चांगल्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी शरीरात जाणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मतानुसार दररोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात तापमान समतोल राहण्यास मदत होते. बरोबर शरीराचे सर्व अंग सुरळीतपणे आपले काम सुरु ठेवतात.
परंतु तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही सकाळी पाणी कोमट करुन प्यायला, तर शरीराला चांगले फायदे मिळतात. आणि हे प्रुफ सुद्धा झाले आहे. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पीत असाल तर, तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे मुत्रपिंडाचे काम सुरळीतपणे चालते. पचन यंत्रणा सुधारते. बुद्धकोष्टतेची समस्या दूर होते. मेंदूचे काम सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक पाण्याची गरज असते. असे अनेक फायदे आपल्याला आवश्यक पाणी प्यायल्याने होतात. त्यात महत्वाचे कोमट पाणी असायला हवे.
तज्ञ म्हणतात की पाणी गरम करुन नंतर ते कोमट केल्याने त्याचे खूप फायदे होतात. या पाण्यामुळे अनेक आजार लवकर बबरे होतात. शरीरात चांगले बदल होतात. यामध्ये तज्ञ म्हणतात की कोमट पाणी उपाशी पोटी प्यायल्याने खूपच चांगले फायदे मिळतात.
कोमट पाणी पिण्याचे फायदे
मित्रानो पावसाळ्याचे दिवस आहेत. वातावरणात गारवा आहे. त्यामुळे शरीर अनेक रोगांना बळी पडत जाते. याची कारणे ही अनेक आहेत. त्यामध्ये गारवा अधिक असल्यामुळे तहान लागत नाही. म्हणून लोक पाणी प्यायचे विसरून जातात. परिणामी हळू हळू शरीरातील यंत्रणा बिघडू लागते.या प्रक्रीये वर सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिल्याने शरीराला आवश्यक एनर्जी मिळते. त्याचे फायदे काय आहेत, ते ही आपण वरती विश्लेषण केले आहे. शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. लोक हेच विसरतात. आणि आपले आरोग्य धोक्यात टाकतात.
तुम्हाला दररोज थोडे थोडे करुन पाणी प्यायला पाहिजे. ते ही न चुकता. तुम्हाला माहीतच आहे आपल्या शरीरात ७०% पाणी आहे. याचा अर्थ आपल्या शरीराला पाण्याची खूप आवश्यकता असते.
महत्वाचा सल्ला ( गरम केलेले पाणी कोमट झाल्यानंतर पिणे हे शरीरीला हेल्दी ठेवते. तुम्ही जर कोमट पाण्यात थोडे सुंट टाकून प्यायला तर ते शरीराला अधिक उपयुक्त असते.
Read More :
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?