आजच्या काळात कोणावरही विशास ठेवणे एवढं सोपं राहिलेलं नाही आहे. कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. म्हणून जेवढं होईत तितकं इतरांशी मर्यादित राहणे कधीही चांगलं. आज तुम्ही एखाद्याशी खाजगी गोष्टी शेअर केल्या, त्या गोष्टी त्या व्यक्तीपुरत्या मर्यादित राहतील हे तुम्ही विश्वासाने कधीच सांगू शकणार नाही.
म्हणून कुणी कितीही तुमच्या जवळचा व्यक्ती असली तरी, काही अशा गोष्टी असतात त्या त्यांच्याशी कधीच शेअर करू नका. त्या तुम्ही तुमच्यापाशीच सुरक्षित ठेवा. तुम्हाला कितीही वाटलं कि कुणाशी तरी आपल मन व्यक्त करावं. तरीही स्वतःवर कंट्रोल ठेवून कुणाशीही कोणत्याही गोष्टी शेअर करू नका. अन्यथा भविष्यात तुम्हाला वाईट परिणाम दिसू शकतात.
आपण या ब्लॉग मधून जाणून घेऊया कि त्या कोणत्या गोष्टी आहेत, त्या कधीच कुणाशी शेअर करू नये. त्या तुम्ही स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवल्या पाहिजेत.
कोणत्या गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवल्या पाहिजेत ?
💣 तुमचे खाजगी नाते :
तुमच्या आयुष्यात एखादं खाजगी नातं असेल, आणि ते नातं सगळ्यांच्या पुढे आल्याने वाद -विवाद होऊ शकतात, अशा नात्याबद्दल कधीही कुणाशी बोलू नका. जर तुम्ही अस करत असाल तर, भविष्यात त्या व्यक्तीकडून तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता अधिक असू शकते.
💣कौटुंबिक समस्या :
तुमच्या कुटुंबातील समस्या कुटुंबाच्या बाहेर कधीच बोलू नका. तुम्ही जेव्हा तुमच्या समस्या बाहेर सांगता, तेव्हा लोकं फक्त फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या पुढ्यात तुम्हाला ते सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतील, परंतु पाठीमागे तुमची उनीधुनीचं काढत बसतील. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील समस्या कमी होण्या ऐवजी वाढतच जातील.
💣 मदत आणि दानधर्म :
दुसऱ्याला केलेली मदत आणि दानधर्म कधीच इतरांशी आपल्या कौतुकाचा पाढा वाचू नये. तुम्ही केलेलं दान हे नक्कीच कौतुकास्पद आहे, परंतु त्याचा गाजावाजा करुन काहीही उपयोग नाही. उलट लोकं पाठीमागे नावच ठेवत बसतील. आणि तुम्ही केलेल्या या दानाचं फळ कधीच तुम्हाला मिळणार नाही.
💣 दुसऱ्यांची गुपिते :
एखाद्याने तुमच्याशी सिक्रेट गोष्टी शेअर केल्या असतील, तर त्या इतरांकडे कुठेही बोलू नका. कारण एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्याशी विश्वासाने स्वतःच्या गोष्टी शेअर करत असते, तेव्हा ती तुमच्यावर विश्वास ठेवत असते. आणि म्हणून त्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याचे काम हे आपले असते.
💣 तुमची गुपिते :
स्वतःची सिक्रेट कधीही कुणाशी शेअर करत जाऊ नका. आणि ज्या गोष्टी संवेदशील असतील, त्या तर कधीच शेअर करत जाऊ नका. याचे कारण असे की कुणास ठावूक भविष्यात त्या व्यक्तीचा स्वभाव बदलला किंवा तुमच्याशी संबध बिघडले तर, ती व्यक्ती तुमच्या सिक्रेटचा गैर फायदा घेऊ शकते.
💣 आर्थिक उलाढाल :
तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील येणाऱ्या संपत्तीची माहिती इतर कुणालाही सांगू नका. कधी संकट तुमच्याकडे धावून येईल हे कधीही सांगता येणार नाही. आज सगळीकडे माणस कमी दृष्ट लोकं इकडे तिकडे फिरत असतात.
💣 तुमची स्वप्ने, प्लान :
तुम्ही तुमच्या स्वप्नाचे नियोजन आखले असेल तर, त्या गोष्टी इतरांना सांगू नका. आज कुणालाही दुसऱ्याचे चांगले झालेले बघवत नाही. आणि दुसऱ्याचे चांगले होऊ नये म्हणून या व्यक्ती तुमच्या समोर संकट निर्माण करायला मागे पुढे बघत नाही.
काही व्यक्ती तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेते. परंतु त्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला पाठींबा द्यायचे सोडून, डीमोटीवेटेड करायला लागते. तुम्हाला तुमची स्वप्ने कशी फायद्याची नाहीत याबद्दल तुम्हाला कारणे देत बसते आणि तुमचे मन डायवर्ट करण्यास प्रवृत्त करायला लागते.
निष्कर्ष :
मित्रानों वरील सर्व गोष्टी कधीही कुणाशी शेअर करू नका. तुम्ही जरी निश्वार्थ मनाने दुसऱ्यांना सांगत असला तरी, पुढला व्यक्ती तुमच्या सारखा नसतो. म्हणून जेवढं होईल तितके आपल्या खाजगी गोष्टी स्वतः जवळच सुरक्षित ठेवा, यामुळे तुमच्या भविष्यातील अनेक संकट कमी होतील.
Read More :
धावपळीच्या या आयुष्यात नैराश्याविषयी विचार करणे आवश्यक आहे
नोकरी गेल्यावर परिस्थितीला कसे सामोरे जाल ?
युनिसेफच्या रिपोर्ट नुसार जगात प्रत्येक चौथे मुल कुपोषित आहे.