पावसाळा हा सगळ्यांचा आवडता ऋतू आहे. परंतु याच ऋतूत शरीराची अधिक काळजी घ्यावी लगाते. कारण या काळात जीव-जंतूंची वाढ जोमाने होत असते. त्यामुळे संक्रमण होण्याची संभावना अधिक असते.
म्हणून या काळात आपल्या जीवनशैलीत हेल्दी बदल करणे आवश्यक असते. अन्यथा सर्दी, ताप ई. आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. पावसात मुख्यत: डोळ्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण जेव्हा आपण भिजतो, तेव्हा पावसाचे पाणी डोळ्यात जाते. ज्यामुळे डोळ्यात घाण जाते आणि पुढे इन्स्पेक्शन होऊन आजाराला सामोरे जावे लगाते. पावसाळ्यात अधिक संक्रमण होत असते. या संक्रमानापासून वाचण्यासाठी आपली विशेष काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशा प्रकारे घ्यायची असते, ते या ब्लॉग मधून आपण समजून घेऊया.
पावसाळ्यात डोळ्यांची कालजी घेण्याच्या टिप्स
💣 या काळात डोळ्यांना वारंवार हात लावू नये. डोळे चोळल्यामुळे डोळ्यात घाण जाते. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो.
💣डोळा लाल झाला किंवा डोळ्यात कोणत्याही प्रकारची खाज होत असेल तर, खाज हाताने चोळत बसू नका. त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करा.
💣डोळ्यांची आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी. यासाठी सकाळ-संध्याकाळ डोळे थंड पाण्याने धुवावेत. जेणे करुन डोळ्यात घाण साचणार नाही.
💣डोळे आपला महत्वाचा अवयव आहे. शरीरात डोळे दिवसभर काम करत असतात. जेणेकरून त्यांना पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे.
💣कॉम्पुटर, मोबाईल ई. वरती काम करताना तासाभराने ब्रेक घेत चला. जास्त वेळ काम करत असाल तर डोळ्यांना थंड पाणी मारा.
💣 बाहेर धुळीच्या ठिकाणी जात असाल किंवा गाडीवरून प्रवास करत असाल तर चष्म्याचा वापर करा.
💣कॉस्मेटिक क्रीमचा वापर करण्यापूर्वी त्या क्रीमची क्वालिटी चेक अवश्य करा. लो क्वालिटीच्या क्रीमपासून चेहऱ्याबरोबर डोळ्यांनाही इन्स्पेक्शन होते.
पावसाळ्यात शरीराची काळजी घेण्याचे हे प्रभावी उपाय आहेत. बरोबर हे बिना खर्चिक आहेत.
Read More: