शरीरावर परिणाम करणारा अपचनाचा त्रास व उपाय

SD &  Admin
0

अपचन होणे हा काही मोठा आजार नाही. वेळीच योग्य ती काळजी घेतली की ही समस्या निघून जाते. परंतु ही समस्या उद्भवली की शरीरा बरोबर मनाची ही अवस्था बिकट होते . दिवस अतिशय वाईट निघून जातो.

अपचन होते तेव्हा पोट फुगणे, छाती मध्ये किंचित वेदना होणे ई. समस्यांना सामोरे जावे लागते. बाहेरून पहिले  तर ही समस्या छोटी आहे. परंतु ही समस्या माणसाची झोप उडवून टाकते. आणि याचा प्रत्येय अधिकांश लोकांना आलाच असेल.

आपण जाणून घेऊया कि ही समस्या का निर्माण होते?

अपचन : ही समस्या आम्लाच्या आधिक्यामुळे निर्माण होते. अधिक आम्ल स्त्रावामुळे पित्ताशयातील काही भाग उत्तेजित होऊन पोटात हळू हळू वेदना निर्माण होतात.

लक्षण काय असतात :

पोट फुगणे, पोटामध्ये किंचित वेदना, सतत गॅस बाहेर पडणे


शरीरावर परिणाम करणारा अपचनाचा त्रास व उपाय

अपचनावर घरगुती फायदेशीर उपाय


अपचनाचा किंवा आम्लाचा त्रास घालावाण्यासाठी खालील प्रमाणे उपाय घरी करुन बघा.

💧धुम्रपान करू नका.

💧 घट्ट कपडे घालू नका.

💧अधिक मसालेदार व तेलकट आहाराचे सेवन करू नका.

💧गरजेप्रमाणे वजन कमी करा.

💧कमी पण थोड्या थोड्या वेळाने खात रहा. ( आवश्यकता असेल तर)

💧खाली वाकताना गुडघ्यावर भार देवून बाकीचे शरीर ताठ ठेवा.

💧तणावाला दूर ठेवा.

💧रात्री  झोप आणि जेवणामध्ये कमीत कमी दोन तासा पेक्षा अधिक अंतर असावे.

💧जेवताना घाई करू नका. छोटा घास घ्या आणि मुख्य घास खूप वेळा चावत रहा. हा प्रयोग अधिक कारगार आहे.

💧 अपचनाला कारण असणारे अन्न पदार्थ म्हणजे कांदा, कोबी चहा, कॉफी, दारू ई. गोष्टींचे सेवन करू नका.


वरील उपाय हे घरगुती पद्धतीने घरात करुन पहा. नक्कीच हे उपाय फायदेशीर आहेत. कृपया आपली लाइफ स्टाईल बदला. योग्य आहार, जीवन शैली आणि शिस्त बद्धता ही अपचनावर योग्य उपाय आहे.   




Read More

सावधान शीतपेये पिण्याआधी त्यातील घातक गुणधर्माची ओळख करून घ्या.
साठीनंतरचे नवे आयुष्य आनंदात कसे जगावे?

थंडीच्या दिवसात व्यायाम केल्याने आजारांपासून कसं दूर राहता येते?

न्यूजपेपरवर तेलयुक्त खाद्यपदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक असते : कसे ते जाणून घ्या?



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!