूर घेवून नार निघाली देवाला.

गुरु ग्रह हा नावानुसारच गुरु ग्रहाला समर्पित आहे. म्हणून या ग्रहाला शिक्षण, संतती आणि भाग्याचा आणि सद्गुरूचा तारक मानला जातो. तसेच गुरुवारी पूजापाठ आणि व्रत केल्यास त्याचे फळ लवकर मिळते असेही मानल जात.

 

गुरुवार जाऊनी शुक्रवार आला

चोळी पातळाची ओटी लक्ष्मी आई तुला

नावावरूनच आपल्याला बोध झाला असेल,  शुक्रवार हा वार हा आदिशाक्तीला समर्पित आहे. म्हणून या दिवसी  प्रत्येक देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते.

 

शुक्रवार गेला आणि शनिवार आला

देवा त्या मारुतीला रुई फुलांची ग माला


शनिवार हा वार शनिदेवाला आणि मारुतीला समर्पित आहे. या दिवसी लोक आपल्यावरील साडेसाती, दु:ख दूर करण्यासाठी शनिदेवाच्या मंदिरात पूजा पाठ करतात. याच दिवसी मारुतीची ही पूजा केली जाते. अस म्हटलं जात, जी लोक मारुतीची मनापसून भक्ती करतात, त्या लोकांना शनिदेव कधीच आपली कृदृष्टी टाकत नाही. म्हणून शनिवारी एकाच दिवसी शनिदेवाची आणि मारुतीची पूजा केली जाते.

 

शनिवार गेला न रविवार आला

देव ज्योतीबाला दौडा गुलाल वाहू चला

रविवार हा सूर्यदेवाला आणि ज्योतीबाला समर्पित आहे. म्हणून रविवारला आदित्यवार देखील म्हटलं जात. या दिवसी सूर्यदेवाला रुईची मला अर्पित केली जाते.

 

रविवार गेला ग सोमवार आला 

बेलाची दुरडी वाहू देवा महादेवाला 


सोमवार हा वार महादेवाला समर्पित आहे. या दिवसी भाविक महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. या दिवसी मुख्यतो अर्धनारेश्वरची पूजा केली जाते. ओम नम शिवायच्या गर्जात भाविक महादेवाला भक्ती समर्पित करतात. 

 

सोमवार गेला मंगळवार आला 

हाती परडी घेवूनीया यलोनी घ्या जोगव्याला  

मंगळवार हा मंगल समयीचा आहे. या दिवसी चांगली कामे चांगला मुहूर्त महणून बघितलं जात. 




मित्रानो आपल्या हिंदू धर्मात धार्मिक साहित्याला फार महत्व आहे. म्हणून तर आठवड्याचा वाराला ही दैवी गुण समर्पित आहे. आज ही खेड्या गावात किंवा इतर धार्मिक कार्यक्रमात ओव्या आवडीने म्हटल्या जातात. आपली संस्कृती पुढेही अशीच चालत राहण्यासाठी आपल्याला संस्कृतीच जतन केल पाहिजे.



Read More

जात्याची आठवणींतील माहिती : जातं म्हणजे पावित्र, जातं म्हणजे घराची शोभा



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!