रिलेशन टिप्स : नाते टिकवून ठेवण्यासाठी शांत राहणे उपयुक्त

SD &  Admin
0

निर्णय घेणे ही एक अद्भुत कला आहे. ही कला ज्यांची अंगी असते, ती व्यक्ती अधिकतम यशस्वी होत असते. परंतु चुकूनही नको त्या वेळी निर्णय चुकीचा ठरला तर मात्र मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. 

त्याच प्रमाणे नात्यातही कधी कधी आपल्याला असे निर्णय घेण्याची पाळी येते, तेव्हा आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. येथे चुकीचा निर्णय घेणे. नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.

रिलेशन टिप्स :  नाते टिकवून ठेवण्यासाठी शांत राहणे उपयुक्त

रिलेशन टिकवून ठेवण्यासाठी शांत राहणे कधीही योग्य 


मित्रानो आज नाते टिकवणे खूप कठीण झालेले आहे. अगदी काचेचा ग्लास जसा नुसत्या धक्क्याने फुटतो, त्याचप्रमाणे आज नाती काचेच्या ग्लास प्रमाणे तुटत आहेत. खूप प्रयत्न करुन ही अशी नाती टिकवणे कठीण झाले आहे. अशा वेळी मन बावरून जातं. काय करावे आणि काय नाही असे होऊन जाते. कोणता निर्णय घ्यावा हे पण समजत नाही. अशा वेळी मित्रांनो गडबड गोंधळ न करता, टोकाचं पाऊन न उचलता, आधी मन आणि बुद्धीतून राग काढून, अगदी शांत राहा. कोण काय बोलत आहे, याकडे न लक्ष देता. मनाला फक्त आणि फक्त शांत करण्याचा प्रयत्न करा. 

रागाच्या भरात माणसाला राग आला की तो काय करत असतो याचे भान राहत नाही. त्या व्यक्तीचा इतका राग आलेला असतो कि तिला आताच धडा शिकवला पाहिजे असे मनाने पक्के केलेले असते. आणि तुम्हीही मनाने घेतलेला निर्णय मान्य करता आणि टोकाचे पाऊल घ्यायला तुम्ही पुढे सरसावता. आणि पुढे पाय घसरून लंगडे होता. हे या मुळे घडले, कि तुम्ही परिस्थितीला ओळखले नाही. चांगले आणि वाईट याचा विचार न करता फक्त कार्य करायला सुरुवात केली. नाती अशी टिकून राहत नाही. किंवा नात्याला असं अचानक वाऱ्यावर सोडलं जात नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी परिणाम पण ओळखले पाहिजेत. 

नात्यामध्ये शब्दांना जपून वापरणे खूप आवश्यक आहे. शब्द हे जसे नात्याला प्रेमाने जोडत असतात. तसे ते नात्याला क्षणात संपवण्याचे देखील काम करतात. म्हणून आपल्या माणसाला कोणताही शब्द बोलताना त्या शब्दाचं वजन आणि परिणाम आधीच ओळखले पाहिजे. या परिणामांपासून वाचण्यासाठी माझा एक महत्वाचा सल्ला आहे कि  तुम्ही भांडणात शांत राहा. तुमच्यामध्ये कितीही मतभेद झाले असतील, अगदी परिणाम टोकाला गेले असतील, तरीही मनाला शांत ठेवा आणि नात वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण रागात हे कळत नाही कि चुकी कोणाची आहे. 

जसं मी वरती म्हटलं आहे कि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या घटनेची पार्श्वभूमी माहित असणे आवश्यक आहे. उगाच निर्णय घेऊन मोकळे होणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. मग शेवटी आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. उगीच असा टोकाचा निर्णय घेतला म्हणून मन पश्चाताप करू लागतो . 

प्रथम उपाय - काय केले पाहिजे 

मित्रानो नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रथम उपाय म्हणून शांत राहणेच हाच योग्य निर्णय आहे. नात्यामध्ये दोघांपैकी एकाचा तरी शांत राहणे हा गुण असणे आवश्यक आहे. किवा एक जेव्हा रागात असतो, तेव्हा दुसऱ्याने शांत राहणे आणि दुसरा रागात असतो तेव्हा पहिल्याने शांत राहणे आवश्यक आहे. जो पर्यंत परिस्थिती आणि घटनेचे पैलू लक्षात येत नाहीत, तोपर्यंत शांत राहून मार्ग शोधणे हाच राहतो.







Read More : 

सुनेने माहेरच्या लोकांशी कसे वागले पाहिजे ?

मुलांना घडवताना पालकांनी त्यांच्याशी कसे वागावे ?

प्रेमात पडल्याने वजन वाढते का? जाणून घ्या काय कारण आहे

वैवाहिक जीवन सुखी कसे करावे ? How to Make Married Life Happy ?




   


  

  


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!