सुनेने माहेरच्या लोकांशी कसे वागले पाहिजे ?

SD &  Admin
0

नात्यामध्ये  सासू आणि सूनेचं नातं हे खूप महत्वाचं असतं . या नात्यावरती घराची दोर कायम टिकून असते. जरासा  अविश्वास नात्याला तडा जाऊ शकतो.

म्हणून या नात्यात दोघांनी ही म्हणजेच सुनेने आणि सासुने सामंजसपणे एकदुसऱ्याशी वागले पाहिजे. सासूचे काय चुकले तर सुनेने समजावून घेतले पाहिजे, तर सुनेचे काय चुकले तर सासूने समजावून घेतले पाहिजे. जर या गोष्टी दोघींना जमल्या, तर मग घरात गोडवा आलाच समजा.

तसं म्हटलं तर सुनेला दोन्ही घरांना आपलंस करुन घ्यायचं असतं. सासर हे तिच हक्कच झालेलं असतं, तर माहेर हे फक्त आणि फक्त प्रेमावरती टिकलेल असतं. जो पर्यंत आई वडील आहेत, तो पर्यंत मुलीला काही टेन्शन नसतं. परंतु आई-वडिलांच्या पाठीमागे पहिल्यासारख प्रेम मिळेल याची शास्वती नसते. म्हणून सुनेने खूप जबाबदारीने दोन्ही घरांशी वागले पाहिजे.

या रस्सीवर सासूचा रोल खूप महत्वाचा असतो. आपल्या सुनेला सासर बरोबर माहेरचे ही दरवाजे हमेशा कायम वाट पाहत असावे, या साठी सुनेला मार्गदर्शन केले पाहिजे. सुनेने ही सासूचे दोन शब्द ऐकले पाहिजे. जेणे करुन तिला सासर आणि माहेर यावरती समतोल साधता येईल.

आपण या ब्लॉगमध्ये सुनेने माहेरच्याशीं कसे वागले पाहिजे, या बाबत मोलाचे सल्ले देत आहोत. हे सल्ले खरच नवीन आणि जुन्या सुनेंसाठी फायद्याचे ठरतील.

सुनेने  माहेरच्या लोकांशी  कसे वागले पाहिजे

माहेरी जाणाऱ्या सुनेसाठी काही महत्वाचे सल्ले


💧 आई वडिलांना संसारच्या लोकांबद्दल सतत उलटं  सुलटं न सांगता, तुम्ही सासरी सुखात आहात, याचा विश्वास द्या. काय असत.., म्हातारपणी प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं  की तिच्या मुलीने सासरी सुखात राहावे. त्यांच्यासाठी तुमचे हे शब्द त्यांच्या मनाला आणि आत्म्याला शांती देत असतात.

💧 माहेरी जेव्हा कुणी आजारी किंवा दु:खद घटना घडली असेल तर, वेळ न घालवता त्यांची विचारपूस करायला जा. त्यामुळे त्यांना खूप आनंद वाटेल. परंतु आनंदाच्या क्षणी, जो पर्यंत माहेरचे निमंत्रण देत नाहीत, तो पर्यंत तुम्ही जाऊ नका.

💧 लग्नानंतर मुलगी ही सासर आणि माहेरचे अभिमानाचे आणि इज्जतीचे काम करत असते. थोडीसी चूक दोन्ही ही घरांना समाजात मान खाली घालायला लावू शकते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीची तक्रार न करता संसारात येणाऱ्या बदलाला स्वीकारत चला.

💧 सर्वात महत्वाच सासरी भांडून कधीही माहेरी पळत जाऊ नका. यात तुम्हाला अपमानाला सामोरे जावे लागू   शकते.

💧 सतत माहेरच्या लोकांकडे पैशाची व इतर वस्तूंची मांगणी करत बसू नका. या आधी आपल्या माहेरच्या लोकांच्या परिस्थितीती काय आहे याबद्दल जाणून घ्या.

💧 आई-बाबांनी किंवा भावांनी दिलेल्या गोष्टीसाठी लगेच हात पुढे करू नका. असे करणे सासरच्या लोकांना वाईट वाटू शकते. एकदा नवऱ्याचा स्वभाव तुम्ही जाणून घ्या.

💧आई-वडिलांच्या पाठीमागे भाऊ-वहिनी वरती अवलंबून राहू नका. सतत त्यांना माहेरची परस्थिती सांगत बसू नका.

💧 माहेरच्या लोकांकडून कधीच अपेक्षा करत बसू नका.

💧 माहेरी जाल तेव्हा आई-वडिलांशी आणि भाऊ-वहिनीशी भांडत बसू नका. वहिनीला, आईला कामात मदत करा.

💧 काम करायला शक्य नसेल तर, कोणाच्याही कामात लुडबुड करू नका. शक्यतो वहिनीच्या कामात बिलकुल लुडबुड नको. आपल्या आईला वहिनीबद्दल काहीही चुगल्या सांगत बसू नका.

💧 आपल्यामुळे आपल्या भावाला, वहिनीला आणि इतर सदस्यांना काही त्रास तर होत नाही,, ना याची पुरेपूर काळजी घ्या.

💧वहिनी जर जॉब करत असेल तर, तिला कायम प्रोत्साहान द्या. स्वतःच्या आईला देखील तिला कामात मदत करायला प्रेमाने सांगा. यापूर्वी तुमचे आणि तुमच्या आईचे संबध चांगले असावे.

💧 जर तुमची आई, भाऊ आणि वहिनी नसताना तुम्हाला काही गोष्टी देत असेल तर, त्या स्वीकारू नका. उलट तुम्ही आईला सांगा की त्या भाऊ आणि वहिनीच्या पसंदीनेचं घेऊ शकेल किंवा न घेणेचं तुम्हाला योग्य आहे.

💧माहेरच्या नातेवाईकांकडे जात असाल तर वहिनीला बरोबर घेवून जा. तिला विसरून कुठेही जाऊ नका.

💧 माहेरी तुम्हाला कोणाची गोष्ट खटकत असेल, तर लगेच भांडण करायला धावू नका. स्वतःला आवरा. आणि शांत राहा.

💧 स्वतःच्या मुलांना काही गिफ्ट आणायचा विचार असेल तर, भावाच्या मुलांना गिफ्ट आणायला विसरू नका.

💧 माहेरी मुलांमध्ये भांडणे लागली तर, तुम्ही लगेच आपल्या मुलांची बाजू घेऊ नका. स्वतःला स्थिर ठेवा. रागाला नियंत्रित करायला शिकले पाहिजे.


या काही सुनेसाठी महत्वाच्या टिप्स आहेत. ज्या मुलीनी आपल्या जीवनात आत्मसात केल्या पाहिजेत. मी असं नाही म्हणत की, प्रत्येकवेळी खाली मान घालून राहिले पाहिजे. परंतु जेवढ होईल तितकं रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. संसार आहे. भांड्याला भांड हे लागणारच. जर यत कुणीच मागे हटल नाही तर, घरात महायुद्ध होण्यास जरा मात्र वेळ लागणार नाही. आणि मग सून म्हणून त्या भांडणच खापर तुमच्यावरचं फोडलं जाईल.

म्हणून कायम मोठ्या माणसांचे सल्ले ध्यानात ठेवावे...............





Read More :


मुलांना घडवताना पालकांनी त्यांच्याशी कसे वागावे ?

प्रेमात पडल्याने वजन वाढते का? जाणून घ्या काय कारण आहे

वैवाहिक जीवन सुखी कसे करावे ? How to Make Married Life Happy ?

How to Save Love Relationship in Marathi ? बिघडलेलं प्रेम कसं वाचवू शकतो ?


             
   

   

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!