सामान्य लोकांसाठी आरोग्यविमा हा खूप महत्वाचा असतो. आणि म्हणून अधिकांश लोकं आपल्या कमाईतला काही भाग आरोग्य विम्यासाठी बाजूला करुन ठेवतात. यासाठी की भविष्यात अचानक मोठी आरोग्यासंबधी अडचण आली तर, आरोग्य विमा पॉलिसी त्यांना आर्थिक हातभार लाऊ शकेल.
परंतु मित्रानो आरोग्य विमा काढताना काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची म्हणजे जर तुम्ही आरोग्य विमा संबधी अटी, नियम बरोबर वाचल्या नसतील तर, तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसीचे पैसे मिळण्यास अधिक वेळ किंवा कंपनी पैसे नाकारू शकते. एकदा या गोष्टी पडताळून पाहणे खूप आवश्यक आहे. अधिकांश लोकं घाई गडबडीत हे विसरून जातात आणि पुढे पश्चाताप करत बसतात.
या चुकीच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून प्रथम तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसीचे नियम अटी लक्षपूर्वक वाचल्या पाहिजेत. विमा एंजटला या बाबत सविस्तर विचारा. आणि नंतरच पॉलिसी खरेदी करा. आपण या ब्लॉग मधून त्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या विमा पॉलिसी काढताना विचारात घेतल्या पाहिजेत.
आरोग्य विमा काढण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ?
आपल्या गरजांचे योग्य विश्लेषण करा
आरोग्य विमा हा काढणाऱ्या व्यक्तीचे स्वास्थ्य, वय, कौटुंबिक स्थिती लक्षात घेऊनच खरेदी केली पाहिजे. तुम्हाला पॉलिसी अशी खरेदी करायची जी तुमच्या आजच्या गरजा पूर्ण होतील. विमा एंजट जेव्हा तुम्हाला विम्याबद्दल सांगत असतो. तेव्हा तो सगळे पर्याय तुमच्या पुढे मांडत असतो. तुम्हाला तुमच्या स्थिती नुसार पर्याय निवडले पाहिजेत.
उपयुक्त विमा कव्हर घ्या
अभ्यासा अभावी अधिकांश लोकं विमा रिटर्न किती मिळणार आहे, हे न बघताच एखादी स्वस्त विमा पॉलिसी खरेदी करतात. आणि मग पुढील काळात पश्चाताप करत बसतात.
जेव्हा तुमचा खर्च हा विमा कव्हर मिळणाऱ्या रिटर्न पेक्षा अधिक असतो, तेव्हा तुम्हाला नाईलाजास्तव तुमच्या सेविंग मधून खर्च भरावा लागतो. हा त्रास नको असेल तर, तुम्हाला आवश्यक/ योग्य विमा कव्हर घेणे आवश्यक आहे.
काय कव्हर आहे किंवा नाही याची माहिती घ्या
ही महिती सगळ्यात महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही आरोग्य विमा खरेदी करता, त्या वेळी त्या कव्हर मध्ये कोणते आजार मेन्शन आहेत, याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे न वाचताच पॉलिसी काढता तेव्हा भविष्यात तुम्हाला या आरोग्य विमा पॉलिसीचे पैसे मिळण्यास अडचणी येतील. किंबहुना ते मिळणे ही अशक्य होईल.
यासाठी तुम्ही जेव्हा विमा अधिकाऱ्याशी विम्याबद्दल बोलत असता, तेव्हा या कव्हर बद्दल अधिक माहित घेणे गरजेचे असते.
संबधित माहिती विमा कंपनीला द्या
विमा पॉलिसी काढताना विमा कंपनीला तुमची सगळी माहिती देणे खूप गरजेचे आहे. याबद्दल तुम्हाला कंपनीशी इमानदार राहणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे तुमच्या आजाराविषयी संपूर्ण माहिती आधीच विमा कंपनीला द्या. पुढे या चुका तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात.
या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी पडताळणी करायची आहे. तुमची व तुमच्या कुटुंबाची फसवणूक होऊ नये म्हणून या गोष्टी नक्कीच करा.
Read More :
जीवनातील काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणे आवश्यक आहे
नोकरी गेल्यावर परिस्थितीला कसे सामोरे जाल ?