किचन टिप्स : रोजच्या वापरातील महत्वाच्या किचन टिप्स

SD &  Admin
0

किचन ही घरातील महत्वाची जागा. अनेक पंचपकवान याच जागेतून डायनिंग टेबलवर सजवले जातात. जिभेला येणारी मिठास याच किचनमधे खूप काळजीपूर्वक बनत असते.

गृहिणींच हे लाडकं  ठिकाण सगळ्यांच्याच आवडीचे असते. येथे बनणारा पदार्थ घरातील माणस आवडीने स्वाद घेत असतात. आणि म्हणून येथे होणाऱ्या प्रत्येक पदार्थाला काळजीपूर्वक बनवले गेले पाहिजे.

पदार्थ चांगले बनण्यासाठी आणि ते टिकण्यासाठी गृहिणी अनेक गोष्टी करत असतात. कधी त्या फसतात, तर कधी जमल्या जातात. म्हणून खास किचन टिप्स गृहिणीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. या किचन टिप्स नक्कीच फॉलो करा. तुमच्या किचनच्या अनेक चुका चुटकीमध्ये सुटल्या जातील.

किचन टिप्स : रोजच्या वापरातील महत्वाच्या किचन टिप्स

रोजच्या वापरातील महत्त्वाच्या टीप्स


💧
दह्यामध्ये मीठ किंवा मसाले मिक्स करणार असाल तर ते निट आधी घुसळून घ्या.

💧गोड पदार्थामध्ये दुधाचं वापर करणार असाल तर, फुल क्रीम दुध वापरा, त्यामुळे त्याला टेक्चर छान येईल.

💧पीठ मळताना त्यात गरम तेल टाकल तर त्या पासून बनवलेले पदार्थ खुशखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी साठी हे करुन पहा.

💧गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, त्यामुळे ते करपणार नाहीत.

💧कडधान्य रात्री भिजत घालण्यास विसरला असेल तर, तुम्हाला अर्जंट डाल भिजवून पाहिजे असेल तर गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा.

💧भात मोकळा सूट सुटीत होण्यासाठी भात शिजत असताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका.

💧एखाद्या पदार्थामध्ये खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर, ती आधी पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.

💧नुडल्स सुटसुटीत होण्यासाठी शिजताना त्यात थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून मिसळून थंड पाण्याखाली धरा.  

💧 नेहमी तुरीच्या डाळीच्या आमटीत पालक चिरून टाकल तर आमटीला चांगली चव येते.

💧 गरमागरम इडली, इडली पात्रातून काढण्याआधी थोडंस त्यावर थंड पाणी टाकलं तर इडल्या पटापट निघतात.

💧जीरा राईस, भात ई स्टीलच्या कुकरमध्ये करत असाल तर, तांदळाच्या दिड पट पाणी घ्यावे आणि दोन शिट्या कराव्यात. भात मोकळा आणि सुटसुटीत होतो. 

💧कुकरमध्येमध्ये भात शिजवत असताना कधी कधी भात ऊतू जातो. तो जाऊ नये म्हणून कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडंस मीठ घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही.  

💧 सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्न नेहमी झाकून ठेवले पाहिजे. जेणे करुन त्यावरती माश्या, मुंग्या प्रवेश करणार नाही. कधी कधी गृहिणी कामाच्या गडबडीत अन्न झाकायचे विसरून जाते. त्यामुळे अन्नावर अनेक जीव-जंतू बसले जातात. आणि मग ते अन्न खाण्यालायक राहत नाही. 


गृहिणींनी या किचन टिप्स नक्कीच करुन बघा. सध्या सोप्या या किचन टिप्स तुम्हाला फायद्याच्या ठरतील.




Read More

निरोगी घरासाठी हेल्पफुल टिप्स : बेस्ट किचन ड्रेनेज क्लीन टिप्स

घरातील फर्निचरची काळजी कशी घ्यावी?




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!