परिचय : बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगावचा. त्यांचे माहेरचे आडनाव हे महाजन. पुढे त्याचं लग्न झाल्यानंतर त्या चौधरी झाल्या. मुळात बहिणाबाई चौधरी या शाळेत कधीच गेल्या नाही. तरीही त्यांनी त्यावेळी कोणतेही साधन नसताना कविता, ओव्या रचल्या होत्या. परंतु लिहिता येत नसल्यामुळे खूप रचना विलुप्त झाल्या. परंतु पुढे त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी आणि त्यांच्या मावस भावाने काही ओव्या, कविता जतन करुन ठेवल्या.
बहिणा बाई चौधरी या निरक्षर असल्यातरी त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता होती. निसर्गाने तशी त्यांना शक्तीच दिली होती. त्यांच्या मुखातून सरस्वतीच शब्दांच्या रूपाने बाहेर पडत असे. पुढे त्यांच्या मुलांबरोबर नातवंड आणि सुनांनी त्यांच्या ओव्यांच जतन केलं.
बहिणा बाई चौधरी या कविता ओव्या काम करता करता रचत असत. शेतात, घरात, स्वयंपाक घरात जिथे त्यांना सुचेल तिथे त्या रचत असत. त्यांच्या गायलेल्या या रचना त्यांची मुल, नातवंड ई. लोकं जतन करुन ठेवत असत. आणि आज ही त्या त्यांच्याकडे सुरक्षित आहेत.
अशा या महान कवयित्रीला खूप खूप धन्यवाद. ज्यांनी येणाऱ्या पिढीला अद्भुत साहित्याची ओळख करुन दिली. आम्ही या ब्लॉग मधून त्यांच्या काही ओव्या शेअर करत आहोत.
Bahinabai Choudhari Yanchya Marathi Ovya
माझं उघडे नशीब
पीकं शेतांत दाटलें
तुझे जवून शेजार्या
घरांमधी सर्वे गोरे
तूंच कशी कायीघूस
उज्या जवारींत आलं
जसं कान्हीचं कनूस !
तुले परनलं पोरी
झाल्या जल्माच्याज भेटी
दिल्लीचं बिलूबांदर
आनी देलं तुझ्यासाठीं !
भाऊ वाचे पोथी
येऊं दे रे कानांवर
नको भूकू रे कुतर्या
तुले काय आलं जरं !
कशी दाखईन रस्ता
आली आंधार्याची रात
कसा देईन रे दान
सांग बुझार्याचा हात ?
कधीं बाप जल्मामधीं
घडूं नहीं ते घडलं
जसं कंगूल्याचं लेंकरू
बंगल्यावरती चढलं !
तुझी म्हईस ठांगय
नको रुसू लतखोर्या
माझी म्हईस दुभती
नको हुसूं रे शेजार्या
हिच्या तोंडात साकर
आन पोटांत निंबोनी
मोठी आली पट्टवनी
सार्या मुल्खाची लभानी !
गेला वांकडा तिकडा
दूर सगर दिसला
जसा शेताच्या मधून
साप सर्पटत गेला !
कडू बोलतां बोलतां
पुढें कशी नरमली
कडू निंबोयी शेंवटी
पिकीसनी गोड झाली !
अरे आरदटाकेला
तुले कशाचं हिरीत
तशी निझूर शेताले
काय सांगे बरसात?
नागरलं शेत
खूप केली मशागत
पेरल्या मुकन्या
मारे गानं गात गात !
फाटी गेलं पांघरून
नको बोचकूं रे चिंध्या
झालं गेलं पार पडी
नको काढूं आतां गिंध्या
फाट आतां टराटर,
नहीं दया तुफानाले
हाले बाभयीचं पान
बोले केयीच्या पानाले !
उच्च्या खुज्या जोडप्याची
कशी जमली रे जोड
उगे ताडाखाली जसं
भुईरिंगनीचं झाड !
हिरवे हिरवे पानं
लाल फय जशी चोंच
आलं वडाच्या झाडाले
जसं पीक पोपटाचं !
पयसाचे लाल फुलं
हिर्वे पानं गेले झडी
इसरले लाल चोंची
मिठ्ठू गेले कुठें उडी ?
सोमवती आमावस
कशी आंधारली रात
देल्ही रातांध्याच्या हाती
Read More:
आठवड्याचे वार ओवी | सात वारांची ओवी | मराठी ओव्या | Marathi Ovi