टेरेसवर सुंदर बाग अशी फुलवा

SD &  Admin
0

टेरेसवरती बाग फुलवणे ही आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि यासाठी प्रत्येकजण सर्वपरी प्रयत्न करत असतो. परंतु अधूरं ज्ञान यामुळे फुलझाडे टेरेसवरती फुलवणे कुठेतरी कमी होऊन जाते. यासाठी तुम्हाला बाग फुलवण्याचे योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे.  

टेरेसवरती बाग म्हणजे घराला सुंदरता येते. वातावरण अगदी प्रफुल्लीत होते. मन अगदी शांत राहते. अशी बाग प्रत्येकाला आपल्या घरी फुलवणे फायद्याचे असते. यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर या ब्लॉगमधून जाणून घेऊया.

टेरेसवर सुंदर बाग अशी फुलवा

परसबागेत फुलझाडे अशी फुलवा 


प्रथम आपल्याला टेरेसची गच्ची ऑटरप्रूफिंग करुन घेणे गरजेचे आहे. जेणेकरून पाणी झिरपून घरात येण्याचे शक्यता असते. यासाठी टेरेसवरती बाग फुलवण्याआधी हे आधी काम करुन घ्या.

त्यानंतर गरजेनुसार तुम्हाला साहित्य आणणे आवश्यक आहे. त्यामध्ये महत्वाचे फुल झाडे लावण्यासाठी पॉलिथीन, छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्या, मातीची भांडी ई. आवश्यकता असते. ध्यानात ठेवा मातीची भांडी चांगल्या भाजणीची असावी. या पिशव्यामधून किंवा मातीच्या भांडयामधून पाण्याचा निचरा होण्यासाठी एक बारीक भोक काढा. या गोष्टी झाल्यानंतर गांडूळखत, कंपोस्ट खत, शेतातील माती अन्य झाड पाला-पाचोळा, नदीच्या काठची माती. गोळा करायची आहे. या मातीमध्ये पौष्टिकता खूप असते. फल-फुल झाडे तेजीने वाढतात. 

जी भांडी मातीची आहेत, त्यामध्ये माती भरण्याआधी विठांचे तुकडे पसरून घ्या. त्यानंतर कंपोस्ट खत, पाळा-पाचोळा समप्रमाणात मिसळून कुंड्या भरून घ्यायच्या आहेत. प्रत्येक कुंडीत एकच झाडा लावा. विनाकारण एकाच कुंडीत भरपूर रोपे गच्च भरून ठेऊ नका.  

या कुंड्या तुम्ही तारेच्या किंवा लाकडाच्या काठ्या उभारून त्यावरती टांगत्या ठेऊ शकता. दिसायला फार छान वाटतात. अशा कुंड्यात तुम्हाला सुंदर फुलझाडे लावायची आहेत. तुम्ही नॅस्टरशियम, पिटुनिया, व्हरबेनिया अशा प्रकारची रोपे लावून घराला मनमोहक सजवू शकता.

बागेत फुल-फल झाडे तेजीने लागावी म्हणून वेळोवेळी सेंद्रिय खताचा वापरा करावा. यात कंपोस्ट खत,  शेणखत, गांडूळखत, लेंडीखत, सरकी पेंड यांचा समावेश असावा. सेंद्रिय खताचा वापर केल्याने पर्यावरणला देखील चांगला हातभार लागतो. कारण सेंद्रिय पदार्थामुळे मातीचे कण दाणेदार बनून स्थिर होतात. बरोबर जलधारणाशक्ती वाढते. निचरा योग्य होतो.

सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लावलेल्या रोपांची किडीपासून सरंक्षण करणे ही खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही घरातच नैसर्गिक औषधे बनवून कीड मारू शकता. जसे विविध प्रकारच्या वनस्पतीच्या अर्कापासून, गोमुत्र, ट्रायकोग्रामा यासारख्या जैविक घटकांचा वापर करुन कीड मारू शकता. रासायनिक औषधांचा वापर टाळावा.


इंटरनेटवरती अनेक प्रकारची फल-फुल झाडाबद्दल माहिती उपलब्ध आहे. त्याची योग्य माहिती घ्या. आणि त्या प्रकारे तुम्ही गच्चीवरती, अंगणात फल-फुल झाडे लाऊन घराला सुंदर बनवू शकता.







Read More :     

सुंदर आयुष्य कसं जगायचं? सुंदर आयुष्य जगण्याची सूत्रे

Raksha Bandhan Special Day 2024 : भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस

विघ्नहर्ता श्री गणपतीचे आगमन २०२४ : दिवस आनंदाचे आणि उत्सवाचे

    



   

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!