हिंदू धर्मात दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, आनंद घेऊन येतो. दिवाळी ही जसी आनंदाची, उत्साहाची असते. तशीच दिवाळी ही विजयाची प्रतिक देखील आहे. भगवान श्रीराम-सीता, लक्षण राक्षस रावणाचा वध करुन, जेव्हा ते अयोध्येत परतले, तेव्हा फक्त अयोध्याच नाही तर धरतीवर सगळीकडे दिवाळी साजरी केली गेली होती. सगळीकडे, पताका, दिवे लागले गेले होते. सगळीकडे रोषणाई केली गेली. मिठाई वाटण्यात आली. अश्या भव्य थाटामाटात प्रभू श्रीरामांचे स्वागत झाले होते. आणि त्या दिवसापासून दिवाळी साजरी केली जाऊ लागली.
या वर्षी २०२४, दिवाळी कधी येणार आहे ?
हिंदू धर्मात दिवाळी ही आश्विन मास अमावस्येच्या दिवसी साजरी करण्यात येते. त्यानुसार या वर्षी दिवाळी ही १ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येईल. त्या पूर्वी २९ ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदसी, ३१ ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्दशी आणि १ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी पूजन करण्यात येईल.
लक्ष्मी पूजनाची वेळ आणि तिथी
यावर्षी लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ ही संध्याकाळी ५ :३६ मिनिटांनी सुरु होईल ते ६ : १६ मिनिटापर्यंत असेल.अमावास्या तिथी वेळ : ३१ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ : ५२ पासून सुरु होईल आणि समाप्ती १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ : १६ मिनिटापर्यंत असेल.
दिवाळी आली म्हणजे लोक लक्ष्मी पूजनाची विधी आवर्जून पाहत असतात. तर आपण पाहूया लक्ष्मी पूजनाची विधी कशी करावी.
लक्ष्मी पूजनाची विधी कशी करावी ?
प्रथम लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो. स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्या नंतर साफ काड्याने पुसून घ्या. त्यानंतर मूर्ती लाकडी साफ चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड पसरून अलगद ठेवावी.विधी करण्याआधी वातावरण सुंदर आणि आनंदी ठेवावे. आरस, कंदील, योग्य सजावट करुन घर सजवावे. त्यानंतर देवी पुढे दिवा, धूप लावावा. त्यानंतर देवीच्या कपाळावर हळद, चंदन, अक्षदा लावावे. बरोबर सुंदर फ्रेस हार आईच्या गळ्यात अर्पण करावा.
सगळ्या गोष्टी नीट झाल्यानंतर आईची आराधना करावी. सगळ्या विधी झाल्याबर नैवद्य आणि तुळशी अर्पण कराव्यात. ध्यानात ठेवावे नैवद्य करताना पावित्र ठेवावे. मीठ, तेल या गोष्टी नैवेद्यात वापरू नये. सगळ्या गोष्टी नीटनिटक्या पार पडल्यानंतर देवीची आरती म्हणून सांगता करावी.
आपल्या हिंदू धर्मात पूजेला विधी पूर्वक केले जाते. त्या नुसार देवीच्या पूजेच्या बरोबर स्वस्तिक, कलश, पंच लोकपाल, सप्तमातृका, नवग्रह देवता यांचीही पूजा केली जाते.
यावर्षी दिवाळीची तारीख अशी असेल
Read More :
दसरा २०२४ : हिंदू धर्मात दसऱ्याचे महत्व, इतिहस आणि मुहूर्त
भगवान श्रीकृष्णाविषयी अनमोल माहिती | श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल ब्लॉग
विघ्नहर्ता श्री गणपतीचे आगमन २०२४ : दिवस आनंदाचे आणि उत्सवाचे
Raksha Bandhan Special Day 2024 : भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस