मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका फार महत्वाची असते. अस म्हटले जाते. जसे पालक असतात, तसीच त्यांची मुलं होतात. आणि हे प्रत्यक्ष दर्शनी खरे ही असते. कारण पालक जसे मुलांना संस्कार, शिकवण देतात, तेच पुढे ही मुलं आत्मसात करतात.
या सगळ्यांचा विचार करुन पालकांना प्रथम आपल्यात बदल घडवणे आवश्यक आहे. आणि त्या प्रमाणे आपल्या पाल्याला योग्य ते संस्कार आणि शिकवण द्यायला हवे. तुम्हाला सांगतो माझ्या शेजारी काकांचा एक मुलगा आहे. फार मस्ती, खोड्या करतो. बरं.. खोड्या वैगरे ठीक आहे, परंतु शिव्या देणे, मारझोड करणे ई. कामात तो तरबेज आहे.
माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला की, हा मुलगा एवढ्या शिव्या, मस्ती का बर देत असतो? खूप विचार आणि चौकशी केल्यानंतर समजलं की, त्यांच्या घरचेच वातावरण त्याला असे करण्यास भाग पाडले होते. सुरुवातीला खूप लाड झाले. मस्ती खोड्या करने म्हणजे, लहान आहे, म्हणून करणारच यावर ठप्पा लावला गेला. याचाच परिणाम नंतर घरात इतरांना शिव्या ही देत गेला आणि पुढे त्या वाढत गेल्या. आता मात्र पालकांच्या हातून हे मुल बाहेर जाऊ लागले. म्हणून ते मुल पालकांचे मार खावू लागले. परंतु मार खालल्याने सुधारायचे सोडून, आणखीनच ते मस्ती करू लागले आहे, आता प्रश्न असा पडतो पालकांनी यावर काय करावे?
मुळात पालकच सुरुवातीला पाल्याला अशी सूट देतात आणि जड झालं म्हणून फेकून देण्याचा प्रयत्न करतात. मला वाटते असे करणे फार चुकीचे आहे. कारण असे केल्याने पाल्य सुधारत नाही तर, ते आणखीनच चुकीचे वर्तन करू लागते.
मित्रांनो अशा गोष्टी अधिकांश पालकांच्या बाबतीत घडत असतात. आपलं मुल अशा चुकीच्या स्वभावाला धरू नये म्हणून मुळात पालकांनी सुरुवातीपासूनच त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे. त्यांना चांगले काय आणि वाईट काय याची जाणीव करुन दिली पाहिजे. त्यांचा अपमान न करता, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. असे केल्याने मुलांमध्ये चांगले परिवर्तन घडून येईल.
आता आपण जाणून घेऊया की पालकांनी मुलांशी कसे वागावे म्हणजे मुलं पालकांशी आदराने वागतील.
मुलांना घडवताना पालकांनी त्यांच्याशी कसे वागावे ?
१) आपल्या मुलांच्या गरजा काय आहेत त्या प्रथम समजून घ्या.
२) मुलांनी छंद कोणते जोपासावे यासाठी घरात सगळ्यांनी मिळून चर्चा करा.
3) मुलांना कधी नकारात्मक गोष्टी बोलू नका, नालायक, गधड्या, वात्रट सारख्या शब्दांनी पाल्याला हैराण करु नका.
४) पालक म्हणून दोघांनी पण ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना आई बाबा म्हणूनचं या.
५) सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांना विनाकारण मारू नका. असे केल्याने त्यांच्या बाळ मनावर वाईट परिणाम होऊ शकतात.
६) मुलांना नेहमी जवळ घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांच्याकडून योग्य ती कामे करुन घ्या.
७) मुलांना कोणत्याही गोष्टींची भीती न दाखवता, त्यांना काही जोखीम स्वतः घेऊ द्या. जेणेकरून मुलं एकटं असताना योग्य ते निर्णय घेऊ शकेल.
८) मुलं जेव्हा चुकी करतात, तेव्हा त्यांना या बद्दल जाणीव करुन द्या. अधिक चुका करू देऊ नये. त्यांना या बद्दल समजावून सांगा. तर मुलांनी काही चागल्या गोष्टी केल्या तर, त्यांचे कौतुक मात्र नक्की करा.
९) मुलांच्या मित्रांसमोर त्यांना विनाकारणच वाईट अपशब्द बोलू नका.
१०) आपल्या उपकारांचा बोलबाला सतत त्यांच्यापुढे वाचू नका.
११) मुलांच्या प्रगती पुस्तकावर तुमची नजर असायला हवी. परंतु प्रगती पुस्तक पाहताना पाल्याला कधीही भीती वाटली नाही पाहिजे, असा तुमचा दृष्टीकोन असावा. मात्र भीतीच्या जागी आदरयुक्त भीती मात्र असावी.
मित्रांनों या काही गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक पालकांनी हमेशा आपल्या पाल्याशी केल्या पाहिजे. असे केल्याने मुलं तुमचा आदर करतील आणि तुमच्या सगळ्या गोष्टी मनापासून करतील.
Read More :
पुरुषांना त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत कधी मत्सर वाटतो?
कोणत्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिप राहू नये - अन्यथा पश्चाताप करत बसाल
एखादी व्यक्ती खरच तुमच्या प्रेमात आहे, हे कसं ओळखावं
जर तुम्ही गर्लफ्रेंडच्या पालकांना पहिल्यांदा भेटत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा