किचन हेल्पफुल टिप्स | जीवनात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी

SD &  Admin
0

किचन हेल्पफुल टिप्स  & जीवनात उपयोगी पडणाऱ्या टिप्स : काही साधारण गोष्टी आपल्याला खूप काही देऊन जातात. परंतु आपल्याला त्यांचे मूल्य समजत नाही. 

तसेच व्याहारिक जीवनात अशा अनेक गोष्टी असतात, त्यांना आपण इग्नोर करतो. परंतु त्या आपल्यासाठी खूप फायद्याच्या असतात. जसे किचनमध्ये छोट्या छोट्या क्लुप्त्या असतात, त्या आपल्याला माहित नसतात. परंतु आपण ज्यावेळी त्यांना उपयोगात आणतो, तेव्हा त्यांचा उपयोग लक्षात येतो.

या ब्लॉगमधून आपण किचन टिप्स तसेच व्यावहारिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या मूल्यवान गोष्टी जाणून घेणार आहोत. तुम्हाला नक्कीच त्या फायद्याच्या ठरतील.

किचन हेल्पफुल टिप्स | जीवनात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी

सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठीमध्ये  


१ . 
कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा.

२. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळ आणि भाज्या चिरताना सुरीची धार कमी होत नाही.

३. कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा.

४. गोड पदार्थामध्ये बदाम सोलून टाकायचे असेल तर, प्रथम बदामाला पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे बदाम सोलणे सोपे जाईल.

५. बटाटे आणि वांगी हे पदार्थ चिरल्यानंतर त्यांचा रंग बदलू नये म्हणून त्यांच्या फोडी लगेच पाण्यात टाका.

६. सपरचंद कापल्यानंतर त्याचा लगेच रंग बदलतो, म्हणून कापताना  सपरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्तवेळ फ्रेश राहील.

७. कांद्याची पात डोक्यावर किंवा कानावर ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही.

८. फाज्या किंवा फळे कापण्याआधी किंवा सोलण्याआधी स्वच्छ पाण्याने त्यांना धुऊन घ्या. आणि त्यानंतर त्यांना कोरड्या कापडाने पुसून घ्या.

९. भाज्या आणि फळे जास्त बारीक कापू नका. बारीक भाज्या दिसायला छान वाटल्यातरी, त्यातील पोषक घटक कमी होतात, हे विसरू नये.

१०. भात मोकळा होण्यासाठी त्यामध्ये प्रमाणात लिंबाचा रस टाका. भात मोकळा होईल.

११. भात शिजवायचा असेल तर, एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा.

१२. कडधान्याची भाजी करायची असेल तर, आधीच्या रात्री कडधान्य भिजत ठेवा.

१३. डाळ चागंली होण्यासाठी २ ते ३ तास आधी डाळ भिजत ठेवा.

१४. शेंगदाणे लवकर सोलायचे असतील तर हे करा, भाजताना थोड दाण्यांना पाण्याने भिजलेला हात लावा.

१५. भेंडीच्या भाजीत एक चमच दही मिक्स केल्यास भाजी चिकट होत नाही.

१६. कणिक मळताना चिमुटभर साखर टाकल्यास, पुऱ्या चिवट होत नाहीत.

१७. थंडीच्या दिवसात दही लावायचे असेल तर, ते मातीच्या भांड्यात लावा आणि ते गॅसजवळ ठेवा.

१८. मसाला जास्त वेळ टिकण्यासाठी किंवा खराब होऊ नये म्हणून त्यात हिंगाचे खडे टाका.

१९. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही वेळ पाण्यात भिजवत ठेवा.

२०. बटाटे लवकर उकड्ण्यासाठी २० ते २५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.

२१. स्वयंपाक करताना कधीही ओल्या भाजीत पाणी गरम टाकावे. यासाठी भाजी करताना नेहमी सुरुवातीलाच पाणी गरम करुन ठेवावे.

२२. पीठ मळताना त्यात गरम कोमट तेलाने मळून घेतल्यास पदार्थ चांगले खुशखुशीत होतात.

२३. दह्यामध्ये कोणतेही पदार्थ मिक्स करणार असाल तर, ते प्रथम नीट घुसळून घ्या.

२४. टोमॅटो चिरल्यानंतर देठ आणि आतील बिया बाजूला करा.

२५. तेलाची फोडणी करताना जिरे आणि राई तेल गरम झाल्यानंतरच टाका.

२६. वाटणासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नये.

२७. तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नये.

२८. पुरी चागली होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडं तांदळाच पीठ मिक्स करा.

२९. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात कॉर्नफ्लोअर मिक्स करा.

३०. तळणाचे तेल लवकर जळू नये म्हणून त्यात थोडं मीठ टाका.

३१. किचनच्या मध्यभागी शेगडी कधीच ठेऊ नये.

३२. रात्री झोपण्यापूर्वी किचनघर स्वच्छ करावे. भांडी स्वच्छ असावी, त्यानंतर तिथे दिवा लावने शुभ मानले जाते.

३३. स्वयंपाक घराला काळा रंग कधीच देऊ नये.

३४. बेडरूमच्या वर अथवा खाली स्वयंपाक घर असू नये.

३५. किचनमध्ये वाईट वास येऊ नये म्हणून किचनची लादी फुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका.

३६. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रो फायबर कपड्याचा वापर करा. ज्यामुळे फ्रीजला चरे पडणार नाहीत.

३७. फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये म्हणून फ्रीजमध्ये एक कोळशाचा तुकडा ठेवा.

३८. मिरची जास्त वेळ टिकण्यासाठी ती फ्रीज मध्ये ठेवण्याआधी तिचे देठ काढून टाका.

३९. साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या लागत नाहीत.

काही किचनमधील महत्वाचे प्रश्न जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे 


१) पदार्थ शिजवल्यानंतर त्यातील पोषक घटक कमी होतात का?

मला वाटत हा प्रश्न अधिकांश लोकांचा असणार आहे. पदार्थ अति प्रमाणात शिजवले तर त्यातून पोषक घटक नक्कीच कमी होतात. म्हणून जर तुम्ही फळभाज्या शिजवत असाल तर, त्यामध्ये काही नैसर्गिक गुण नक्कीच ठेवा. ते तुमच्या शरीराला हेल्दी असतात.

परंतु तुम्ही मांस पदार्थ शिजवत असाल तर ते नक्कीच पूर्णतः शिजवा. अन्यथा त्यातील जीव-जंतू तुमच्या शरीरात जाण्याची शक्यता अधिक असते.

२) किचन कसे असावे? 

किचनमधील सर्वात महत्वाचा नियम, किचन हमेशा स्वच्छ आणि नीटनिटके असावे. जेणेकरून जंतूंचा प्रर्दुर्भाव होणार नाही. याची घरातील प्रत्येक मेबर ने काळजी घेतली पाहिजे 

  

  
Read More:

घरातील फर्निचरची काळजी कशी घ्यावी?

निरोगी घरासाठी हेल्पफुल टिप्स : बेस्ट किचन ड्रेनेज क्लीन टिप्स

किचन टिप्स : रोजच्या वापरातील महत्वाच्या किचन टिप्स

 


  

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!