जगभरात अनेक गंभीर आजारांचा समावेश होतो. या आजारांमध्ये मधुमेह आज गंभीर स्वरूपाचा आजार ,मानला जातो. कारण या आजारावर अजूनपर्यंत तरी मजबूत उपाय शोधला गेला नाही आहे. त्यामुळे मधुमेहाने पिडीत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आधी हा आजार मोठ्या पन्नासी गाठून गेलेल्या लोकांना होत असायचा. परंतु आता लहान लहान मुलांना देखील हा आजार होत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण सुरु आहे. या आजाराला भीतीचे कारण म्हणजे स्ट्रोक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हा विषय चिंतेचा समजला जातो.
आपण स्ट्रोक म्हणजे काय या बद्दल जाणून घेऊया.
स्ट्रोक म्हणजे काय?
अचानक येणारी बेशुद्धी म्हणजे स्ट्रोक समजला जातो. स्ट्रोक बसलेली व्यक्ती शुद्धी वर येते, परंतु हात किंवा पायांना फटका बसतो, स्ट्रोक पूर्वी मोठ्या लोकांना होत असायचा परंतु तो आता लहान वयातील मुलांना देखील होत आहे. स्ट्रोक बसण्याचे मुख्य कारण म्हणजे.शरीरातील कॅरोटीड शिरामध्ये चरबी किंवा मेद जमा होत राहिल्यामुळे शुद्ध रक्ताच्या प्रवाहात अडथळे येऊन स्ट्रोक बसतो.ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांना स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो. यामुळे त्यांचे फिरणे बंद होते. हात-पाय दुर्बल होतात. हे अंग थरथर करू लागतात. अशा लोकांना कुणाच्या तरी आधाराची गरज असते. तसेच स्मरण शक्ती ही कमजोर होत जाते. या सर्व गोष्टी फक्त स्ट्रोक आल्यामुळे होतात. त्यामुळे मधुमेहा सारख्या आजारांना टाळाटाळ करू नका. त्याच्यावर त्वरित उपाय सुरु करा. तुम्ही जर योग्य पद्धतीने उपाय सुरु ठेवलेत तर मधुमेह नियंत्रित होऊ शकतो.
जसे वरती सांगितल्या प्रमाणे स्ट्रोक हा शरीरातील कॅरोटीड शिरा मध्ये चरबी किंवा मेद जमा होत राहिल्यामुळे शुद्ध रक्ताच्या प्रवाहात अडथळे येऊन बसतो. या बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.
चरबी हे स्ट्रोकचे मख्य कारण
मानेतील धमन्यामध्ये साठलेली चरबी आणि कॅल्शियम साठल्यामुळे स्ट्रोक बसत असल्याचा एका सर्वेमध्ये आढळून आले आहे. धमन्यात चरबी आणि कॅल्शियम साठल्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या शुद्ध रक्ताचे प्रमाण कमी होत जाते. आणि चरबीचे कण मेंदूतील रक्त वाहिन्यामध्ये जाऊन त्या बंद होऊ लागतात. या कारणामुळे स्ट्रोक बसतो.कॅरोटीडमुळे स्ट्रोक बसतो
कॅरोटीड ही रक्त वाहिनी शुद्ध रक्त वाहून नेते. त्यामुळे हे कारण देखील स्ट्रोकला कारणीभूत ठरते. ती स्वच्छ आणि चरबी रहित राहिली तर ८०% स्ट्रोकचा धोका कमी होतो. एका रिसर्चनुसार स्ट्रोक जे जगभरात मृत्यूचे तिसरे कारण समजले जाते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना स्ट्रोकचा धोका हा दीडपट अधिक असतो. मधुमेहामुळे होत असलेल्या स्ट्रोकमुळे १०० पैकी ४० रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.
मित्रानो हा आजार जरी गंभीर स्वरूपाचा असला तरी, तुम्ही योग्य ती जीवनशैली उपयोगात आणली तर तुम्ही या आजाराला नियंत्रणात ठेऊ शकता. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही.
आपण जाणून घेऊया मधुमेही रुग्णांनी काळजी कशी घ्यायची आहे?
💣मधुमेह रुग्णांना हलकी चक्कर आली किंवा अशक्तपणा वाटत असला तर त्यांनी वेळ न घालवता रक्तवहिन्यासंबंधी सर्जन किंवा न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन सल्ला घ्या.
💣रिकाम्यापोटी केलेल्या चाचणीत साखर सुमारे ८० ते १०० च्या आत व जेवल्यानंतर सुमारे १४०-१५० असायला हवी.
💣मधुमेह रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्यानुसार रक्तशर्करा नियंत्रणात ठेवावी.
💣आपल्या मानेतील कॅरोटीड वाहिनीची वेळोवेळी तपासणी करत चला.
💣 मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घ्यावीत. तसेच सांगितलेली पथ्ये न चुकता पाळावीत.
या लोकांनी लगेच उपचार घेणे आवश्यक आहे
💧 ज्येष्ठ नागरिक
💧 रक्तदाबाचे रुग्ण
💧 हृदयविकाराचे रुग्ण
💧 टीआयए चे रुग्ण
💧 लठ्ठ आणि धुम्रपान करणारी लोकं
महत्वाचा सल्ला
मधुमेह आणि नंतर होणारे गंभीर आजार. आज कोणाला नवीन नाही आहेत. आणि या सर्व गोष्टी होतचं राहणार आहे. कारण सध्याची जीवनशैली ही अशाच रोगांसाठी अनुकूल आहे. तरीही तुम्हाला न घाबरता जर प्रत्येक गोष्ट समप्रमाणात घ्यायला शिकला तर, तुम्ही या या आजारांना नियंत्रणात ठेऊ शकता.
Read More :
थकव्याला दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत ?
शरीरावर परिणाम करणारा अपचनाचा त्रास व उपाय
चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करुन बघा