रिटायरमेंट प्लानिंग म्हणजेच निवृत्तीनंतर काय करायचे? असा प्रश्न सर्वच उतार वयातील लोकांना येतो. आणि असा प्रश्न मनात येणे ही स्वाभाविक आहे. कारण उतार वय हे मनात सर्व इच्छा असूनही ते स्वतःच्या स्वबळावर त्या गोष्टी न होण्यास बांधील होऊन जातो. आणि म्हणून उतार वयात जीवन सुखात जावे. कुणाकडे मागण्याची वेळ आली नाही पाहिजे, यासाठी भविष्य तरतूद आधीच केली पाहिजे.
फार भावनिक प्रश्न आहे. आजच्या पिढीला या सर्व गोष्टींचं गांभीर्य कदाचित समजलं नसावं असं वाटतं. कारण आजच्या काळातील वृद्धाश्रमांची वाढती संख्या.
या सर्व गोष्टींचा विचार करुन रिटायरमेंट प्लांनिंग विषय महत्वाचा ठरतो. आणि या विषयावरती सर्वच लोकांनी प्लानिंग करायला पाहिजे आहे, कारण उतार वयात स्वतःच जीवन सुखात घालवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या संपन्न असायला हवे आहे.
रिटायरमेंट प्लांनिंग कसे कराल?
मला वाटतं, तुमचे शिक्षण संपले कि नोकरी बरोबर इन्वेस्टप्लानकडे लक्ष दिले पाहिजे. तुमच्या पगारामधून काही भाग भविष्य तरतुदीसाठी बाजूला करत चला. नंतर करू, नंतर करू या भानगडीत पडू नका. मी खूप अशी मुलं बघितली आहेत, जी आलेला पैसा उधळत गेले. त्यांची हो उधळण अशी होती कि कधी चाळीशी उलटली ते त्यांना देखील समजल नाही. आणि आता वेल सेटल जॉब नाही आहे. कुटुंब वाढले आहे. पैसा घरालाच पुरत नाही. मग सेविंग कुठून करणार, अशी म्हणण्याची पाली येते.
यासाठी स्वतःच ५० शी नंतर आयुष्य कसं सुखकारक होईल याकडे खूप काळजी पूर्वक लक्ष दिले पाहिजे. वेळ घालवत जाणे पुढे तुम्हाला फार महागात पडू शकते. तिशी उलटली की तुम्ही शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडात थोडं थोडं पैसे इन्वेस्ट करू शकता. हा एक चांगला रिटायरमेंट इन्वेस्टमेंट प्लान आहे. यातून तुम्ही पुढील आयुष्य चांगले जगू शकता.
जर तुम्हाला शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडात इन्वेस्ट करायचे नसतील तर, गवर्नमेंट स्कीम मध्ये इन्वेस्ट करा. कमीत कमी एक LIC नक्कीच काढा. पोस्टातील स्कीममध्ये ही साधारण वर्गातील लोकं थोडे थोडे पैसे इन्वेस्ट करू शकतात. काही पैसे बँकेत इन्वेस्ट करा. रिटायरमेंटच्या वेळी पैसे येण्याचे अनेक सोर्स उपलब्ध असायला हवेत.
तुम्ही रियलइस्टेटमध्ये इन्वेस्टमेंट करू शकता. थोडं सोनं ही तुमच्या तिजोरीत असायला हवे आहे. या गोष्टींचे पैसे काळाने वाढत जातात. तुमच्या रिटायरमेंट काळात तुमच्या कामाला येतील.
मित्रानो इन्वेस्टमेंट प्लानचे सोर्स अनेक आहेत. तुम्हाला ठरवायचे आहे कि ती कुठे करायची आहे. आर्थिक इन्वेस्टमेंट बरोबर माणसे ही जोडायला शिकले पाहिजे. माणस अशी निवडा जी तुम्हाला निश्वार्थपणे साथ देतील. मायेची साथ, मायेच बोलनं या गोष्टीपण रिटायरमेंट वयात आवश्यक आहे. हेच क्षण तुम्हाला खूप आनंद देऊ शकतील.
एक सल्ला देऊ इच्छितो, काही लोकांना पटेल किंवा काहीनां नाही . पण सल्ला मात्र मोलाचा आहे. तुमच्या आयुष्याची कमाई विनाकारण मुलांवर उधळू नका. त्यांना शिक्षण द्या. पैसे कमावण्यासाठी पायावर उभे करा. मात्र तुमच्या रिटायरमेंटची कमाई मुलांच्या नावावर किंवा मनोरंजन गोष्टीवर अति खर्च करू नका. तुमच्याकडे जास्त पैसे असतील, तर तुमची मर्जी.
सर्वात महत्वाच प्लानिंग म्हणजे हेल्थ केअर. उतार वयातील हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे सर्व काही कमवून ठेवले आहे, परंतु त्याचा उपभोग घ्यायला शरीरच साथ देत नाही. मग या सर्व गोष्टी काय कामाच्या. तरुण वयापासूनच शरीर गुणवत्तेला प्राधान्य द्या. हेल्थचा भाग म्हणून एखादा मेडिक्लेम असायला काही हरकत नाही.
मित्रानों या कही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांची सुरवात आजपासूनच करायला लागा. टाईमपास या शब्दाला तुमच्या मनातून काढून टाका. वर्तमान जीवन जगायचेच आहे, परंतु भविष्य तरतुदीसाठी ही आतापासून कामाला लागायला हवे.
तुमचा अभिप्राय नक्कीच द्या.
Read More
थकव्याला दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत ?
शरीरावर परिणाम करणारा अपचनाचा त्रास व उपाय
चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करुन बघा