दसरा २०२४ : हिंदू धर्मात दसऱ्याचे महत्व, इतिहस आणि मुहूर्त

SD &  Admin
0

 हिंदू धर्मात उत्सवांना खूप महत्व आहे. संपूर्ण जगात हिंदू धर्मातच अधिक उत्सव आहेत. आणि ते तितक्याच आवडीने, उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. त्या उत्सवांपैकी दसरा हा सण खूप महत्वाचा आहे. या सणाची अगदी प्रत्येकजण आवडीने वाट पाहत असतो. आणि त्याचे कारण ही तितकेच महान आहे.

काही दिसताच दसऱ्याचे आगमन होणार आहे. म्हणून प्रथम आपण कधी, कोणत्या तारखेला येणार आहे. या बद्दल जाणून घेऊया. दसऱ्याच्या आधी नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. हा उस्तव ९ दिवस सुरु असतो. या वर्षी 3 ऑक्टोंबर पासून नवरात्र सुरु होत आहे. या दिवसी आई जगदंबेची ९ रुपामध्ये पूजा केली जाते. त्यानंतर १२ ऑक्टोंबरला नवरात्र समाप्त होईल. त्याच दिवसी म्हणजेच १२ ऑक्टोंबरला दसरा साजरा करण्यात येईल. दसरा हा उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला येतो. या सणाला विजयाचे प्रतिक मानले जाते. साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असलेल्या या सणाला विजया दशमी म्हणून पण ओळखले जाते.

यावर्षी दसरा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी समाप्त होईल.

दसरा २०२४ : हिंदू धर्मात दसऱ्याचे महत्व, इतिहस आणि मुहूर्त

दसरा २०२४ : यावर्षी पुजेची शुभ वेळ काय असेल ?


१२ ऑक्टोंबर रोजी पुजेची शुभ वेळ ही २ वाजून २ मिनिटापासून ते दुपारी २ वाजून ४८ मिनिटापर्यंत आहे.

हिंदू धर्मात दसरा हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे हा दिवस साजरा करण्याचे महत्व ही खूप महान आहे. जाणून घेऊया.  दसरा का साजरा केला जातो?


दसरा का साजरा केला जातो?

हिंदू धर्मात दसरा हा खूप पवित्र दिवस मानला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवसाचे पावित्र्य अलौकिक आहे. पौराणिक मान्यतानुसार दसरा हा दिवस रामाने रावणाचा वध करुन धरतीवर धर्माचे राज्य स्थापित केले. या अलौकिक दिवस साऱ्या धरतीवर साजरा केला गेला होता. म्हणून या दिवसाला विजया दशमी देखील म्हटले जाते.

तसेच दुसरी मान्यतानुसार आई जगदंबेने महिषासुराचा वध या दिवसी केला होता. असं म्हटलं जाते, आई जगदंबेने या राक्षसाला मारण्यासाठी ९ दिवस युद्ध केले. आणि दहाव्या दिवसी महिषासुराचा वध केला. त्यामुळे नवरात्री नंतर दसरा साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. या दिवसी शस्त्र पूजा देखील केली जाते. जाणून घेऊया शस्त्रांची पूजा का केली जाते?


दसरा या दिवसी शस्त्रांची पूजा का केली जाते?

दसरा विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी प्रभू श्रीरामानी राक्षस रावणाचा वध केला. आणि धरतीवर धर्माचे राज्य स्थापित केले. म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवसी केलेले कोणतेही कार्य पूर्णच होते. या दिवसी जर युद्ध केल तर विजय नक्कीच होतो. म्हणून क्षत्रिय जेव्हा जेव्हा युद्धाला जायचे त्यापूर्वी  शस्त्रांची पूजा  करुन युद्धावर जायचे. तेव्हापासून दसरा या दिवसी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली.


शमीच्या झाडाचीही पूजा केली जाते.

हिंदू धर्म निसर्गाशी जोडलेला आहे. म्हणून तर आपण निसर्गाला आणि पशु पक्षांना देवता समान मानतो. आपण याची उदाहरणे पौराणिक ग्रंथात वाचलेली आहेत. तसेच एका पौराणिक मान्यतेनुसार पांडवानी अज्ञातवासात असताना शमीच्या म्हणजेच मराठी भाषेत आपट्याच्या झाडावर आपली शस्त्र लपवली होती. तसेच विराट राज्यात आश्रित असताना कौरवांना याच दसऱ्याच्या दिवशी युद्धात हरवले होते. तसेच आजही गावोगावी आपट्याच्या पाने सोने म्हणून घरोघरी देण्यात येतात.


  
१२ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या या पवित्र दसऱ्याच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांच्या घरात सुख-शांती, आरोग्य लाभो आणि सर्वाना यश प्राप्ती हो. महत्वाचं सर्वाना सुबुद्धी दे. आणि जगात सुख-शांती राहो.







Read More :

विघ्नहर्ता श्री गणपतीचे आगमन २०२४ : दिवस आनंदाचे आणि उत्सवाचे

भगवान श्रीकृष्णाविषयी अनमोल माहिती | श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल ब्लॉग

Raksha Bandhan Special Day 2024 : भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस

सुंदर आयुष्य कसं जगायचं? सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!