स्वतः बदला जग बदलेल - मोटिवेशनल विचार | Motivational Quotes in Marathi

SD &  Admin
0

 माणूस सतत जगाला बदलण्यासाठी प्रयत्न करत असतो. हमेशा जगाच्या चुका काढत असतो. जग बदलेल तेव्हा मी बदलेल अशा काही विचारात माणूस स्वतःला बांधत असतो.

या सगळ्या चक्रात स्वतःच्या चुका मात्र तो विसरून जातो. अर्थात तो स्वतःच्या चुकाच मानत नाही. त्याला फक्त दुसऱ्याच्या चुकाच दिसतात. या सगळ्या भानगडीत तो इतका अडकून जातो कि तो कधी काळ चक्रात पडलेला असतो हे तो विसरून जातो. परिणामी असे मनुष्य दुःखाच्या खाईत लोटले जातात. गर्द विचारांनी त्यांची बुद्धी वैतागून जाते. आत्मविश्वास नष्ट होतो. आणि शेवटी जीवन दु:खमय होते.

मित्रानो या सगळ्यांपासून दूर राहण्यासाठी प्रथम स्वतः बदला मग जग बदलेल. जो पर्यंत तुम्ही स्वत:मध्ये चांगले बदल घडवून आणत नाहीत. तो पर्यंत तुम्ही दुसऱ्यांना बदलू शकत नाही. यात फक्त आणि फक्त तुमचाच तोटा होणार नाही. यासाठी जग कधीच दु:ख करत बसत नाही. दु:ख होणार ते फक्त तुम्हाला.

तुम्हाला या सगळ्यातून मोटिवेटेड करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी  मोटिवेशनल ( सकारात्मक) विचार कोट्स उपलब्ध करुन देत आहोत. फार हार्ट टचिंग आहेत. वाचत असतानाच तुम्हाला नवीन काही मिळाल्यासारख वाटेल.

स्वतः बदला जग बदलेल - मोटिवेशनल विचार | Motivational Quotes in Marathi


जग बदलणारे मोटिवेशनल विचार - सकरात्मक कोट्स | Motivational Thinking Quotes    


स्वतःला आनंदी ठेवणं ही तुमची प्रथम मोठी 
जबाबदारी आहे
जे  बदललं जाऊ शकतं ते बदला
जे बदललं जाऊ शकणार नाही ते स्वीकारा 
जे स्वीकारलं जाऊ शकत नाही, त्यापासून दूर जा
परंतु स्वतःला आनंदी ठेवा
कारण ती सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे.  


श फक्त योगायोग नाही
आपल्या दृष्टिकोनाचा परिणाम आहे
आणि आपला दृष्टीकोन 
आपण स्वतः निवडू शकतो. 


डचणीच्या वेळी 
जेव्हा मनातून हळूच 
एक आवाज येतो
सर्वकाही छान होईल 
तोच आवाज देवाचा असतो.


दुधाचं सत्व सायीत आहे
आणि जीवनाचं सत्व 
चांगुलपणात आहे.


र तुमची संगत 
चांगल्या लोकांसोबत असेल,
तर तुम्ही चागली व्यक्ती होता.


मोह इतका करू नका 
की दोष लपतील
घृणा इतकी करू नका की
चांगुलपणा बघूच शकणार नाही.


नात्यातला विश्वास कमी झाला तर
एकदा रीस्टार्ट करुन बघावं
काय सांगाव चांगल नेटवर्क मिळालं
तर त्यासाठी आयुष्याची नाती
स्विच ऑफ करण्याची काय गरज आहे.  


ज्या व्यक्तीच्या जीवनाविषयी 
सर्वात कमी तक्रारी आहेत
तोच सर्वात जास्त सुखी व्यक्ती.


मी एकदा वाचलं होतं की 
जे लोकं दुसऱ्यांना वाचतात
ते बुद्धिमान असतात
आणि जे लोकं 
स्वतःला वाचतात
ते प्रबुद्ध असतात.

माहित नाही कोणत्या
संपत्तीचा माणसाला
अहंकार आहे 
शेवटच्या क्षणी तर माणसाला 
दुसऱ्यांवरच अवलंबून राहायचं असतं.


रिश्रम ही शौभाग्याची जननी आहे
देण्यासाठी दान 
आणि घेण्यसाठी ज्ञान 
त्यागासाठी अभिमान 
सर्वात श्रेष्ठ आहे.


तुम्हाला शक्तिशाली व्हायचंय
यासाठी नाही की 
हे जग तुम्हाला दाबू शकेल
  तुम्हाला शक्तिशाली व्हायचंय
यासाठी की हे जग तुम्हाला
 दाबू शकणार नाही.
  

जीवनात बरेच निर्णय आपण घेतो
आणि काही आपले नशीब घेते
येथे फरक एवढाच आहे कि
नशिबाचे निर्णय आपल्याला आवडत नाही
आणि आपले निर्णय 
नशीब पसंत करत नाही.

र आपल्या मनात खूप 
जास्त विचार सुरु असतील, तर 
आपली शक्ती नष्ट होत राहते
जेवढे कमी आणि चांगले विचार 
आपल्या मनात राहतील
तेवढेच आपण शक्तिशाली बनत राहू.

 
से विचार ठेवू नका की मला 
रस्ता चांगला मिळावा
उलट असा विचार करा की मी जिथे पाय 
ठेवेन तो रस्ता चांगला होऊन जाईल 
कारण जो आपल्या 
पावलांच्या योग्यतेवर विश्वास ठेवतो 
तोच शिखरावर पोहोचतो


तुम्ही काल काय करू शकला 
नाहीत यावर पश्चाताप 
करीत बसू नका 
उलट विचार करा की 
आज तुम्ही काय करू शकता


नात्याचं सौंदर्य 
एकमेकांना समजून 
घेण्यात आहे.
स्वतः सारखा माणूस 
शोधत राहाल तर एकटे पडाल.


धी तुटतो, तर कधी विखरतो
संकटात माणूस अधिकच बहरतो


सामान्य माणूसच जीवनाचा
आनंद घेतो, जास्त हुशार तर
नेहमी गुंतलेला राहतो.


सोडून दे प्रयत्न माणसाला ओळखण्याचे
इथे सोईनुसार सर्व बदलतात
मुखवटे स्वतःच्या अपराधांवर 
शंभर पडदे टाकूनही प्रत्येक जण म्हणतो 
जग फार वाईट आहे!


तो पर्यंत कमवा, जोपर्यंत महागडी 
गोष्ट स्वस्त वाटत नाही
मग ते सामान असो वा सन्मान 


जारो दु:ख माझं 
आयुष्य नाही बदलू शकत
कारण मला सवय आहे
प्रत्येक क्षणी हसायची


नुभवाने आपली परिस्थिती
परमेश्वरावर सोपवून द्या
कारण जेवढं तुम्ही जीवनभर करू शकता
त्यापेक्षा कितीतरी जास्त
परमेश्वर एका क्षणात करू शकतात.


नातं आणि पाणी एकसारखंच असतं
कोणताही रंग नसतो,
कोणतंही रूप नसतं,
तरीही जीवनाच्या अस्तित्वासाठी 
महत्वाचं असतं


स्वतः बदला जग बदलेल - मोटिवेशनल विचार | Motivational Quotes in Marathi


स्वतःला प्रेरित करीत राहा 
नकारात्मक विचारांपासून वाचण्यासाठी आवश्यक आहे की,
तुम्ही स्वतःला प्रेरित करीत राहा.
आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे तुम्ही 
स्वतःला सकारत्मक आणि उर्जावान बदलून ठेवणे, त्या सर्व योग्य 
गोष्टींची मदत घ्या, जी तुम्हाला प्रेरित करीत असते
थोर माणसांचे आत्मचरित्र वाचा
यशस्वी लोकांच्या प्रेरणा देणाऱ्या कथा वाचा
व्यक्तिमत्व विकासाविषयी लेख वाचा
आणि स्वतःला प्रेरित करीत राहा.


मैत्रीचे प्रत्येक क्षण भरभरून जगा 
कोण कधी दूर जाईल 
हे कोणाला माहित ?


र हरण्याची भीती वाटत असेल तर 
जिंकण्याची इच्छा कधी करू नका 


हातातल्या रेषासुद्धा 
किती विचित्र असतात, मुठीत असतात 
परंतु आपल्या मुठीत नसतात.


र तुम्हाला कोणासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत,
तर तुम्ही त्यांच्याविषयी जे काही जाणता 
त्याच्यावर विश्वास ठेवा,
त्यावर ठेऊ नका जे तुम्ही त्यांच्याविषयी ऐकलं आहे.


जीवन सोपं होतं 
जेव्हा कोणी आपली व्यक्ती म्हणते 
तू चिंता करू नकोस,
सर्व काही ठीक होईल.


जिवंत आहोत तर 
अडचणी येणारच 
मृतांसाठी तर सर्वच मार्ग रिकामा करतात.


पला व्यवहार हा गणितातल्या
शून्याप्रमाणे असावा,
जो स्वतःची तर काही किंमत नाही ठेवत
परंतु दुसऱ्यांसोबत जुळल्यावर त्यांची किंमत वाढवतो.


इच्छा आहे मोठं दिसायची 
न आकांक्षा देव होण्याची 
फक्त एकच अपेक्षा आहे 
आयुष्य सार्थकी लावण्यासाठी 
प्रयत्न असावे म्हणूस बनण्याचे 


मैदानात हरलेला माणूस 
परत जिंकू शकतो
परंतु मनाने हरलेला माणूस 
कधीच जिंकू शकत नाही

स्वतः बदला जग बदलेल


जीवनात कोणाला रडवून होम हवन करुन पूजा केली 
तर त्याला काही अर्थ नाही.
आणि जर कोणा माणसाला हसवलं 
तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही.
विचार करू नका, करुन बघा
मनाला खूप समाधान वाटेल.    




 
  
      

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!