चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करुन बघा

SD &  Admin
0

आजच्या धावपळीच्या काळात शरीर योग्य ते साथ देण्यास नकार देते. या साठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. या शारीरिक व्याधीमध्ये झोप न येणे ही जवळ जवळ बऱ्यापैकी लोकांची समस्या आहे. आपल्या या समस्या घेऊन कित्येक लोक डॉक्टरांकडे धाव घेत असतात. तरीही ही समस्या पूर्णत: बरी होईल हे मात्र सांगता येत नाही 

झोप न लागणे या समस्येवर अनेक उपाय आहेत, परंतु ते ठराविक कालावधीसाठी कारगर ठरतात. परंतु काही टिप्स / उपाय आपण घरगुती स्टेजवर केले तर शरीराला आराम मिळण्यास मदत होते. जाणून घेऊया आपण त्या कोणत्या गोष्टी आहेत.

चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करुन बघा

चांगली झोप येत नाही का? हे घरगुती उपाय करून बघा


मित्रानों झोपेसाठी मन आणि डोकं शांत असणे खूप आवश्यक आहे. सतत मेंदू विचार करत राहिला तर तुम्ही कधीच एका ठिकाणी शांत राहणार नाही. परिणामी तुम्हाला झोप लागणे कठीण होईल. यातून बाहेर पडण्यासाठी राग, भीती, काळजी करने, बदला घेण्याची भावना ई. पासून दूर राहिले पाहिजे.

रात्री उपाशी झोपू नका. पोट न भरल्याने तुम्हाला झोप येणार नाही. याचा अर्थ असा नाही की प्रमाणाच्या वरती खा. पोटात २० ते ३० टक्के जागा रिकामी कधीही असावी.

चांगली झोप येण्यासाठी झोपण्याआधी तीन ते चार तास आधी जेवण करा. रात्री शक्यतो हलका फुलका आहार घेणे कधीही योग्य.

चहा, कॉफीपासून दूर राहणे कधीही चांगले. या मध्ये असणारे कॅफिन झोपेवर वाईट परिणाम करते.  

तुमचा डेली रुटीन हा योग्य असावा. म्हणजेच सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे. म्हणजेच तुम्हाला सुर्योदयापूर्वी उठायचे आहे आणि संध्याकाळी ९:३० से १० च्या दरम्यान तुम्हाला झोपणे आवश्यक आहे. 

बेडरूम तुमचा स्वच्छ असावा. बेडरूम मध्ये तीव्र प्रकाश नसावा. ज्यामुळे तुम्हाला झोप लागणार नाही.

झोपण्यापूर्वी तुमची बॉडी स्वच्छ असावी. म्हणजेच घाम किंवा शरीर चिकट झालेले नसावे. घामामुळे रात्री झोप लागत नाही.

झोपण्यापूर्वी स्मूथ मालिश करा. मंद आवाजात संगीत नक्कीच ऐका. या मुळे  मन आणि शरीराला आराम मिळेल. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.


मित्रानो वरील टिप्स सगळ्यांना करण्यायोग्य आहेत. या  करण्यासाठी कोणालाही पैसे वगैरे खर्च करण्याची गरज नाही. फक्त शिस्तबद्ध पद्धतीने योग्य त्या सवयी दररोज फॉलो केल्या की सगळ काही ठीक होतं. या सवयी तुम्हाला नुसत्या झोपे पासून आराम देत नाही तर, त्याचबरोबर तुमचे आरोग्य देखील चांगले राहील.



Read More :

डोळे धुण्याची प्रभावी पद्धत

दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी मदत करते

मधाचे बहुमुल्य गुणकारी फायदे

मनाला चांगलं फील करण्याचे पाच मिनिटाचे मेडीटेशन तंत्र


 

  

   

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!