तुम्ही टॉक्सिक पार्टनर बरोबर राहत आहात, हे कसे ओळखाल

SD &  Admin
0

तुमच्या पार्टनर बरोबर तुमचं नातं हे प्रेमळ आणि विश्वासपूर्ण असेल, तर त्या नात्याला आपण हेल्दी नातं म्हणतो. असे नातं प्रत्येकाला हवे हवेसे वाटत असते. परंतु काही नात्यामध्ये सतत क्लेश, भांडण होत असतात. काहींना तर कारण पण असण्याची गरज नसते, सतत त्यांचा भांडणात दिवस जात असतो. अशा क्लेशपूर्ण नात्याला आपण  टॉक्सिक नातं म्हणतो.

कोणतेही नातं टिकवण्यासाठी नात्यामध्ये प्रेमाबरोबर विश्वास ही असणे फार गरजेचे असते. विश्वास ही अशी दोरी आहे. जी नात्याला घट्ट बांधून ठेवत असते. परंतु या दोन गुष्टींचा आभाव जर नात्यामध्ये दिसून येऊ लागला की समजून जायचे की, हे नातं टॉक्सिक मध्ये परिवर्तीत होणार आहे. काहीजण या नात्याला विषारी नातं देखील म्हणतात. हे नातं फार भयानक असते. कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी कधी हिंसक गोष्टीही होऊन जातात. शेवटी या नात्याचा शेवट फार वाईट पद्धतीने होतो.

मित्रानो तुम्ही जर नात्यामध्ये म्हणजे रिलेशनशिप असाल तर, तुम्हाला अनेक गोष्टींचा अनुभव आला असेल. परंतु जर तुम्हाला नात्यामध्ये चुकीचा अनुभव येत असेल. म्हणजेच तुमचा आता तुमच्या पार्टनरवर विश्वास कमी होत चालला असेल. तुमचा पार्टनर सारखा तुमच्यावर संशय घेत असेल. पार्टनर छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्याशी भांडण करत असेल, तर तुम्हाला लक्षात आले पाहिजे कि तुमचे नातं टॉक्सिक कडे वळत आहे.

तुम्हाला तुमचे नातं टॉक्सिककडे वळत आहे, हे कोणत्या करणावरून लक्षात येईल, या बद्दल आपण या ब्लॉग मधून सविस्तर जाणून घेऊया.

तुम्ही टॉक्सिक पार्टनर बरोबर राहत आहात, हे कसे ओळखाल

टॉक्सिक पार्टनर  कसा ओळखायचा ?


 💣 टॉक्सिक पार्टनर कायम क्षुल्लक करणावरून सतत भांडत असतो. मग यात तुमची चुकी असेल किंवा नाही, त्याला भांडण करायला फक्त कारण लागते. अशी माणसे दुसऱ्याचा राग आपल्या पार्टनरवर काढण्यात माहीर असतात.

 💣जर तुमच्या नात्यात कोणतीही तडजोड होत नसेल. तुम्ही तडजोड करण्याचा प्रयत्न करताय, परंतु पार्टनर कोणतीही तडजोड करण्यास तयार नसतो. अशा वेळी निसंदेह तुम्ही टॉक्सिक पार्टनर बरोबर राहत आहात हे समजून जा.

 💣तुमचा पार्टनर तुमच्यावर सतत संशय घेत असतो. तसेच तुम्हाला त्याच्याबरोबर असुरक्षित वाटत असेल. अशा ही नात्याला  टॉक्सिक समजले जाते.

💣तुमचा जोडीदार तुमच्याशी सतत खोटे बोलत असतो. तसेच कधीही तो स्वतःचा स्वार्थ बघत असतो. अशा ही नात्याला टॉक्सिक समजले जाते.

💣तुमचा पार्टनर रागाच्या भरात मर्यादा ओलांडत असतो. त्याचा राग हा कधी कधी हिंसक ही होत असतो. अशा  विषारी नात्यात तुम्हाला राहणे चुकीचे ठरेल.

💣त्याने केलेली चुकी तो कधीच मान्य करत नाही, किंवा तो कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेत नाही. या ही नात्याला  टॉक्सिक समजले जाते.


वरील सर्व अनैसर्गिक गुण टॉक्सिक नात्याला दर्शवतात. असं नातं जर तुम्ही जगत असाल. तर आताच त्यातून बाहेर पडा. ज्या नात्यात सतत स्वारी स्वारी म्हणण्याची वेळ येते आणि स्वारी बोलूनही ही पार्टनरचा स्वभाव बदलत नाही. अशा टॉक्सिक  पार्टनर पासून क्षणाचाही विलंब न करता दूर जा.





Read More :

रिलेशन टिप्स : नाते टिकवून ठेवण्यासाठी शांत राहणे उपयुक्त

सुनेने माहेरच्या लोकांशी कसे वागले पाहिजे ?

मुलांना घडवताना पालकांनी त्यांच्याशी कसे वागावे ?

प्रेमात पडल्याने वजन वाढते का? जाणून घ्या काय कारण आहे




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!