या सर्वांपासून बचाव करण्यासाठी घरघुती पद्धतीने बनवलेल्या ब्युटीक्रीम्स चांगल्या फायदेशीर ठरतात. आणि या बनवण्यासाठी खर्च ही ना की बराबर येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे या घरघुती क्रीमपासून तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट्स होत नाहीत.
आपण या ब्लॉगमधून सुंदर दिसण्यासाठी घरघुती उपाय कोणते आहेत, त्या बद्दल जाणून घेऊया. फार सरळ उपाय आहेत. यांपासून तुम्हाला कोणताही अपाय नाही आहे. झाला तर फायदाच होईल. कारण या सर्व वस्तू आपल्या किचनमध्येच उपलब्ध असतात. त्यामुळे यामध्ये कोणतेही मिलावट तुम्हाला दिसणार नाही. एकदम फ्रेश आणि केमिकल्स रहित हे उपाय आहेत.
सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
तेलकट त्वचेपासून सुटका :
तुमची त्वचा जर तेलकट असेल तर हा उपाय करा. एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा गुलाबपाणी व बारीक पेस्ट केलेला पुदिना मिक्स करुन त्वचेला एक तासभर लावून ठेवा. त्या नंतर चेहरा साफ पाण्याने धुऊन घ्या. असे तुम्ही काही दिवस करत राहिलात. तर तुमची त्वचा ही साफ सुतरी आणि आकर्षक दिसेल.
सुरकुत्या दूर करा :
सुरकुत्या दूर करण्यासाठी एक चमच मधात काही थेंब लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. असे तुम्ही वारंवार करत राहिल्यास सुरकुत्या हळू हळू निघून जातील.
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी :
एक चमचा गुलाबपाणी आणि एक चमचा दुधाच्या मिश्रणात दोन-तीन लिंबाचा रस मिक्स करा. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची कोमलता आणि चमक वाढते. चेहरा अगदी आकर्षक दिसेल.
चेहरा आकर्षक बनवा :
या साठी थोडासा कोंडा घ्या. त्यात एक चमचा संत्र्याचा रस, एक चमचा मध व गुलाबपाणी मिक्स करुन, तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर, इतर अंगावर लावा. असे कर राहिल्यास चेहऱ्याबरोबर, अन्य अंग ही आकर्षक दिसेल.
डोळ्याखालील डार्क सर्कल टाळण्यासाठी :
यासाठी बदामाच्या तेलात मध मिसळून लावावे. त्यानंतर ते हलक्या हाताने चोळून घ्यावे. त्यानंतर साफ पाण्याने धुऊन घ्या. हळू हळू डार्क सर्कल कमी होतील.
मुलायम त्वचेसाठी :
चेहरा मुलायम दिसण्यासाठी हा उपाय करा. ताज्या मलईत ग्लिसरीन व लिंबाच्या रसाचे थोडेसे थेंब मिक्स करुन, त्याचा लेप चेहऱ्यावर, मानेवर लावा. त्वचा मुलायम होईल.
मध हा सर्वतः शरीरासाठी आवश्यक असणारा पदार्थ आहे. याचा उपयोग खाण्याबरोबर सौंदर्यासाठी ही खूप होतो. मधाचा लेप तुम्ही चेहऱ्यावर, मानेवर लावा आणि काही वेळाने कोमट पाण्याने त्वचा धुऊन टाका, त्वचा अगदी मुलायम आणि आकर्षक दिसेल.
दालचिनी मास्क :
दालचिनी ही औषधी पदार्थ आहे. दालचिनीला बारीक करुन, त्यात एक चमच मध आणि एक चमच लिंबाचा रस मिक्स करुन, ते मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर राहूदे. त्यानंतर चेहरा धुऊन टाका.
एलोवेरा पेस्ट :
एलोवेराच्या आतील रसाची पेस्ट करून ती चेहऱ्यावर लावल्यास चेहरा अगदी खुलून दिसतो. तसेच एलोवेराचा ज्यूस ही शरीराचे आरोग्य चांगले ठेवतो.
महत्वाचा सल्ला :
मित्रानों वरती दिलेले सर्व उपाय हे फक्त आणि फक्त नैसर्गिक उत्पादनापासून सांगितलेले आहे. त्यामुळे यांचा तुमच्या चेहऱ्यावर कोणताही साईड इफेक्ट्स होणार नाही. तरीही अनेक जणांना काही पदार्थांची एलर्जी असते. अशा लोकांनी या सर्व गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अंत्यंत आवश्यक आहे.