नोकरी गेल्यावर परिस्थितीला कसे सामोरे जाल ?

SD &  Admin
0

स्पर्धेच्या काळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आणि त्यात स्पर्धा म्हटलं की टेन्शन हे आलच. मग हे टेन्शन नोकरी गेल्यामुळे असेल किंवा नोकरी मिळत नसेल म्हणून असेल. तसेच इतर ही कारणे असू शकतील.

मित्रानो स्पर्धेच्या काळात नोकरी टिकवणे आणि मिळवणे दोन्हीही फार कठीण आहे. खूप प्रयत्न करुन एखादी नोकरी मिळाली,.. तर ती टिकवण्यासाठी खूप हाणामारी करावी लागते. सिनियरला खुश करण्यासाठी केविलवाणी ती धडपड, फार मेल्यागत होतं.

अशा परीस्थित स्वतःला शांत ठेवणेही खूप कठीण होऊन जातं. बर नोकरी गेल्यानंतर शांत राहून तरी काय मिळणार. पुढे स्वतःच भविष्य तर आहेच ना.. स्वत: बरोबर कटुंब आलं. बायको, मुलं त्यांचा खर्च. या सर्व गोष्टी आठवल्या की डोकं गरगरून जातं. काय करावं ते समजत नाही. कधी कधी काही लोकं जिवनाच बर वाईट करायला देखील मागेपुढे बघत नाहीत.

मित्रानों तरीही परिस्थिती कोणतीही असो. संयम हा हवाच. कोणताही विचार न करता टोकाचं पाऊल उचलने हे मुर्खपणाचे लक्षण आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय आहेतच की... फक्त ती वेळ यावी लागते.

आपण या ब्लॉगमधून  नोकरी गेल्यावर परिस्थितीला कसे सामोरे जाल ?  याबदल जाणून घेऊया.

नोकरी गेल्यावर परिस्थितीला कसे सामोरे जाल ?

नोकरी गेली काय करायचे? कसे सामोरे जाल या प्रसंगाला    


संयम सोडू नका :

नोकरी गेल्यानंतर स्वतःवरच कंट्रोल सोडू नका. काही लोक नोकरी गेल्यानंतर रागान बेभान होऊन जातात. आदल आपट करतात. मित्रांना, घरच्यांना शिवीगाळ करतात. ज्या बॉसने कामावरून काढले असते, त्याला शिवीगाळ करतात. मित्रानों अशा गोष्टी करणे फार चुकीचे आहे. यात तुमचाच तोटा होणार आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे कुणीही तुमच्या मदतीला येणार नाही. उलट तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला दुसरी नोकरी देखील मिळणे अवघड होऊन जाईल. म्हणून संयम हा हवाच. 

उगाच सर्वाना स्वतःबद्दल सांगत बसू नका :

अनेक लोक नोकरी गेल्यावर, आपल्याला नोकरी वरून का काढलं, याबद्दल विनाकारण दुसऱ्यांना सांगत सुटतात. यामध्ये बॉसच्या चुका काय होत्या. त्याच्याबद्दल अनेक जणांनी कसा कट रचला गेला. या बद्दल ते सगळीकडे गाजावाजा करत सुटतात.

अशा प्रकारे वागणे फक्त मूर्खपणाचे लक्षण आहे. असे करुन तुम्हाला नोकरी तर पुन्हा मिळणारच नाही, उलट तुमच्या स्वभावाबद्दल दुसऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण होतील.

शांत राहा, सगळ्यांशी प्रेमाने वागा 

परिस्थिती कशी का असेना, मनावर संयम हा हवाच. अशा परिस्थिती शांत राहा. वाईट न बोलता, सगळ्यांशी प्रेमाने वागा. काय घडलं, काय झालं यावरती विचार न करता. स्वतःला नवीन काय करता येईल हे बघा. प्रेमाने वागल्यामुळे तुम्हाला कुठून तरी चांगला अनुभव नक्कीच येईल.

कारणे शोधा, प्रयत्न करा

नोकरी गेल्यामुळे विनाकारण कोणावरती राग करत बसू नका. उलट झालेल्या गोष्टींबद्दल विचार करुन या गोष्टी का घडल्या याबद्दल चिंतन करा. आणि पुन्हा त्या घडणार नाहीत म्हणून प्रयत्न करा.


निष्कर्ष

स्पर्धेच्या काळात या गोष्टी घडणारच आहेत. हे तुम्ही समजून चला. आणि आधीच या बद्दल विचार विनियम करुन सोलुशन काढून ठेवा. त्यामुळे यंदा कदाचित तुम्ही अडचणीत सापडला, तर तुमच्याकडे लगेच पर्याय उपलब्ध राहतील.




Read More:

 धावपळीच्या या आयुष्यात नैराश्याविषयी विचार करणे आवश्यक आहे

युनिसेफच्या रिपोर्ट नुसार जगात प्रत्येक चौथे मुल कुपोषित आहे.

गृहिणी म्हणजे मोलकरीण नव्हे : सामाजिक गैरसमज बदलण्याची गरज

सुंदर आयुष्य कसं जगायचं? सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!