रक्ताची पातळी वाढवणारे उपाय

SD &  Admin
0
रक्ताचं मूल्य काय असते, याबद्दल कोणालाही काही सांगण्याची गरज नाही. जर असं म्हटलं तरी चालेल, रक्ताशिवाय जीवनच संभव नाही. 

म्हणून शरीरात जेवढे रक्त शुद्ध आणि प्रमाणात ते शरीर निरोगी मानले जाते. या साठी आपल्याला हेल्दी आहार करणे आवश्यक आहे. परंतु कधी कधी रक्ताची पातळी योग्य आहार न मिळाल्यामुळे शरीरात कमी होते. जेणे करून शरीराचे काम असंतुलित होते. आणि मग चक्कर येणे वैगरे प्रमाण अधिक वाढले जाते. 

या वर उपाय म्हणून योग्य तो आहार घेणे आवश्यक आहे. या आहाराबद्दल आपण या ब्लॉग मधून जाणून घेऊया.

रक्ताची पातळी वाढवणारे उपाय

रक्ताच्या कमतरता दूर करणारे उपाय  


💧
जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमच्या शरीरात रक्ताची पातळी कमी होत चालली आहे. याचा भास बरोबर तुम्हाला समजू लागतो. त्या वेळी आहारात तुम्हाला लगेच बदल करायचे आहेत. ज्यामध्येजीवनसत्व खूप प्रमाणात असतील. दुग्धजन्या पदार्थांमध्ये हे जीवनसाथ अधिक प्रमाणात आढळते.

💧मधामध्ये लोह, तांबे, आणि मॅगनीज असल्यामुळे हे शरीरात हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यास मदत करते.  

💧पालकमध्ये लोह खूप प्रमाणात मिळते. यामुळे शरीरात  हिमोग्लोबीन आणि लाल रक्त पेशींची नवीन निर्मिती होण्यास मदत होते.

💧बदामामध्ये तांबे, लोह आणि जीवनसत्व एकत्र येऊन हिमोग्लोबीनची निर्मिती करते. म्हणून ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झालेली असते, त्यांनी दररोज दोन तास पाण्यामध्ये सात बदाम भिजवून, त्यानंतर त्याची पेस्ट करुन सेवन करावे.

💧रक्ताची पातळी वाढवण्यासाठी बीट मदत करते. याचा तुम्ही रस करुन पिणे फायदेशीर ठरते. बीटमध्ये  पोटॅशियम, फॉस्परस,कॅल्शियम, सल्फर, आयोडीन, लोह, कॉपर, प्रथिने, कर्बोदक, फॅट, जीवनसत्व ब १, ब २ आणि ब ६ नियासिन सारखे पोषक घटक आढळतात.  बीटमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे लाल रक्तामध्ये वाढ होते.

💧मेथीची पानं शिजवून खाल्याने रक्तात वाढ होते. याचे सेवन ज्या स्त्रियांनी करायचे असते, ज्यांची मासिक पाली सुरु झाल्यानंतर रक्ताची कमतरता भासते,

वरील सर्व उपाय हे होममेड असल्यामुळे, याचा झाला तर फायदाच होईल. म्हणून आहारात या पदार्थांचा अवश्य समावेश करा.




Read More :

 

  

 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!