शेपटा मराठी कविता | जग्गनाथ रत्नपारखी यांची कविता

SD &  Admin
0

सारांश : शेपटा ही कविता एडवोकेट जग्गनाथ रत्नपारखी यांनी लिहिली आहे. ही कविता प्रेमावरती लिहिली असली तरी, भावार्थ खूप नाटकी आणि मनोरंजनीय भाषेत तुम्हा-आम्हाला दर्शन घडवत आहे. 

कविता खूप सोप्या पद्धतीने लिहिली आहे. वाचतानाच लगेच भावार्थ समजतो. कवी म्हणतो कि SSC च्या परीक्षेला बसलो होतो. त्यांच्या मनात परीक्षे विषयी खूप उत्सुकता होती. वाटलं होतं त्यांना या परीक्षेत चांगला पेपर लिहून प्रथम नंबर मिळवीन. परंतु जे होणार होते तेच झाले. त्यांच्या पुढच्या बँचवर शुभदा जोशी नावाची मुलगी बसली होती. आणि त्या मुलीची वेणी लांब असल्यामुळे पाठीमागे त्या मुलाच्या हाताला स्पर्श करत होती.

येथे कवीने वेणीला शेपटाची उपमा दिली आहे. आणि या शेपटाच्या स्पर्शाने त्यांना काहीच सुचत नव्हते. त्यांना पेपर लिहायचे भान देखील राहिले नाही. शेवटी पेपरची वेळ संपते तेव्हा ते भानावर येतात. परंतु आता मात्र वेळ संपली होती. कवी शेवटी नाटकी भाषेत म्हणतो की या शेपटाने अलगद माझी मान कापली आणि आता फक्त गावातच गुरे आणि शेतावर काम करण्याची पाली येणार.

मित्रांनो कविता खूप मजेदार आहे. नाटकी प्रेमाने भरलेली आहे. आणि त्यात कवितेच गाव हे ग्रामीण भागातलं असल्यामुळे असे प्रसंग हे कायमच येत असतात.

या कवितेचे सर्व श्रेय आणि क्रेडीट हे एडवोकेट जग्गनाथ रत्नपारखी यांना देत आहे. त्यांची ही कविता सगळ्यांपर्यंत पोहोचणे हाच या ब्लॉगचा उद्देश आहे.

शेपटा मराठी कविता | जग्गनाथ रत्नपारखी यांची कविता

जग्गनाथ रत्नपारखी यांची कविता | Poem by Jagannath Ratnaparkhi


S.S.C.स मी बसलो होतो प्रथम परीक्षेस,

एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश.. उपदेश

पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा,

अन माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा.

मानेला ती देऊनी हिसडा नकळत सवयीने,

लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने.

मऊ रेशमी मोहक काळा, शेपट्याचा भार

तिचा तत्क्षणी येउनी पडला माझ्या बाकावर,

तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात

एक ही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात

शेवटची ती घंटा होता, आलो भानावरं 

कळले आता जगणे आम्हा गावी खेडयावरं.

केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा,

पिळीत शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा 

शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका,

शिक्षणास आज मी पारखा, शुभदा प्राध्यापिका !!

कवी:  एडवोकेट जग्गनाथ रत्नपारखी




Also Read More Poem

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!