थकव्याला दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत ?

SD &  Admin
0

अधिक काम केल्यामुळे थकवा येणे काही नवीन नाही. परंतु थोड्याश्या कामाने देखील सतत थकवा जाणवत असेल तर  समजून जा कि तुमच्या  शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे.

आजकाल धावपळीच्या काळात अधिकांश लोक स्वतःच्या शरीराच्या तबेत्त्तीकडे लक्ष देत नाही. परिणाम शरीर साथ देण्यास नकार देत राहते. काही दिवस शरीर साथ देते. परंतु हळू हळू शरीर कमजोर होत जाते. थोड्याशा कामाने देखील शरीराला थकवा जाणवतो. 

याचे प्रमुख कारण बदलती जीवनशैली, वेळेवर जेवण न करणे, व्यायामाचा आभाव, अधिक तेलकट पदार्थ खाणे, हेल्दी पदार्थांपासून वंचित, दारू, शिगारेटचे  यांचे तुमच्या जीवनात अधिक प्रमाण.

मित्रानो या ब्लॉगमधून आम्ही थकव्याला दूर ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर करत आहोत. या टिप्सचा तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत सामील करायच्या आहेत.

थकव्याला दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत ?

थकव्याला दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत ?        


💣
दिवसाची सुरवात तुम्हाला फायबर्सयुक्त पदार्थाने करायची आहे. थकवा दूर करण्यास हे पदार्थ आपल्याला मदत करतात. या पदार्थामध्ये ब्रेड खात असाल तर तो ब्राऊन ब्रेड असावा. त्याचबरोबर ब्राऊन राईस ही फायबरचा स्त्रोत आहे.

💣आंघोळीसाठी गरम आणि गार दोन्ही पाणी वापरा. याचा उपयोग असा होतो कि गरम पाणी पेशींना आराम देते. आणि थंड पाणी त्यांना पुन्हा पूर्ववत होण्यास मदत करते. म्हणून आधी गरम पाण्याने आंघोळीला सुरवात करा आणि शेवटी थंड पाण्याचा उपयोग करा. 

💣 दिवस भरात कमीत कमी तीन लिटर पाणी अवश्य घ्या. याची प्रोसेस अशी असते. पाणी शरीरात असणाऱ्या विषारी घटकांना बाहेर फेकून उर्जा देते.

💣 तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे कि, ताठ उभे राहिल्याने फुप्फुसांना अधिक प्रमाणात ऑकिसजन मिळतो. म्हणून कधीही बॉडी पोश्चर ताठ असावा. 

💣कोणत्याही कामात नियोजन असणे आवश्यक आहे. अन्यथा ते काम अधिक कठीण वाटते. आणि ते करताना अधिक आलस आणि पटकन ताण येतो. 

💣 झोपेला कंट्रोल करू नका. एखाद्या वेळी झोप येत असेल तर, थोडीसी डुलकी घ्यायला काही हरकत नाही.

💣 रोज सकाळी ध्यान आणि प्राणायाम आवश्यक करा. मी तर म्हणतो या गोष्टी आपल्या आयुष्याचा भागच बनवा.

💣 एखादं काम करताना थकवा जाणवत असेल तर, अशा वेळी संगीत ऐकू शकता. असे केल्याने मनातील त्राण आणि थकवा कमी होईल.

💣 तुम्ही कॉम्पुटर, मोबाईल उपकरणे अधिक वापरत असाल तर, त्याचा वापर मर्यादित करा. एका तासानंतर थोडा वेळ ब्रेक जरूर घ्या.

💣 चहा, कॉफी, अल्कोहोल यांचे सेवन मर्यादित करा. यांच्या अधिक सेवनाने झोपेवर परिणाम होतो.

💣 तुमच्या राहत्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी वातावरण सामान्य असावे. अधिक गरम आणि अधिक थंड तापमानात राहणे टाळावे. रोज अशा प्रकारच्या तापमानात राहिल्याने थकवा अधिक येतो.

💣 शरीराला ताकद मिळण्यासाठी मॅग्नेशियमयुक्त आहाराची आवश्यकता असते. म्हणून आहारात असे पदार्थ सामील करा. जसे हिरव्या भाज्या, धान्य  ई.

💣 भरभर चाला. यामुळे स्नायुंना ऑक्सिजन अधिक मिळेल. 

💣 ध्यानात ठेवा, गरजेपेक्षा अधिक साखर, लाल मांस खाल्याने शरीरातील उर्जा कमी होते. फिट राहण्यासाठी क्षार युक्त पदार्थ खालले पाहिजेत. म्हणजे भाज्या, फळे, डाळी  ई .

💣रक्त पुरवठा सुरळीत होण्यासाठी आंघोळीच्या वेळीस शरीराला गोलाकार स्क्रब लावा. याची सुरवात न चुकता खालून करा.

💣वेळेवर जेवण करा. संध्याकाळी जेवण लवकर करा. कधीही रात्री झोपण्याआधी तीन तास जेवण करणे  आवश्यक आहे.


मित्रानो या काही महत्वाच्या सवयी आणि आहार आहे. जर तुम्ही चांगल्या सवयी, योग्य आहार, व्यायाम वेळेवर न चुकता करत असाल तर तुम्ही सतत निरोगी राहाल. थकवा, मनावरचा त्राण होणार नाही. .




Read More

त्वचेला होणारी खाज कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा

जॅकलिन फर्नांडिसच्या सिक्रेट फिटनेस टिप्स : ज्या तुम्हाला निरोगी आणि स्मार्ट बनवू शकतात

स्टोन थेरपी काय आहे ? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ?

शरीरात पाणी टिकून राहिल्याने कोणत्या समस्या उद्भवतात : Water Retention Bad for Body





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!