आजच्या धावपळीच्या काळात आयुष्य अगदी रोगीट व्हायला लागले आहे. जी ताकद पहिल्या काळात होती, ती आजच्या पिढीच्यामध्ये राहिली नाही आहे. थोड्याश्या इन्स्पेक्शने शरीर कोमेजून जाते. आणि आजकाल तर नवे नवे रोग ही येऊ लागले आहेत. त्यांच्यावर कोणते मेडिसिन कारगार ठरेल, ते अजूनही अनेक वैद्यकीय लोकांना समजत नाही.
असुद्या हळू हळू यांच्यावरही उपाय येतील. परंतु तुम्हाला माहित आहे का? आजचा माणूस हा आवश्यक गोष्टीना इग्नोर करुन, नको त्या गोष्टीच वापरत असतो. जसे आपल्या आयुर्वेदात अनेक बी-बियाणे, झाड-पाल्या बद्दल सांगितले आहे. ज्यांच्या सेवनाने आपण निरोगी होऊ शकतो. आपल्याला या मेडिकलमधील गोळ्या औषधे खायची गरज भासणार नाही. परंतु माणसाने या गोष्टींकडे कानाडोळाच केला आहे.
या ब्लॉगमधून आपण अशाच बियाबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या योग्य सेवनाने आपण निरोगी राहू शकता. तुम्ही अनेक आजारांना दूर ठेऊ शकता. त्या बियांपैकी एक नाव आहे "जवस." फार गुणी बिया आहेत. जर तुम्ही आहारात या बियांचा समावेश केलात तर, तुमच्या जीवनातून अनेक खतरनाक मेडिसिन दूर पळून जातील. आपण या ब्लॉगमधून जवसाच्या बियांचा आपल्याला कसा फायदा होतो ते पाहूया.
जवसाच्या बियांचा आहारात वापरणे कसे फायद्याचे ठरते?
जवसाच्या बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जे या प्रमाणे असतात. प्रथिनं, लोह, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, जीवनसत्व ब कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, अ जीवनसत्व, मँग्नेशियम, मँगनीज, कॉपर , फायबर, ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् ई. या सर्ब गुणांनी जवसाच्या बिया परिपूर्ण असतात.जवसाच्या बियांच्या फायदे
वजन कमी होते :आजच्या काळात खाण्याचे बिघडलेले वेळापत्रक आणि बाहेरचे तेलकट अति प्रमाणात खाणे, यामुळे वजन वाढत जाते. यावर उपाय म्हणून जवसाच्या बिया खूप फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये फायबर्स असतात. त्यांच्या सेवनाने पोट भरलेले राहते. त्यामुळे सतत खाण्याची गरज वाटत नाही. त्यांमुळे पोट, वजन कमी होण्यास मदत होते.
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
जसे सांगितल्याप्रमाणे जवसाच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यांच्या सेवनाने केसांना पोषक घटक मिळतात, त्यामुळे केसांची वाढ होते. केस, लांब ,चमकदार होतात. तसेच त्वचेला ही फायदा होतो. जसा त्वचेचा रुक्षपणा, सुरकुत्या, खाज, मुरूम, सूज डाग, ई पासून सुटका होते.
शाकाहारी लोकांसाठी हेल्दी फूड म्हणून काम करते
जवसाच्या बिया शाकाहारी लोकांसाठी वरदानच आहे. कारण जवसामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् जास्त प्रमाणात असते. जे समुद्री माशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणून जर तुम्ही जवसाच्या बिया खालल्या तर तुम्ही समुद्री माशांप्रमाणेच योग्य पोषक घटक मिळवता.
वरील सर्व गोष्टी तुमच्याकडे कमी असतील तर, तुम्हाला या बियांचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे.
महत्वाची सूचना
कोणत्याही गोष्टींचा अतिरेक केला तर त्याचे परिणाम ही चुकीचे होतात. मग तुम्ही मधासारखे पदार्थही अति प्रमाणात खालले तर त्याचा गैरफायदा देखील होतो. त्याच प्रमाणे वरती सांगितल्या प्रमाणे या जवसाच्या बियांचा वापर मर्यादित करा.
जवसाच्या बिया खाण्याचे योग्य प्रमाण
💣जवसाच्या बियांचे अति सेवन केल्याने नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे दररोज ४०-५० ग्रॅमपेक्षा जास्त बियांचे सेवन करू नये.💣जवसाची पूड आवश्यकते नुसारच करा. कारण ही पूड ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर लगेच खराब होते.
💣जवसाच्या बिया तळणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.
💣जवस रक्तास पातळ करतो. म्हणून रक्तदाबाच्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच यांचे सेवन केले पाहिजे.
जवसाच्या बियांचा वापर कसा कराल?
💧दुधीभोपळ्याची भाजी करा. आणि त्यामध्ये जवसाची पूड मिक्स करा.
💧जवसाच्या बिया किंचित भाजून सलाद, दही, फ्रुट चाट, ज्यूसमध्ये मिसळून खाऊ शकता.
💧जर सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खात असाल तर, त्यामध्ये थोडीशी पूड मिक्स करू शकता.
💧जवसाच्या बिया तव्यावर कोरड्या किंचित भाजा. आणि त्यांची पूड करुन रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर एक चमचा पूड मिक्स करुन सेवन करू शकता. यामुळे शरीर डिटॉक्स होईल.
मित्रानो या प्रमाणे जर तुम्ही या बियांचा वापर केलात तर, तुम्हाला जवसाच्या बिया वरदान म्हणून काम करतील. परंतु डायबेटीस, अति रक्तदाब असणाऱ्या लोकांनी न विसरता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या बियांचे सेवन करा.
Read More Articles
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?
थकव्याला दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत ?
शरीरावर परिणाम करणारा अपचनाचा त्रास व उपाय
चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करुन बघा
दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी मदत करते